Shani, Mangal and Shukra Conjuction : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह वेळोवेळी त्रिग्रही व चतुर्ग्रही योग तयार करतात; ज्याचा प्रभाव मानवी जीवन आणि पृथ्वीवर दिसून येतो. दरम्यान, १५ मार्च रोजी कुंभ राशीमध्ये शनी, मंगळ व शुक्राचा संयोग होणार आहे. सध्या शनिदेव कुंभ राशीत भ्रमण करीत आहेत. १५ मार्चला शनी कुंभ राशीत प्रवेश करील आणि ७ मार्चला शुक्र कुंभ राशीत प्रवेश करील. त्यामुळे कुंभ राशीमध्ये त्रिग्रही योग तयार होईल. या ग्रहांच्या संयोगाचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येईल. पण, अशा तीन राशी आहेत की, ज्यांचे नशीब यावेळी चमकू शकते. त्या राशी ज्या व्यक्तींच्या आहेत, त्यांच्या संपत्ती, पद, प्रतिष्ठेत वाढ होऊ शकते. चला तर जाणून घेऊ या कोणत्या राशी आहेत…
कुंभ राशी
शनि, मंगळ व शुक्र यांचा संयोग कुंभ राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो. तुमचा आत्मविश्वास वाढेल. तसेच या काळात तुम्हाला तुमच्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळू शकेल. त्यामुळे तुमच्या व्यक्तिमत्त्वात सुधारणा होईल. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून प्रत्येक पावलावर पूर्ण पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होण्याची दाट शक्यता आहे. तसेच जे अविवाहित आहेत, त्यांच्यासाठी चांगल्या जोडीदाराचा प्रस्ताव येऊ शकतो.
मेष राशी
शनि, मंगळ व शुक्र यांचा संयोग मेष राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरू शकतो. कारण- हा संयोग तुमच्या राशीतून उत्पन्न आणि लाभाच्या ठिकाणी असणार आहे. त्यामुळे यावेळी तुमचे उत्पन्न वाढू शकेल. तसेच उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. आर्थिक गुंतवणुकीचा फायदा होऊ शकतो. तसेच, या काळात तुम्ही चांगल्या रकमेची बचत करण्यात यशस्वी होऊ शकता. नोकरदारांनाही गुंतवणुकीतून चांगला फायदा मिळू शकेल. त्याचबरोबर शेअर बाजारासह इतर ठिकाणी गुंतवणूक करायची असेल, तर ती करू शकता. नवीन काम सुरू करण्यासाठी वेळ अनुकूल आहे.
वृषभ राशी
शनि, मंगळ व शुक्र यांचा संयोग वृषभ राशीच्या लोकांसाठी लाभकारी ठरू शकतो. या काळात बेरोजगारांना नवीन रोजगार मिळू शकतो. तसेच नोकरदार लोकांना कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. आर्थिक दृष्टिकोनातून हा संयोग तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतो, तसेच तुम्हाला वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ मिळू शकतो. वडिलांशी तुमचे संबंध चांगले राहतील. त्याचबरोबर व्यावसायिकांना यावेळी चांगला आर्थिक फायदा होऊ शकतो.