Mahalakshmi Yog 2025: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, मंगळाला साहस, पराक्रम, शौर्य, क्रोध, भूमी यांचा कारक ग्रह मानले जाते, त्यामुळे ज्या व्यक्तीच्या पत्रिकेत मंगळ शुभ स्थितीत असतो, असे लोक प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवण्यासाठी सक्षम असतात. ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका निश्चित काळानंतर राशी परिवर्तन करतो. अनेकदा याचा फायदा काही राशींच्या व्यक्तींना होतो. पंचांगानुसार, मंगळाने ३ एप्रिल रोजी सकाळी १ वाजून ५६ मिनिटांनी कर्क राशीत प्रवेश केला असून या राशीत मंगळ ७ जूनपर्यंत विराजमान असतील. अशा स्थितीत मंगळ कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी युती करत असतात. आता ५ एप्रिल रोजी चंद्र कर्क राशीत प्रवेश करतील, त्यामुळे मंगळ आणि चंद्राची युती होणार असून या युतीमुळे महालक्ष्मी योग तयार होईल. या योगाच्या निर्मितीमुळे काही राशींच्या लोकांच्या जीवनात मोठे परिवर्तन दिसून येऊ शकते. या राशींचे भाग्य उजळ्याची शक्यता आहे. चला तर जाणून घेऊया, कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी…
‘या’ राशींचे भाग्य उजळणार, मिळेल मोठे यश!
कन्या
ज्योतिषशास्त्रानुसार, महालक्ष्मी योग निर्माण होताच कन्या राशीच्या लोकांना सुखाचे दिवस पाहायला मिळू शकतात. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊन या राशीच्या लोकांच्या सुख-सुविधांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. नोकरीत नवीन संधी मिळू शकतात. व्यवसायाच्या निमित्ताने लांबचे प्रवास घडू शकतात. परदेशी कंपन्यांशी संबंधित काम करणाऱ्यांना मोठे आर्थिक लाभ मिळू शकतात. समाजात मान-सन्मान वाढू शकतो.
तूळ
ज्योतिषअभ्यासकांच्या माहितीनुसार, तूळ राशीच्या लोकांना माता लक्ष्मीच्या कृपेने जीवनात सकारात्मक बदल पाहायला मिळू शकतात. गुंतवणूक आणि शेअर बाजारातूनही चांगली कमाई होण्याची शक्यता आहे. या काळात तुम्ही परदेशात जाण्याचीही शक्यता आहे. याशिवाय, तुमची समाजात उच्च प्रतिष्ठा असेल आणि तुम्हाला लोकांकडून खूप आदर मिळू शकतो. एकंदरीत, तूळ राशीसाठी ‘अच्छे दिन’ सुरू होत असल्याचे संकेत आहेत.
मकर
ज्योतिषअभ्यासकांच्या माहितीनुसार, मकर राशीच्या लोकांना मोठा लाभ होऊ शकतो. महालक्ष्मी योग घडून येताच तुम्हाला शुभ फळ मिळण्याची शक्यता आहे. व्यापाऱ्यांना चांगला आर्थिक नफा मिळू शकतो. अचानक धनलाभ होण्याची शक्यता असल्याने आर्थिक संकट कमी होऊ शकते. पैशांच्या बाबतीत काळ सकारात्मक राहू शकतो. या काळात तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार यश मिळू शकते. मकर राशीच्या लोकांना अचानक आर्थिक लाभ आणि पदोन्नतीच्या संधी मिळू शकतात.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)