Mangal Planet Transit: ज्योतिष शास्त्रानुसार मंगळदेव हे साहस, पराक्रम, वीरता, शौर्य, क्रोध यांचे प्रतीक मानले जातात. मंगळ जेव्हा कधीही राशी परिवर्तन करतो तेव्हा त्याचा प्रभाव हा राशीचक्रातील सर्व राशींवर प्रभाव पडतो. ज्योतिषशास्त्रानुसार येत्या १० मे २०२३ ला मंगळ हा कर्क राशीत पदार्पण करणार आहे. कर्क ही मूलतः चंद्राच्या स्वामित्वाची रास मानली जाते. चंद्र हा शीतलतेचे प्रतीक असल्याने मंगळाचा कठोर प्रभाव नियंत्रणात राहू शकेल. उलट मंगळ व चंद्राची युती झाल्याने प्रभावित राशींना मंगळाच्या वेगाने व चंद्राच्या प्रेमळ रूपाचे परिणाम अनुभवता येऊ शकतो. या काळात तीन राशींना प्रचंड लाभ व श्रीमंती अनुभवता येऊ शकते. माता लक्ष्मी या राशींवर कृपेचा वर्षाव करू शकते. नेमक्या कोणत्या राशीला कशा प्रकारे लाभ होणार हे आपण पाहूया…
मंगळ गोचर कधी होणार आहे? (When Is Mangal Gochar)
१० मे २०२३ ला मंगळदेव मिथुन राशीतून बाहेर पडून कर्क राशीत प्रवेश घेणार आहे. दुपारी २ वाजून १३ मिनिटांनी हे मार्गक्रमण सुरु होणार आहे. याच राशीत मंगळदेव १ जुलै २०२३ च्या दुपारी २ वाजून ३७ मिनिटांपर्यंत स्थिर असणार आहेत.
मंगळ तुमच्या राशीला काय देणार?
कन्या रास (Kanya Rashi)
कन्या राशीला मंगळ गोचर हे अत्यंत लाभदायक सिद्ध होऊ शकते. तुमच्या राशीच्या गोचर कुंडलीत ११ व्या स्थानी मंगळ गोचर होणार आहे. हे स्थान लाभाचे मानले जात असल्याने तुम्हाला येत्या काळात आरोग्य, अर्थ या दोन्ही बाबीत लाभाची संधी आहे. शेअर मार्केट गुंतवणूक तुमच्यासाठी नशीब बदलणारी गोष्ट ठरू शकते. प्रॉपर्टी व वाहन खरेदी करण्यासाठी अत्यंत लाभदायक योग आहेत.
कुंभ रास (Kumbh Rashi)
कुंभ राशीच्या गोचर कुंडलीत मंगळ सहाव्या भावात गोचर करत आहेत. या राशीच्या मंडळी अगोदरच शनीच्या आशीर्वादाने समृद्ध असल्याने मंगळाची साथ तुम्हाला प्रचंड लाभ देऊन जाऊ शकते. कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक व पदोन्नती होऊ शकते यामुळे तुम्हाला मानसिक आत्मविश्वास मिळू शकतो. तसेच पगारवाढ झाल्याने तुम्हाला आर्थिक बळ सुद्धा लाभू शकते. तुम्हाला कामाच्या निमित्ताने प्रवासाचा योग आहे. कुटुंबाचे सुख तुमच्या नशिबात दिसत आहे.
हे ही वाचा<< अक्षय्य तृतीयेला पंचग्रह एकत्र आल्याने ‘या’ ४ राशींना बक्कळ धनलाभ होणार? प्रेमासह मिळवू शकता प्रचंड संपत्ती
मीन रास (Meen Rashi)
मीन राशीच्या गोचर कुंडलीत मंगळ गोचर पाचव्या स्थानी आहे. या राशीच्या धन- धान्यात वृद्धी होऊन तुम्हाला आयुष्यात स्थैर्य अनुभवता येऊ शकते. प्रलंबित कामे मार्गी लागू शकतील. स्पर्धा परीक्षा व कलाक्षेत्रातील मंडळींना खूप यश लाभू शकते. यशाच्या वाटेत तुमचे कुटुंब व मित्र खूप मदतीला येऊ शकतात.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)