Mangal Transit In Dhanu: ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह एका विशिष्ट कालवधीच्या अंतराने गोचर करतात करतात, ज्याचा प्रभाव मानवी जीवनावर दिसून येतो. ग्रहांचा सेनापती मंगळ २८ डिसेंबर रोजी धनु राशीत प्रवेश केला आहे आणि ५ फेब्रुवारीपर्यंत येथे राहणार आहे. अशा स्थितीत मंगळ ग्रह काही राशींचे भाग्य उजळवणार आहे. तसेच, या राशींच्या संपत्तीत प्रचंड वाढ होईल. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी…
धनु राशी
मंगळाचे गोचर तुमच्यासाठी शुभ ठरू शकते. कारण मंगळ ग्रह तुमच्या राशीतून फक्त लग्न घरात प्रवेश करत आहे. त्यामुळे यावेळी तुमचे धैर्य आणि शौर्य वाढेल. तुम्ही एखादे वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्याचा निर्णय देखील घेऊ शकता. त्याच वेळी, या काळात विवाहित लोकांमधील संबंध पूर्वीपेक्षा अधिक प्रेमळ होणार आहेत. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांना नक्कीच प्रगती होईल. तसेच, आर्थिक योजना बनवण्यासाठी हा काळ खूप चांगला असणार आहे. जे अविवाहित आहेत त्यांना लग्नासाठी स्थळ येईल.
कन्या राशी
कन्या राशीच्या लोकांसाठी मंगळाचे राशी बदलणे अनुकूल ठरू शकते. कारण मंगळ तुमच्या कुंडलीच्या चौथ्या घरात गोचर करत आहे. त्यामुळे यावेळी तुम्हाला भौतिक सुख मिळेल. मालमत्ता खरेदीचीही शक्यता आहे. या काळात तुमचे करिअर खूप चांगले होणार आहे. काही परदेशी कराराच्या मदतीने तुम्हाला फायदा मिळू शकेल. तसेच, तुम्ही रिअल इस्टेट, प्रॉपर्टी डीलिंग, मेडिकलशी संबंधित कोणतेही काम करत असाल तर तुम्हाला चांगले फायदे मिळू शकतात.
हेही वाचा – २०२४ मे पर्यंत ‘या’ ३ राशींना बक्कळ धनलाभाची संधी? देव गुरु देऊ शकतात प्रचंड श्रीमंती
वृश्चिक राशी
मंगळाचे गोचर तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. कारण मंगळ ग्रह तुमच्या गोचर कुंडलीच्या धन घरातून फिरत आहे. त्यामुळे, यावेळी तुम्हाला अनपेक्षित पैसे मिळू शकतात. तुम्हाला तुमच्या करिअरमध्येही प्रगती दिसेल. नोकरदारांना यावेळी प्रमोशन मिळू शकते. तसेच जे बेरोजगार आहेत त्यांना नोकरीची संधी मिळू शकते. आर्थिक दृष्टिकोनातून, हे गोचर तुमच्यासाठी आश्चर्यकारक असणार आहे. मंगळ तुमच्या राशीचा स्वामी आहे, त्यामुळे यावेळी तुमचे धैर्य आणि शौर्य वाढेल.