Mercury Gochar 2025: ज्योतिषशास्त्रामध्ये प्रत्येक ग्रहाच्या राशी परिवर्तनाला आणि नक्षत्र परिवर्तनाला अत्यंत खास मानले जाते. या महिन्यामध्ये बऱ्याच ग्रहांच्या नक्षत्र परिवर्तनामध्ये बदल होईल. त्याचा प्रभाव १२ राशींच्या व्यक्तींवर विविध प्रकारे पाहायला मिळेल. ज्योतिषशास्त्रात ग्रहांचा राजकुमार असलेल्या बुध ग्रहाला वाणी, व्यापार व बुद्धीचा कारक ग्रह मानले जाते. पंचांगानुसार, १५ फेब्रुवारी रोजी ५ वाजून ८ मिनिटांनी बुध शततारका नक्षत्रामध्ये प्रवेश करील. या नक्षत्राचा स्वामी ग्रह राहू आहे. राहू आणि बुध मित्र ग्रह असल्यामुळे बुध ग्रहाचे राहूच्या नक्षत्रातील प्रवेश तीन राशींसाठी अत्यंत अनुकूल सिद्ध होईल.
बुध करणार मालामाल
मिथुन
मिथुन राशींच्या व्यक्तींसाठी बुधाचे नक्षत्र परिवर्तन खूप लाभदायी सिद्ध होईल. या काळात तुमच्या भौतिक सुखात वाढ होईल. समाजात मान-सन्मान वाढेल. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल. कुटुंबातही आनंदी आनंद असेल. त्याशिवाय तुम्ही त्यांच्यासोबत पिकनिकचा प्लानदेखील कराल. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. वरिष्ठांची मदत मिळेल. विद्यार्थ्यांसाठीदेखील हा उत्तम काळ आहे. या काळात करिअरमध्ये यश मिळेल; तसेच प्रमोशनही मिळेल.
कन्या
कन्या राशीच्या व्यक्तींनाही बुधाचे नक्षत्र परिवर्तन अत्यंत फायदेशीर ठरेल. या काळात तुमच्या आयुष्यातील सर्व इच्छा-आकांक्षा पूर्ण होतील. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील. आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. कुटुंबीयांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. प्रेमसंबंध सुखमय होतील. आयुष्यात आनंद निर्माण होईल.
कुंभ
कुंभ राशीसाठीही बुधाचे नक्षत्र परिवर्तन अनुकूल ठरेल. या काळात कुंभ राशीच्या व्यक्तींनाही प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. आयुष्यात आनंदी आनंद येईल. या राशीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक स्पर्धेत यश मिळेल. अचानक धनलाभ संभवतो. कामाच्या ठिकाणी दिले गेलेले लक्ष्य पूर्ण कराल. या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खूश असतील. या काळात तुम्हाला प्रत्येक कामात हवे तसे यश मिळेल. आयुष्यात मानसन्मान आणि कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व वाढेल. व्यापारी वर्गाला प्रत्येक कामात यश मिळेल. आरोग्य चांगले राहील.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)