September Rashifal: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक महिन्यात काही ग्रहांचे राशी परिवर्तन होते. त्याचा शुभ किंवा अशुभ प्रभाव १२ राशींपैकी काही राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. बऱ्याचदा एकापेक्षा जास्त ग्रह एकाच राशीत एकत्र उपस्थित असतात ज्यामुळे त्या राशीत शुभ योग निर्माण होतात. सप्टेंबर महिन्यातही काही ग्रहांचे राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन देखील होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पंचांगानुसार, सध्या शनी आपल्या मूळ त्रिकोण कुंभ राशीत विराजमान असून तो ४ सप्टेंबर रोजी बुध ग्रह सिंह राशीत प्रवेश करणार आहे. बुध २३ सप्टेंबर रोजी कन्या राशीत प्रवेश करेल. तसेच ग्रहांचा राजा सूर्य १६ सप्टेंबर रोजी कन्या राशीत प्रवेश करेल. तसेच कन्या राशीत २५ ऑगस्टपासून शुक्र ग्रह देखील विराजमान असून २०२३ पासून केतू ग्रहदेखील कन्या राशीत उपस्थित आहे. त्यामुळे कन्या राशीत काही काळ हे चारही ग्रह एकत्र आल्याने चतुर्ग्रही योग निर्माण होईल, ज्याच्या प्रभावाने काही राशीच्या व्यक्तींना त्याचे लाभदायक परिणाम पाहायला मिळतील.

तसेच १३ सप्टेंबर रोजी सूर्य उत्तरा फाल्गुनी नक्षत्रामध्ये प्रवेश कणार आहे. ग्रहांचे नक्षत्र परिवर्तन आणि राशी परिवर्तन काही राशींच्या व्यक्तींसाठी लाभादायी सिद्ध होईल.

सप्टेंबर महिना देणार पैसा आणि प्रेम (September Rashifal)

मकर

सप्टेंबर महिन्यातील राशी परिवर्तन खूप सकारात्मक बदल घडवून आणणारे असेल. या काळात अनेक चांगले बदल तुमच्या आयुष्यात होतील. तुमच्यावर सूर्याचा प्रभाव अधिक असेल. त्यामुळे मान-सन्मानात वाढ होईल. नोकरी, व्यवसायात प्रगती होईल. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. अडकलेले पैसा परत मिळतील. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. या महिन्यात शनीची देखील तुमच्यावर शुभ दृष्टी असेल. फक्त मेहनत कायम ठेवा. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. आनंदी वार्ता कळतील.

कुंभ

कुंभ राशींच्या व्यक्तींना सप्टेंबर महिन्यातील ग्रहांचे राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन खूप लाभदायी ठरेल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. ग्रहांच्या शुभ स्थितीमुळे कुटुंबातील वाद-विवाद मिटतील. तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. या काळात तुम्हाला भाग्याची चांगली साथ मिळेल. वडिलोपार्जित संपत्तीचा फायदा होईल. नव्या नोकरीची ऑफर मिळेल. तुमच्या सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. प्रगती करण्याची संधी मिळेल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. बँक बॅलन्स वाढेल.

हेही वाचा: नुसता पैसा; तब्बल ३० वर्षांनंतर शनी आणि सूर्याने निर्माण केला ‘दुर्लभ योग’, ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार पैसा अन् प्रसिद्धी

मीन

मीन राशींच्या व्यक्तींनाही सप्टेंबर महिन्यातील राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन अत्यंत शुभ फळ देणारे ठरेल. या काळात तुम्हाला हवं ते मिळवाल. तुमच्या आर्थिक समस्या दूर होतील. तुमची अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल. कुटुंबीयांसोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. सरकारी कामात येणारे अडथळे दूर होतील. भाग्याची पुरेपुर साथ मिळेल. मानसिक तणाव दूर होण्यास मदत होईल. विद्यार्थ्यांना चांगली संधी प्राप्त होतील.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Masik rashifal september 24 the month of september will be lucky for these three zodiac signs due to the transformation of the planets sap