Masik Shivratri Rashi Bhavishya: आज ६ मे २०२४ ला चैत्र महिन्यातील शिवरात्री आहे. योगायोग म्हणजे अनेक वर्षांनी सोमवार व शिवरात्रीची तिथी एकच अशी जुळून आली आहे. सोमवार हा भगवान शंकराला समर्पित दिवस मानला जातो त्यामुळे आजच्या शिवरात्रीच्या महत्त्व वाढले आहे. त्याशिवाय आज शिवरात्रीला अनेक दुर्मिळ राजयोग जुळून आले आहेत. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार आज प्रीती योग. आयुष्यमान योग सुद्धा जुळून आला आहे. आजच्या दिवशी महादेवाची आराधना करणाऱ्यांना केवळ आजच नव्हे तर भविष्यातही शिवशक्तीचे बळ मिळू शकते. ज्योतिषशास्त्रानुसार आजची तिथी ही चार राशींसाठी शुभ असणार आहे. या मंडळींना आजपासून ते पुढील शिवरात्रीपर्यंत प्रचंड मोठा लाभ होऊ शकतो.

शिवरात्रीला योगांचा मेळा; आजपासून शिवशंकर ‘या’ राशींवर करणार कृपा वर्षाव

कर्क रास (Cancer Rashi Bhavishya)

तुमच्यासाठी मासिक शिवरात्री खूप शुभ असणार आहे. व्यवसायात नवीन योजना जुळून येतील व त्यातून फायदा होऊ शकतो. धनलाभासाठी तुमचे निर्णय महत्त्वाचे ठरतील. अडकून पडलेले पैसे परत तुमच्याकडे आल्याने आर्थिक स्थिती भक्कम होईल.

सिंह रास (Leo Rashi Bhavishya)

मासिक शिवरात्रीच्या निमित्त सिंह राशीच्या मंडळींना भौतिक सुखाची प्राप्ती होऊ शकते. आपल्या आयुष्यात सुख- समाधान वाढू लागेल. प्रेमसंबंध भक्कम होतील. वाटेतील अडथळे दूर होतील. या दिवशी दान करणे फायद्याचे ठरेल.

मकर रास (Capricorn Rashi Bhavishya)

मकर राशीसाठी हा कालावधी उन्नती व लाभाचा असणार आहे. व्यवसाय वृद्धी होऊ शकते. कामामध्ये यश प्राप्त होऊ शकते. प्रॉपर्टीमध्ये गुंतवणुकीचा विचार करत असल्यास हा कालावधी लाभदायक ठरू शकतो. आजपासून पुढील महिन्याच्या शिवरात्रीपर्यंतचा कालावधी आपल्यासाठी मजा- मस्तीचा ठरेल.

कुंभ रास (Aquarius Rashi Bhavishya)

कुंभ राशीत अगोदरच स्थित असलेले शनीदेव नक्षत्र परिवर्तनासाठी सज्ज झालेले असताना अगोदरच कुंभ राशीची कुंडली सक्रिय झालेली आहे. अशातच आता शिवरात्रीच्या निमित्ताने जुळून आलेले योगायोग आपल्याला लागेल ती सर्व मदत करून जाणार आहेत. आपल्याला आरोग्य, धन, मान- सन्मान अशा सर्व बाजूंनी खूप फायदा होऊ शकतो. शैक्षणिक यश आपल्या वाट्याला येईल. प्रयत्नांना व मेहनतीला मात्र पर्याय नाही.

हे ही वाचा<< १०० वर्षांनी अक्षय्य तृतीयेला शुभ योग; ‘या’ राशींचे नशीब सोन्याहून अधिक चमकणार? मिळू शकते कोट्यवधींचे मालक होण्याची संधी 

मासिक शिवरात्रि 2024 मे पूजेचा मुहूर्त

पंचांगानुसार आज, चैत्र कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी सोमवारी दुपारी २ वाजून ४० मिनिटांनी सुरु होऊन दुसऱ्या दिवशी म्हणजेच ७ मे ला सकाळी ११ वाजून ४० मिनिटांनी समाप्त होईल. संध्याकाळच्या वेळी महादेवाची पूजा करण्याचा शुभ मुहूर्त आहे. निशिता काळात मासिक शिवरात्रीची पूजा करण्याला महत्त्व आहे. आजचा निशिता कालावधी हा रात्री उशिरा म्हणजे ११ वाजून ५६ मिनिटांपरून ते १२ वाजून ३९ मिनिटांपर्यंत असणार आहे. पाऊण तासाच्या या कालावधीत आपण शिवशंकराचे पूजन करू शकता.

Story img Loader