Mangal gochar 2025: ज्योतिषशास्त्रानुसार मंगळाला साहस, पराक्रम, शौर्य, क्रोध, भूमी यांचा कारक ग्रह मानले जाते. त्यामुळे ज्या व्यक्तीच्या पत्रिकेत मंगळ शुभ स्थितीत असतो, असे लोक प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवण्यासाठी सक्षम असतात. ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका निश्चित काळानंतर राशी परिवर्तन करतो. दरम्यान, २३ जानेवारी रोजी रात्री ८ वाजून ३२ मिनिटांनी मंगळ ग्रह आणि युरेनस एकमेकांपासून ६० डिग्रीवर असतील. ज्यामुळे त्रिएकादश योग निर्माण होईल. ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा दोन ग्रह एकमेकांपासून तृतीय आणि एकादश भावामध्ये असतात, तेव्हा त्रिएकादश कोणीय संयोग निर्माण होतो. ज्याचा काही राशींच्या व्यक्तींना खूप फायदा होतो.

मंगळ-युरेनसची लाभ दृष्टी तीन राशींसाठी ठरणार फायदेशीर

मिथुन

mauni amavasya 2025
५० वर्षानंतर मौनी अमावस्येच्या दिवशी निर्माण होणार त्रिवेणी योग, चांदीसारखे चमकेल ‘या’ राशींचे नशीब, प्रचंड श्रीमंती व प्रेम मिळणार
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
22 January Horoscope in Marathi
२२ जानेवारी राशिभविष्य: स्वाती नक्षत्रात तुमच्या बाजूने लागणार का निकाल? कोणाला धनलाभ तर कोणाचे मन प्रसन्न होणार?
After 30 years Saturn-Venus alliance will happen
३० वर्षांनतर शनी-शुक्राची होणार युती! २०२५ मध्ये ‘या’ राशींची होणार चांदी, मिळणार अपार पैसा
Budh Nakshatra Parivartan 2024
पैसाच पैसा! बुधाच्या अनुराधा नक्षत्रातील प्रवेशाने ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींचे चमकणार भाग्य
trigrahi yog 2025 in meen moon shukra and rahu yuti
१२ महिन्यांनंतरच्या त्रिग्रही योगामुळे ‘या’ राशींच्या लोकांचे फळफळणार नशीब! शुक्रकृपेने पडणार पैशांचा पाऊस
Shani gochar 2025
पुढचे १४३ दिवस शनी देणार बक्कळ पैसा; ‘या’ तीन राशीच्या व्यक्ती मिळवणार प्रत्येक कामात यश
Jupiter And Shani Vakri 2024
५०० वर्षांनी दिवाळीला शनि आणि गुरुचा होणार दुर्मिळ संयोग! या राशींचे सुरू होणार चांगले दिवस, करिअमध्ये प्रगतीसह मिळेल पैसाच पैसा

मंगळ-युरेनसची लाभ दृष्टी मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी खूप लाभदायी सिद्ध होईल. या काळात त्यांची आर्थिक स्थिती उत्तम राहून, कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. तुमच्या साहस, पराक्रमात वाढ होईल. वैवाहिक जीवन सुखमय असेल. नव्या वस्तू खरेदी कराल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींच्या मेहनतीचे कौतुक होईल. या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खूश असतील. नवीन नोकरी शोधणाऱ्यांना मनासारखी नोकरी मिळेल. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. प्रत्येक कामात मन रमेल.

कर्क

कर्क राशीच्या व्यक्तींना हा लाभ दृष्टि योग खूप अनुकूल ठरेल. या काळात तुमच्या सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. नव्या वस्तू खरेदी कराल. नोकरीत प्रमोशन मिळेल. मुलांकडून आनंदी वार्ता येतील. कुटुंबातही आनंदी आनंद असेल. स्पर्धा परीक्षेत यश मिळेल. तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खूश असतील. करिअरमध्ये चांगली प्रगती होईल. मेहनतीच्या जोरावर अनेक गोष्टी साध्य कराल. प्रत्येक कामात यश मिळवाल.

कन्या

कन्या राशीच्या व्यक्तींसाठी मंगळ-युरेनसची लाभ दृष्टी आयुष्यात अनेक बदल घडवून आणेल. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या वरिष्ठांकडून सहयोग प्राप्त होईल. प्रत्येक कामात कुटुंबीयांची साथ मिळेल. तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. तीर्थक्षेत्रांना भेट द्याल. दूरचे प्रवासही घडतील. नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल. तसेच अडकलेले पैसे मिळतील. खर्चावर नियंत्रण ठेवा. नवे लोक, नवे छंद यांच्याशी जोडले जाल. शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम असेल. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल.

(टीप: सदर लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

Story img Loader