Nakshatra Change of Mars: ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ ग्रहाच्या राशी परिवर्तनाबरोबरच नक्षत्र परिवर्तनदेखील खूप खास मानले जाते. मंगळ ग्रहाच्या नक्षत्र परिवर्तनाचा १२ राशीच्या व्यक्तींवर शुभ किंवा अशुभ परिणाम पाहायला मिळतो. मंगळ ग्रहाने २२ जुलै रोजी रोहिणी नक्षत्रामध्ये प्रवेश केला असून पंचांगानुसार मंगळ ग्रहाने तब्बल २ वर्षानंतर रोहिणी नक्षत्रामध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे काही राशींच्या लोकांसाठी हे नक्षत्र परिवर्तन खूप लाभदायी सिद्ध होईल. ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ ग्रहाला साहस, पराक्रम, उत्साहाचा कारक ग्रह मानला जातो. जेव्हा जेव्हा मंगळ ग्रहाचे राशी राशी परिवर्तन किंवा नक्षत्र परिवर्तन होते, त्यावेळी त्याचा प्रभाव राशींवर होतो.

मंगळ ग्रहाचा रोहिणी नक्षत्रामध्ये प्रवेश (Nakshatra Change of Mars)

मेष

मेष राशीच्या व्यक्तींनादेखील मंगळाचे नक्षत्र परिवर्तन खूप फायदेशीर ठरेल. या काळात अनेकदा कामामुळे दूरचे प्रवास करावे लागतील. तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल. या काळात तुमच्या कुटुंबातही आनंदी आनंद असेल. नातेसंबंधांमध्ये गोडवा निर्माण होईल. त्याशिवाय तुम्ही त्यांच्यासोबत पिकनिकचा प्लानदेखील कराल. समाजात मान-सन्मान वाढेल. स्पर्धा परीक्षेत यश मिळेल.

वृषभ

मंगळ ग्रहाचे नक्षत्र परिवर्तन वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी खूप लाभदायी सिद्ध होईल. या काळात तुमचा भाग्योदय होईल. मेहनत केलेल्या कामात हवे तसे यश मिळवता येईल. आर्थिक परिस्थिती उत्तम होईल. कर्ज फिटण्यास मदत होईल. कामासंदर्भात दूरचे प्रवास करावे लागतील. करिअर व व्यवसायात मनासारखे यश प्रस्थापित कराल. अडकलेले पैसे परत मिळतील. कुटुंबीयांसोबतचे संबंध अधिक दृढ होतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील.

हेही वाचा: २६ ऑगस्टपर्यंत होणार देवी लक्ष्मीची कृपा! ‘या’ चार राशींच्या व्यक्तींना मिळणार भरपूर पैसा

मकर

मकर राशीच्या व्यक्तींसाठी मंगळ ग्रहाचे नक्षत्र परिवर्तन खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात कुटुंबियांसह आनंदाचे क्षण व्यक्तीत कराल. समाजात मान-सन्मान वाढेल. व्यवसायात यश प्राप्त होईल. आर्थिक तंगी दूर होण्यास मदत मिळेल. वैवाहिक जीवन सुखमय असेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे फळ लाभेल. या काळात तुमच्या उत्साहात वाढ होईल. रागावर नियंत्रण ठेवा.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)