Mars Gochar 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह वेळोवेळी त्यांच्या स्वतःच्या राशीत प्रवेश करतात. ज्याचा परिणाम मानवी जीवनावर आणि पृथ्वीवर दिसून येतो. अशातच आता ग्रहांचा सेनापती मंगळ वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे आणि तो डिसेंबरपर्यंत यिथेच विराजमान असणार आहे. त्यामुळे काही राशीच्या लोकांच्या संपत्तीत प्रचंड वाढ होण्याची शक्यता असते. तर या भाग्यवान राशी कोणत्या आहे ते जाणून घेऊया.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तूळ रास

मंगळाचे राशी परिवर्तन तूळ राशीच्या लोकांसाठी शुभ ठरू शकते. कारण मंगळ तुमच्या राशीतून धन स्थानाकडे विचरण करत आहे. त्यामुळे, या काळात तुम्हाला अनपेक्षित आर्थिक नफा मिळू शकतो. तसेच या काळात तुमच्या बोलण्यात प्रभाव दिसून येऊ शकतो. ज्यामुळे लोक तुमच्याकडे आकर्षित होऊ शकतात. मंगळ तुमच्या राशीच्या सातव्या स्थानाचा स्वामी आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला भागीदारीच्या कामातून फायदा होऊ शकतो. तसेच रखडलेली कामे पुन्हा सुरू होऊ शकतात.

मीन रास

वृश्चिक राशीत मंगळाचा प्रवेश मीन राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो. कारण मंगळ तुमच्या राशीच्या नवव्या स्थानी विचरण करत आहे. त्यामुळे तुम्हाला करिअरशी संबंधित चांगल्या संधी मिळू शकतात. आत्मविश्वास संतुलित ठेवला तर तुम्हाला यश मिळण्याची दाट शक्यता आहे. या काळात तुम्ही धार्मिक आणि शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. तुम्ही देश-विदेशात प्रवास करू शकता, जो तुमच्यासाठी शुभ ठरु शकतो.

हेही वाचा- पुढील ८ दिवस ‘या’ राशींचे नशीब सोन्याहून चमकणार? बुध, सुर्य आणि मंगळाच्या कृपेने अमाप संपत्ती मिळण्याची शक्यता

मकर रास

मकर राशीच्या लोकांसाठी मंगळाचे राशी परिवर्तन आर्थिकदृष्ट्या शुभ सिद्ध होऊ शकते. कारण मंगळ तुमच्या आर्थिक स्थानात फिरत आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला नोकरी आणि व्यवसायातून अनपेक्षित नफा मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या जुन्या योजना पुन्हा सुरू होऊ शकतात. तसेच, जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला नफा मिळण्याची शक्यता आहे. जर तुमचा व्यवसाय निर्यात आणि आयातीशी संबंधित असेल तर तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mars gochar 2023 will the fate of these zodiac signs change by december 28 chances of advancement in business with substantial financial gain jap