Nichbhang Rajayoga: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे निश्चिक कालावधीनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तनही होते. शिवाय अनेकदा ग्रह उच्च किंवा नीचदेखील होतात. ग्रहांच्या या स्थितीचा प्रभाव १२ राशींच्या व्यक्तींवर विविध परिणाम पाहायला मिळतात. मार्चमध्ये बुधाची नीच राशी असलेल्या मीन राशीत प्रवेश करेल. ज्यामुळे नीचभंग राजयोग निर्माण होईल. या योगाच्या प्रभावाने सर्व राशींच्या व्यक्तींवर विविध प्रभाव पाहायला मिळेल. ज्याचा प्रभावाने अनेकांचे भाग्य चमकेल.

नीचभंग राजयोग करणार कमाल

मेष

Todays Horoscope 9 November In Marathi
९ नोव्हेंबर पंचांग: कष्टाचे फळ, कुटुंबात गोडवा ते जोडीदाराचा सहवास; तुमचा शनिवार जाणार का आनंद-उत्साहात? वाचा १२ राशींचे भविष्य
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
shantanu deshpande bharat shaving company
“…तर ९९ टक्के भारतीय कामावर येणारच नाहीत”, नामांकित कंपनीच्या CEO चं विधान चर्चेत, नेटिझन्समध्ये संमिश्र प्रतिक्रिया!
Image of Ajit Pawar
Ajit Pawar : “पक्ष वगैरे न बघता…” धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर अजित पवारांची मोठी प्रतिक्रिया
Rashi Bhavishya On 31st October 2024
३१ ऑक्टोबर पंचांग: दिवाळीच्या पहिल्या दिवशी कोणाचं नशीब सोन्यासारखं चमकणार? व्यावसायिक क्षेत्रात प्रगती ते अचानक धनलाभ होणार; वाचा १२ राशींचे भविष्य
Aries To Pisces 6th November Horoscope
६ नोव्हेंबर पंचांग: चारचौघात कौतुक, अचानक धनलाभ, जन्मराशीनुसार कोणाची मनोकामना आज पूर्ण होणार; वाचा तुमचे राशिभविष्य
Vinayak Chaturthi special 5th November Rashi Bhavishya
५ नोव्हेंबर पंचांग: विनायक चतुर्थीला ‘या’ राशींना होणार फायदा, भाग्याची साथ ते धनलाभाचे योग; वाचा तुमच्या नशिबात कसं येईल सुख?
maharashtra assembly election 2024
काँग्रेस अखेर शंभरीपार, अर्जमाघारीनंतर सर्वच पक्षांची अंतिम आकडेवारी आली समोर; वाचा काय आहे नेमकं समीकरण!

नीचभंग राजयोग मेष राशीच्या व्यक्तींसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. कारण, हा राजयोग तुमच्या राशीपासून १२ व्या घरात असेल. या काळात तुम्हाला आकस्मिक धनलाभ होईल. तसेच यामुळे तुमचा मानसिक तणावही दूर होईल. या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कर्ज फेडण्यास मदत होईल. इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करण्याची इच्छा पूर्ण होईल. कुटुंबात शुभकार्ये होतील. आरोग्य उत्तम राहील. धार्मिक तीर्थक्षेत्रांना आवर्जून भेटी द्याल. मानसिक तणावातून मुक्त व्हाल, शक्य असल्यास या काळात ध्यानधारणा करा.

वृषभ

वृषभ राशीसाठी देखील नीचभंग राजयोग खूप फायदेशीर ठरेल. हा राजयोग तुमच्या राशीपासून अकराव्या घरात असेल. या काळात तुमच्या पगारात वाढ होईल. करिअरमध्ये हवे तसे यश मिळवता येईल. कुटुंबात आनंदी आनंद असेल.आयुष्यात खूप चांगले बदल पाहायला मिळतील. या काळात तुमच्यात साहस निर्माण होईल. कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल. मान-सन्मान वाढेल. कुटुंबातील व्यक्तींसोबत फिरायला जाल, आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. या काळात जमीन खरेदी करू शकता. मुलांकडून आनंदी वार्ता येतील.

हेही वाचा: राहूचा शनीच्या नक्षत्रातील प्रवेश ‘या’ तीन राशींना देणार; पैसा आणि ऐश्वर्याचे सुख

मीन

नीचभंग राजयोग मीन राशीच्या व्यक्तींसाठी खूप सकारात्मक फळ देणारा ठरेल. हा राजयोग तुमच्या लग्न भावात असेल, या काळात तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल. वैवाहिक जीवनही सुखमय राहील. समाजात मान-सन्मान वाढेल. प्रत्येक कामात कुटुंबीयांची साथ मिळेल. तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. दूरचे प्रवासही घडतील. नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल. तसेच अडकलेले पैसे मिळतील. प्रेमसंबंध सुखमय होतील. नव्या गोष्टींशी जोडले जाल. मानसिक आरोग्य उत्तम असेल. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल.

(टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

Story img Loader