Aries To Pisces Daily Horoscope On 29 November : आज २९ नोव्हेंबर रोजी कार्तिक मासातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी आहे. त्रयोदशी तिथी सकाळी ८ वाजून ४१ मिनिटांपर्यंत राहील, त्यानंतर चतुर्दशी तिथी सुरू होईल. शोभन योग आज दुपारी ४ वाजून ३३ मिनिटांपर्यंत जुळून येईल. तसेच स्वाती नक्षत्र सकाळी १० वाजून १८ मिनिटांपर्यंत जागृत असेल, त्यानंतर विशाखा नक्षत्र दिसेल. राहू काळ सकाळी १० वाजून ३० मिनिटांनी सुरु होईल ते १२ वाजेपर्यंत असेल. त्याशिवाय आज शंकराला समर्पित शिवरात्रीचे व्रत ठेवण्यात येणार आहे. दर महिन्याला येणाऱ्या शिवरात्रीला मासिक शिवरात्री म्हणतात. शिवभक्तांसाठी हा महत्त्वाचा दिवस असतो. तर आज १२ राशींपैकी भोलेनाथ कोणाला आशीर्वाद देणार हे आपण जाणून घेऊया…

२९ नोव्हेंबर पंचांग व राशिभविष्य :

मेष:- बुद्धीला पटेल तोच निर्णय घ्या. संमिश्र घटनांचा दिवस. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. ओळखीच्या लोकांकडून फायदा होईल. दिवस चांगला जाईल.

17th November rashi bhavishya panchang in Marathi | today Horoscope shiv yog rohini nakshatra
१७ नोव्हेंबर पंचांग : रोहिणी नक्षत्रात शिव योगामध्ये मेष ते मीनपैकी कोणाला होईल धनप्राप्ती; तुमचं नशिब फळफळणार का? वाचा राशिभविष्य
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
Guru Nakshatra Gochar 2024
२८ नोव्हेंबरला गुरु बदलणार आपली चाल! ‘या’ राशीच्या लोकांच्या आयुष्यात येणार आनंद, मिळेल अपार धन
shani gochar 2025 | horoscope | astrology
नववर्ष २०२५ मध्ये ‘या’ तीन राशींचे फळफळणार नशीब; शनीच्या मीन राशीतील प्रवेशाने मिळणार बक्कळ पैसा अन् नोकरीत यश
Shani gochar 2025
पुढील १३४ दिवसांचा काळ कमावणार बक्कळ पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार प्रत्येक कामात यश
Gajakesari Yoga
१६ नोव्हेंबरला निर्माण होणार शक्तीशाली गजकेसरी योग! ‘या’ राशींचे लोक जगणार आलिशान आयुष्य, नव्या नोकरीसह होईल धनलाभ
15 November Mesh To Meen Horoscope
१५ नोव्हेंबर पंचांग: कार्तिक पौर्णिमेला कोणाला होईल धनप्राप्ती? जन्मराशीनुसार तुम्हाला पावणार आज भगवान विष्णू व देवी लक्ष्मी; वाचा राशिभविष्य

वृषभ:- आरोग्यात सुधारणा संभवते. मुलांच्या उत्कर्षाचा काळ. व्यापार्‍यांनी अधिक मेहनत घ्यावी. सरकारी कर्मचार्‍यांचे मतभेद होऊ शकतात. उगाचच वादात अडकू नका.

मिथुन:- नवीन संधी दार ठोठावेल. उगाच स्वत:ला एखाद्या वादात अडकवू नका. लाभदायक दिवस. शेअर बाजारातील गुंतवणूक फायदेशीर ठरेल.

कर्क:- अधिकाराचा अति वापर टाळावा. दिवसभर कामात गर्क राहाल. कौटुंबिक जबाबदारीत वाढ होईल. आत्ममग्न राहाल. वैचारिक दिशा बदलून पहावी.

सिंह:- कौटुंबिक सौख्याचा समतोल राखावा. कलाक्षेत्राबाबत अपेक्षित वार्ता मिळतील. हित शत्रू त्रास देण्याचा प्रयत्न करतील. मनातील अनामिक भीती काढून टाकावी. अनोळखी व्यक्तींशी व्यवहार टाळावेत.

कन्या:- कोणतीही गुंतवणूक सावधगिरीनेच करावी. आवक आणि जावक यांचा मेळ घालावा. वाहन चालवताना काळजी घ्यावी. रागावर नियंत्रण ठेवा. समोरील गोष्टीत आनंद शोधावा.

तूळ:- इतरांना सल्ले द्यायला जाल. कामाची दिवसभर धांदल राहील. वरिष्ठांकडून कामाचे कौतुक केले जाईल. एखादी घटना मन विचलीत करू शकते. इच्छा नसताना सुद्धा प्रवास करावा लागू शकतो.

वृश्चिक:- लोकांवर अवलंबून राहू नका. पुढे ढकललेले काम हाती घ्या. मानसिक संतुलन राखावे. मनातील निराशाजनक विचार काढून टाकावेत. उगाचच लपवाछपवी करायला जाऊ नये.

धनू:- दूरदृष्टी ठेवून विचार करावा. योग्य नियोजनावर भर द्यावा. शक्यतो आपल्या मुद्यावर ठाम रहा. कुटुंबातील सदस्यांची साथ लाभेल. व्यवहारात निष्काळजीपणा करू नका.

मकर:- जोडीदाराच्या साथीने मनोकामना पूर्ण करा. व्यवसायात अति विश्वास ठेऊ नका. जुन्या गोष्टी उगाळत बसू नका. कामातील उत्साह वाढीस लागेल. दिवस धावपळीत जाईल.

कुंभ:- फसवणुकीपासून सावध राहावे. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. वडीलधार्‍यांचा योग्य तो मान राखावा. आवडीच्या वस्तु खरेदी कराल. मानसिक शांतता जपावी.

मीन:- कामात मित्रांचा सल्ला घ्याल. अति मसालेदार पदार्थ खाणे टाळावे. वैचारिक समतोल साधावा. उत्साहाने कामे हाती घ्यावीत. भडक विचार मांडू नका.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर