Mangal gochar 2025: ज्योतिषशास्त्रानुसार मंगळाला साहस, पराक्रम, शौर्य, क्रोध, भूमी यांचा कारक ग्रह मानले जाते. त्यामुळे ज्या व्यक्तीच्या पत्रिकेत मंगळ शुभ स्थितीत असतो, असे लोक प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवण्यासाठी सक्षम असतात. ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका निश्चित काळानंतर राशी परिवर्तन करतो. अनेकदा याचा फायदा काही राशींच्या व्यक्तींना होतो. मंगळ ग्रह सध्या मिथुन राशीत विराजमान असून तो ३ एप्रिल रोजी कर्क राशीत प्रवेश करणार आहे, जो जूनपर्यंत याच राशीत विराजमान असेल. त्यामुळे कर्क राशीत मंगळ ग्रहाची कोणत्याना कोणत्यातरी ग्रहाबरोबर युती निर्माण होईल. ज्यामुळे शुभ योग किंवा राजयोग निर्माण होईल. ज्याच्या शुभ प्रभावाने १२ राशींपैकी काही राशींच्या व्यक्तींना फायदा होईल.
पंचांगानुसार, मंगळ ग्रह ३ एप्रिल रोजी १ वाजून ५६ मिनिटांनी कर्क राशीत प्रवेश करणार असून चंद्र ५ एप्रिल रोजी रात्री ११ वाजून २४ मिनिटांनी कर्क राशीत प्रवेश करणार असून ८ एप्रिलपर्यंत तो या राशीत उपस्थित असेल. त्यामुळे कर्क राशीत ५४ तासांसाठी महालक्ष्मी योग निर्माण होईल. ज्याचा शुभ प्रभाव काही राशींवर पाहायला मिळेल.
महालक्ष्मी योग करणार मालामाल
कन्या
कन्या राशीच्या व्यक्तींसाठी देखील मंगळ आणि चंद्राची युती खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. नव्या वस्तू खरेदी कराल. नोकरीत प्रमोशन मिळेल. मुलांकडून आनंदी वार्ता येतील. कुटुंबातही आनंदी आनंद असेल. स्पर्धा परीक्षेत यश मिळेल. तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खूश असतील. करिअरमध्ये चांगली प्रगती होईल. नवे लोक, नवे छंद यांच्याशी जोडले जाल. शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम असेल.
तूळ
मंगळ आणि चंद्राची युती तूळ राशीच्या लोकांसाठी खूप खास ठरेल. या काळात त्यांची आर्थिक स्थिती उत्तम राहून, कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. वैवाहिक जीवन सुखमय असेल. नव्या वस्तू खरेदी कराल. अविवाहितांची लग्ने जुळतील. नोकरी करणाऱ्या व्यक्तींच्या मेहनतीचे कौतुक होईल. या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खूश असतील. नवीन नोकरी शोधणाऱ्यांना मनासारखी नोकरी मिळेल. प्रत्येक कामात यश मिळेल.
मकर
मकर राशीच्या व्यक्तींनादेखील मंगळ-चंद्राच्या युतीचा चांगला फायदा होईल. या काळात तुमच्या सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. नव्या वस्तू खरेदी कराल. नोकरीत प्रमोशन मिळेल. मुलांकडून आनंदी वार्ता येतील. कुटुंबातही आनंदी आनंद असेल. स्पर्धा परीक्षेत यश मिळेल. तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खूश असतील. करिअरमध्ये चांगली प्रगती होईल. या काळात करिअरमध्ये यश मिळेल; तसेच पदोन्नतीही मिळेल. उत्पन्नाचे नवे स्त्रोत मिळतील.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)