Mars Transit 2024: ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन करतो. ग्रहाच्या राशी परिवर्तनाचा थेट परिणाम राशीचक्रातील बारा राशींवर होतो. जून महिन्यात मंगळ ग्रह मेष राशीमध्ये प्रवेश करणार आहे. मंगळ ग्रहाला लाल ग्रह सुद्धा मानले जाते. मंगळ हा पराक्रमी, धाडसी, शक्ती, ऊर्जा इत्यादीचा कारक मानला जातो. मंगळ ग्रहामुळे जीवनात यश मिळते आणि पद प्रतिष्ठा वाढते. याचबरोबर व्यक्ती धाडसी, ऊर्जावान होते. १ जूनला मंगळ ग्रह मेष राशीमध्ये प्रवेश करणार आहे. अशात अनेक शुभ योग दिसून येईल. मेष राशीमध्ये मंगळ ग्रह राशी परिवर्तन करत असल्यामुळे अनेक राशींवर याचा सकारात्मक परिणाम दिसून येईल. जाणून घेऊ या त्या राशी कोणत्या ?

मेष राशी

Malavya Yoga and Kendra Trikon Rajyoga 2025
२०२५मध्ये ग्रहांचा अद्भुत संयोग! मीन राशीत निर्माण होईल केंद्र त्रिकोण-मालव्य राजयोग; नोकरीत होईल पदोन्नती, अचानक होईल आर्थिक लाभ
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Shukra Nakshatra parivartan 2024
उद्यापासून पडणार पैशांचा पाऊस; शुक्राच्या नक्षत्र परिवर्तनाने ‘या’ तीन राशींना होणार भौतिक सुखाची प्राप्ती
Rahu Gochar 2025
Rahu Gochar 2025 : राहु बदलणार चाल, पडणार पैशांचा पाऊस! ‘या’ तीन राशींचे चमकणार भाग्य
Mangal Vakri 2025
मंगळ देणार पैसा, प्रेम अन् प्रसिद्धी; नव्या वर्षाच्या सुरूवातीला ‘या’ तीन राशींना मिळणार प्रत्येक कामात यश
Mars Gochar 2024
पुढील ११० दिवस मंगळ देणार बक्कळ पैसा; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार संपत्तीचे सुख अन् प्रत्येक कामात यश
budh uday 2024
१२ डिसेंबरपासून नुसता पैसा; बुध ग्रहाचा उदय ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना देणार धन-संपत्तीचे सुख
Rahu-Ketu rashi parivartan 2024
‘या’ चार राशी कमावणार पैसाच पैसा; राहू-केतूचे राशी परिवर्तन देणार मानसन्मान आणि गडगंज पैसा

ज्योतिषशास्त्रानुसार, मेष राशीच्या लोकांसाठी मंगळ ग्रहाचे गोचर भाग्याचे ठरतील. या राशीच्या विद्यार्थ्यांना याचा चांगला फायदा दिसून येईल. यावेळी विद्यार्थ्यांना विशेष लाभ होईल. स्पर्धा परिक्षांमध्ये यश मिळू शकते. त्याचबरोबर रिअल स्टेट आणि प्रॉपर्टीशी संबंधित लोकांना चांगल्या बातम्या मिळू शकतात. या लोकांना विदेशी जाण्याचा योग जुळून येईल. व्यवसायात नफा मिळेल.

हेही वाचा : Mohini Ekadashi : १२ वर्षानंतर मोहिनी एकादशीच्या दिवशी अद्भुत संयोग, ‘या’ राशी होतील मालामाल; मिळणार बंपर पैसा

धनु राशी

धनु राशीसाठी मंगळचे गोचर लाभदायक ठरू शकते. या वेळी आयात निर्यात करणाऱ्या व्यवसायाशीसंबंधित लोकांसाठी हा काळ उत्तम राहील. या लोकांना नफा मिळेल. विदेशात जाऊन शिक्षण घ्यायचा विचार करत असाल तर सहज शक्य आहे. बहिण भावाचा साथ मिळेल. कुटुंबाबरोबर वेळ घालवण्याची संधी मिळेल.

कुंभ राशी

ज्योतिषशास्त्रानुसार कुंभ राशीच्या लोकांवर मंगळ देवाची कृपा राहील. व्यवसाय सुरू करण्याचा विचार करणाऱ्या किंवा गुंतवणूक करायचा विचार करणाऱ्या लोकांसाठी हा काळ उत्तम आहे. न्यायालयीन कामात यश मिळेल. नोकरीच्या ठिकाणी या लोकांना पदोन्नती मिळू शकते. विद्यार्थ्यांसाठी हा काळ उत्तम राहील. रिसर्चशी संबंधित लोकांना विदेशात जाण्याची संधी मिळू शकते. या लोकांना पत्नीच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.

मीन राशी

मंगळ ग्रहाच्या राशी परिवर्तनामुळे मीन राशीवर याचा सकारात्मक परिणाम दिसून येईल. या दरम्यान या राशीच्या लोकांना यश मिळेल. मनाप्रमाणे नोकरीची संधी मिळू शकते. कामाच्या ठिकाणी पदोन्नतीचे योग जुळून येईल. शत्रुंचा नाश होईल आणि या लोकांना विदेशात जाण्याची संधी मिळू शकते.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)

Story img Loader