Mangal Gochar : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार १६ जानेवारी रात्री १२ वाजून ७ मिनिटांनी मंगळ ग्रहाने धनु राशीत प्रवेश केला आहे. ग्रहांच्या संक्रमणामुळे काही राशींवर सकारात्मक आणि काही राशींवर नकारात्मक परिणाम दिसून येतात. मंगळ ग्रहाने धनु राशीत प्रवेश केल्यामुळे काही राशींवर सकारात्मक परिणाम दिसून येणार आहे. त्या राशी कोणत्या? जाणून घेऊ या.
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका ठराविक वेळेनंतर एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करत असतो. कोणत्याही ग्रहाच्या राशी संक्रमणामुळे राशी चक्रातील १२ राशींवर परिणाम पडत असतो. मंगळ ग्रहाने धनु राशीत प्रवेश केल्यामुळे काही राशींना फायदा होणार आहे. या दरम्यान त्यांना अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे.
सिंह
ज्योतिषशास्त्रानुसार या गोचरमुळे सिंह राशींना आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. याशिवाय घरात आनंद दिसून येईल. कोणत्याही शुभ कार्यात धन संपत्ती खर्च होऊ शकते. नोकरी करणाऱ्यांना लोकांना मंगळ ग्रहाचे संक्रमण अधिक शुभ ठरणार आहे. चांगली नोकरी मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांना नवी संधी मिळू शकते. धनलाभ होण्याची शक्यता आहे. नातेसंबंधात गोडवा राहील. आरोग्य उत्तम राहील.
तुळ
मंगळ ग्रहाचे संक्रमण तुळ राशीसाठी फायद्याचे ठरणार आहे. या दरम्यान चांगले मित्र भेटेन. या काळात धनलाभ होण्याची शक्यता आहे. बहिण भावाचे सहकार्य लाभेल. नोकरीच्या ठिकाणी पगारवाढ होईल. पैशांची बचत होईल. जोडीदाराबरोबर वेळ घालवू शकता.
वृश्चिक
या गोचरमुळे वृश्चिक राशींना लाभ होणार आहे. धनलाभाची शक्यता वाढणार. या काळाच खर्च वाढेल. धैर्याने काम करण्याची आवश्यकता आहे. नात्यात गोडवा राहील. नोकरीच्या ठिकाणी यश मिळेल. एकाग्रतेने राहण्याची आवश्यकता आहे.
धनु
मंगळ ग्रहाने धनु राशीत प्रवेश केला आहे. अशात या राशीच्या लोकांना अनेक गोष्टींमध्ये सकारात्मक परिणाम दिसून येईल. या राशीच्या लोकांवर कामासंदर्भात तणाव जाणवेल. या दरम्यान प्रवासाचा योग जुळून येईल. नवीन संपत्ती विकत घेऊ शकता आणि गुंतवणूक करू शकता.
कुंभ
मंगळ ग्रहाचा धनु राशीत प्रवेश कुंभ राशीला फायदा होणार आहे. नोकरीची संधी मिळू शकते. जोडीदाराबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवाल. त्यांचे सहकार्य लाभेल. व्यवसायात प्रगती होईल. आरोग्य उत्तम राहील.
(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)