Budh Planet Vakri: ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा जेव्हा एखादा ग्रह राशी परिवर्तन करतो किंवा वक्री होतो तेव्हा त्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर, देशावर आणि जगावर दिसून येतो. बुद्धी आणि व्यवसायाचा दाता असलेला बुध ग्रह १० सप्टेंबर रोजी कन्या राशीत वक्री होत आहे. ज्याचा प्रभाव सर्व राशींवर दिसून येईल. परंतु अशा ३ राशी आहेत ज्यासाठी बुधाचे वक्री होणे विशेषतः फायदेशीर सिद्ध होऊ शकते. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत या राशी…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सिंह: बुध ग्रहाची वक्री स्थिती तुमच्यासाठी फायदेशीर सिद्ध होऊ शकते. कारण तुमच्या गोचर कुंडलीतून बुध ग्रह दुसऱ्या घरात वक्री होणार आहे. जे धन आणि वाणीचे स्थान मानले जाते. त्यामुळे यावेळी अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. या काळात व्यवसायात महत्त्वाचा करार निश्चित होऊ शकतो. तसेच, यावेळी तुम्ही भागीदारीचे काम सुरू करू शकता. ज्यामध्ये चांगला नफा मिळवण्याची क्षमता आहे. दुसरीकडे भाषण आणि मार्केटींग क्षेत्रात काम करणारे, जसे वकील, मार्केटिंग पर्सन आणि शिक्षक, त्यांच्यासाठी हा काळ चांगला सिद्ध होऊ शकतो. यावेळी तुम्हाला कामाच्या ठिकाणी काही मोठी जबाबदारी मिळू शकते.

आणखी वाचा : Chanakya Niti: कितीही प्रेम केले तरी पत्नी ‘या’ ५ गोष्टी लपवतात, ऐकून चकित व्हाल!

वृश्चिक: बुध ग्रहाचं वक्री होणं तुम्हाला व्यवसाय आणि करिअरमध्ये अपार यश देऊ शकेल. कारण तुमच्या गोचर कुंडलीत बुध ११ व्या भावात वक्री होत आहे. ज्याला कुंडलीत विशेष स्थान मानले जाते. तसेच ते उत्पन्न आणि नफ्याचे घर मानले जाते. त्यामुळे यावेळी तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ होण्याची शक्यता आहे. यावेळी तुम्हाला व्यवसाय आणि करिअरमध्ये सुवर्ण यश मिळू शकते. भागीदारीतील संबंधांमध्ये गोडवा येईल. या काळात उत्पन्नाच्या माध्यमात वाढ दिसून येईल. त्याचबरोबर या काळात तुम्हाला नशीबाची साथही मिळेल. यावेळी तुम्हाला कोर्ट केसेसमध्ये यश मिळू शकते. यावेळी तुम्ही पन्ना रत्न घालू शकता. जो तुमच्यासाठी लकी स्टोन ठरू शकतो.

आणखी वाचा : Pitru Paksha 2022: ‘या’ तारखेपासून सुरू होतोय पितृपक्ष पंधरवडा, जाणून घ्या पूजा, विधी आणि महत्त्व

धनु: बुध ग्रहाची वक्री चाल धनु राशीच्या लोकांसाठी फायदेशीर सिद्ध होऊ शकते. कारण दशम भावात बुध ग्रह तुमच्या राशीपासून मागे जाणार आहे. जे व्यवसाय आणि नोकरीचं घर मानली जाते. यावेळी तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. तसेच तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला बढती मिळण्याची दाट शक्यता आहे. त्याचबरोबर व्यवसायातही विस्तार होण्याची शक्यता आहे. तसेच नवीन व्यावसायिक संबंध निर्माण होऊ शकतात. तुमच्या कार्यशैलीतही सुधारणा होईल, ज्यामुळे तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी टाळ्या मिळवू शकता. यावेळी वडिलांसोबतच्या नात्यात गोडवा येईल. तुम्ही वाहने आणि मालमत्ता खरेदी करण्याचा निर्णय घेऊ शकता.

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mercury planet will retrograde in september will be auspicious for these zodiac signs prp