Triekadash Yoga 2025: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह वेळोवेळी संक्रमण करतात आणि लाभ दृष्टी योग निर्माण करतात, ज्याचा मानवी जीवनावर, देशावर आणि जगावर परिणाम होतो. आता ग्रहांचा राजकुमार बुध आणि गुरु ग्रह ५ मे रोजी एकमेकांपासून ६० अंशांच्या कोनीय स्थितीत असतील. ज्योतिषशास्त्रात, या कोनीय स्थितीला ‘त्रि-एकादश’ योग म्हटले जाते. तसेच याला ज्योतिषाच्या पुस्तकांमध्ये ‘लाभ दृष्टी योग’ म्हणून ओळखले जाते. अशा स्थितीत, या त्रि-एकादश योगामुळे काही राशींचे भाग्य उजळू शकते. तसेच, या राशींना करिअर आणि व्यवसायात प्रगती मिळू शकते. चला जाणून घेऊया या भाग्यवान राशी कोणत्या आहेत…

‘या’ राशींचे ‘अच्छे दिन’ येणार?

वृषभ

ज्योतिषशास्त्रानुसार, त्रि-एकादश योग या राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो. सध्या चालू असलेल्या पैशाशी संबंधित समस्या संपू शकतात. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडू शकतात. आर्थिक स्थिती सुधारु शकते. कामाच्या ठिकाणी तुमची प्रगती होण्याची संधी आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही शुभ परिणाम मिळू शकतात. नवीन व्यवसाय किंवा कोणतंही नवीन काम सुरू करण्यासाठी हा शुभ काळ ठरु शकतो. तुमची प्रदीर्घ प्रलंबित कामं पूर्ण होऊ शकतात. आता केलेल्या कोणत्याही गुंतवणुकीतून तुम्हाला भरपूर फायदा मिळू शकतो. व्यवसायातही भरपूर नफा मिळण्याची शक्यता आहे.

कर्क

ज्योतिषशास्त्रानुसार, त्रि-एकादश योग बनल्याने या राशीच्या लोकांना करिअर आणि बिझनेसमध्ये खूप फायदा होऊ शकतो. मुलांकडून आनंद मिळू शकतो. या राशीच्या लोकांना खूप फायदा होऊ शकतो. या काळात तुम्ही देश-विदेशात प्रवास करू शकता. याशिवाय उच्च स्तरावर यश मिळू शकतं. या बरोबरच तुमचा मान-सन्मान वाढू शकतो. नोकरदार लोकांना नोकरीच्या ठिकाणी काही नवीन जबाबदारी मिळू शकते. तसेच, यावेळी तुम्हाला गुंतवणुकीचा फायदा मिळू शकतो. या काळात जे लोक निर्यात आणि आयात व्यवसायात आहेत त्यांना फायदा होऊ शकतो. गेल्या एक वर्षापासून तुम्ही केलेल्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळण्याची दाट शक्यता आहे.

मकर

त्रि-एकादश योग बनल्याने मकर राशींच्या लोकांना शुभ परिणाम मिळू शकतात. व्यवसायात नफा मिळू शकतो. उत्पन्नात घसघशीत वाढ होण्याची शक्यता आहे. अचानक मोठा आर्थिक लाभ होऊ शकतो. या काळात तुम्ही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. तुमच्या आयुष्यात तुम्हाला आनंदच आनंद मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला गुंतवणुकीतून मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी यश मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या सर्व मनोकामना या काळात पूर्ण होऊ शकतात. इतकंच नाही तर उत्पन्नाचे अनेक स्त्रोत निर्माण होऊ शकतात. शेअर मार्केटमधून तुम्हाला भरपूर धनलाभ होऊ शकतो. समाजातही तुम्हाला मान-प्रतिष्ठा मिळण्याची शक्यता आहे.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)