Mangal planet transit in cancer: ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रहाचे ठराविक काळानंतर राशीपरिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन होते. ज्योतिषशास्त्रात मंगळ ग्रहाला साहस, ऊर्जा, शक्ती, पराक्रमाचा कारक ग्रह मानले जाते. त्यामुळे जेव्हा जेव्हा मंगळ राशीचे राशीपरिवर्तन होते, त्यावेळी त्याचा प्रभाव इतर राशींवरही होतो. २० ऑक्टोबर रोजी मंगळ कर्क राशीत प्रवेश करणार असून याचा काही राशींच्या व्यक्तींना फायदा होईल. या भाग्यशाली राशींची आर्थिक परिस्थिती सुधारेल आणि त्यांना नोकरी, व्यवसायात हवी तशी प्रगती करता येईल.

मंगळ देणार बक्कळ पैसा

मिथुन

Malavya Yoga and Kendra Trikon Rajyoga 2025
२०२५मध्ये ग्रहांचा अद्भुत संयोग! मीन राशीत निर्माण होईल केंद्र त्रिकोण-मालव्य राजयोग; नोकरीत होईल पदोन्नती, अचानक होईल आर्थिक लाभ
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Budh Margi 2024
बुध चालणार सरळ चाल, ‘या’ तीन राशींचे उजळणार नशीब; मिळणार अपार पैसा अन् धन
Mangal Rashi Parivartan 2024
४२ दिवसानंतर नुसता पैसा; मंगळाच्या राशी परिवर्तनाने ‘या’ तीन राशीच्या व्यक्ती होणार भाग्यवान
Shani Nakshatra transformation 2024
२०२५ सुरू होण्याआधीच शनी देणार बक्कळ पैसा; नक्षत्र परिवर्तनाने मिळणार पैसा आणि प्रतिष्ठा
Shukra Budh Labh Yog
चार दिवसानंतर अचानक पलटणार या ३ राशींचे नशीब, शुक्र-बुधच्या लाभ दृष्टीचा दुर्मिळ योग
Surya Shani Yuti 2025
२०२५ ची सुरूवात ‘या’ तीन राशींसाठी नुकसानदायक; दोन मोठ्या ग्रहांच्या एकत्र येण्याने आर्थिक समस्या उद्भवणार
Mangal Vakri 2025
मंगळ देणार पैसा, प्रेम अन् प्रसिद्धी; नव्या वर्षाच्या सुरूवातीला ‘या’ तीन राशींना मिळणार प्रत्येक कामात यश

मंगळ ग्रहाचे राशी परिवर्तन मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी खूप अनुकूल ठरेल. या काळात तुम्हाला नोकरी, व्यवसायात हवी तशी प्रगती करता येईल. आकस्मिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल. तुमच्यातला उत्साह वाढेल. वैवाहिक आयुष्यातील तणाव दूर होईल, भौतिक सुख-सुविधा प्राप्त कराल. कुटुंबातील व्यक्तींसोबत फिरायला जाल, आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. आयुष्यात काही अडचणी येतील; पण तुम्ही त्या दूर करण्यास सक्षम असाल. संपत्ती संबंधित समस्या दूर होतील.

वृश्चिक

वृश्चिक राशीच्या व्यक्तींना मंगळ ग्रहाचे राशी परिवर्तनाने आयुष्यात अनेक बदल पाहायला मिळतील. या काळात तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल आणि त्यांच्यासोबत पिकनिकचा प्लानदेखील कराल. या काळात समाजात मान-सन्मान वाढेल. तुमच्या पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यात प्रगती होईल. प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. या काळात तुम्ही नेहमी सकारात्मक राहाल. स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील तसेच जे अविवाहित आहेत, त्यांचे लग्न ठरेल.

हेही वाचा: सूर्याचा जबरदस्त प्रभाव; तूळ राशीतील राशीपरिवर्तनाने ‘या’ तीन राशी कमावणार बक्कळ पैसा

तूळ

मंगळाच्या राशीपरिवर्तनाने तूळ राशीच्या व्यक्तींना अनेक सकारात्मक परिणाम पाहायला मिळेल. या काळात अचानक धनलाभ होतील, अनेकदा कामामुळे दूरचे प्रवास करावे लागतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. आयुष्यात अनेक मोठे बदल पाहायला मिळतील. जोडीदाराबरोबरचे नाते अधिक घट्ट होईल. कर्ज फेडण्यास मदत होईल. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. वरिष्ठांची मदत मिळेल. विद्यार्थ्यांसाठीही हा उत्तम काळ आहे. या काळात करिअरमध्ये यश मिळेल; तसेच पदोन्नतीही मिळेल.

(टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

Story img Loader