Mangal Planet Transit: ज्योतीष पंचांगानुसार, ग्रह आणि नक्षत्र विशिष्ट कालावधीत राशी बदलतात. ग्रहांचे हे संक्रमण काहींसाठी शुभ तर काहींसाठी अशुभ असते. मंगळाने १० ऑगस्ट रोजी वृषभ राशीत प्रवेश केला आहे , जिथे तो १० ऑक्टोबरपर्यंत विराजमान राहील. मंगळाचे हे संक्रमण सर्व राशींवर परिणाम करेल. पण अशा तीन राशी आहेत, ज्यांच्यासाठी हे संक्रमण विशेषतः फायदेशीर सिद्ध होऊ शकते. चला जाणून घेऊया या कोणत्या राशी आहेत…

कर्क राशी

मंगळ ग्रहाचे संक्रमण होताच कर्क राशीच्या लोकांना प्रचंड संपत्ती मिळण्याची शक्यता आहे. कारण मंगळ तुमच्या राशीतून ११व्या भावात प्रवेश करत आहे. जे उत्पन्न आणि नफ्याचे मूल्य मानले जाते. त्यामुळे या काळात तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ होण्याची दाट शक्यता आहे. तसेच, व्यवसायात देखील विशेष आर्थिक लाभ होऊ शकतो. त्याचबरोबर तुमची आर्थिक बाजूही मजबूत होईल. यासोबतच या काळात तुमची कार्यशैलीही सुधारेल, ज्यामुळे कामाच्या ठिकाणी तुमची प्रशंसा होऊ शकते. यासोबतच तुम्हाला कामाच्या ठिकाणी सहकारी आणि वरिष्ठांचे सहकार्य देखील मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाची प्रशंसा देखील होईल.

no alt text set
ग्रहांचा सेनापती मंगळ होणार वक्री, नववर्षाच्या सुरुवातीला या राशीच्या लोकांची होणार चांदीच चांदी, तुमची रास आहे का या?
23 November Rashi Bhavishya In Marathi
२३ नोव्हेंबर पंचांग: आज कोणाला मिळेल भाग्याची साथ…
venus and saturn yuti 2024
२०२५ पर्यंत ‘या’ राशींचा सुरू होईल सुवर्णकाळ; शनी- शुक्राच्या संयोगाने नोकरी, व्यवसायात प्रगती अन् मिळणार बक्कळ पैसा!
Shani Transit 2024
१२७ दिवस शनीचा जबरदस्त प्रभाव; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार बक्कळ पैसा
Laxmi Narayan Yog 2025
Laxmi Narayan Yog 2025 : २०२५ मध्ये ‘या’ तीन राशी होणार मालामाल, मिळणार पैसाच पैसा!
Venus will create Malviya Raja Yoga in 2025
२०२५ मध्ये शुक्र निर्माण करणार मालव्य राजयोग! ‘या’ राशींचे नशिब पटलणार, अचानक होणार मोठा धनलाभ
vastu shastra vastu tips for house what is the right direction of mirror and watch
Vastu Tips : घरात ‘या’ दिशेला चुकूनही लावू नका घड्याळ अन् आरसा, करावा लागेल भयंकर संकटाचा सामना! वास्तु शास्त्र काय सांगते वाचा
22 November 2024 Daily horoscope rashi bhavishya, friday
Today Horoscope : २२ नोव्हेंबर पंचांग:  ब्रह्मयोग- आश्लेषा नक्षत्राचा शुभ संयोग, कोणत्या राशीची झोळी सुख व पैशांनी भरणार? वाचा तुमचे राशीभविष्य
Guru Pushya Yog 2024
वर्षातील शेवटच्या गुरू पुष्य योगाने सोन्यासारखे चमकणार ‘या’ राशींचे नशीब, होणार अचानक धनलाभ

सिंह राशी

मंगळ राशी बदलताच तुमच्या संपत्तीत भरपूर वाढ होण्याची शक्यता आहे. कारण तुमच्या कुंडलीवरून मंगळ ग्रह दशम भावात प्रवेश करत आहे, जो व्यवसाय आणि नोकरीचे घर मानला जातो. त्यामुळे यावेळी तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळण्याची शक्यता आहे. तसेच, तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला या काळात वेतनवाढ देखील मिळू शकते. तसेच या काळात नवीन व्यावसायिक संबंधांचा फायदा होईल. त्याच वेळी, व्यवसाय विस्तारासाठी हा काळ पूर्वीपेक्षा चांगला आहे. या काळात तुम्ही मालमत्ता आणि वाहन खरेदी करू शकता किंवा आपण मालमत्तेमध्ये गुंतवणूक करून चांगले पैसे कमवू शकता. व्यवसायातील कोणताही महत्त्वाचा करार यावेळी फायदेशीर ठरू शकतो. यामुळे तुम्हाला विशेष लाभ होण्याची शक्यता आहे.

( हे ही वाचा: शनिदेव ६ महिने मकर राशीत विराजमान राहतील; ‘या’ ३ राशींना मिळेल भरपूर पैसा)

कन्या राशी

मंगळ राशी बदलताच तुम्हाला व्यवसाय आणि करिअरमध्ये अपेक्षित यश मिळण्याची शक्यता आहे. कारण मंगळ ग्रहाने तुमच्या राशीतून नवव्या घरात भ्रमण केले आहे. जे भाग्याचे मानले जाते. त्यामुळे या काळात तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. यासोबतच आधीपासून रखडलेली कामेही मार्गी लागणार आहेत. याकाळात तुम्ही व्यवसायासाठी प्रवास देखील करू शकता. त्यामुळे तुम्हाला भविष्यात चांगले पैसे मिळण्याची शक्यता आहे. तसेच स्पर्धेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यावेळी नशिबाची साथ मिळेल. म्हणजे ते कोणत्याही परीक्षेत चांगलं यश मिळवू शकतात किंवा कोणत्याही उच्च संस्थेत प्रवेश घेऊ शकतात.