Maha Vipreet Rajyog Zodiac Impact: ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह ठराविक काळानंतर काही ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी काही ग्रहांचा उदय आणि अस्त होतो. यापैकी एक ग्रह म्हणजे बुध. बुध ग्रहाच्या उदय आणि अस्ताचा परिणाम सर्व राशींच्या व्यक्तींवर होतो. मीन राशीत ग्रहांचा राजकुमार बुध ग्रहाचा उदय झाला आहे. बुधदेवाचा उदय होऊन बुधदेवाने ‘महा विपरीत राजयोग’ निर्माण केला आहे. बुध ग्रहाच्या राजयोगाचा सर्व राशीच्या लोकांवर परिणाम होईल. पण तीन राशी आहेत ज्यावर बुध ग्रहाची विशेष कृपा असणार आहे. जाणून घेऊया या भाग्यशाली राशी कोणत्या आहेत.
‘या’ राशींना मिळणार प्रचंड आर्थिक लाभ?
मेष राशी
महा विपरीत राजयोग मेष राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरु शकतो. या काळात तुम्ही प्रगती करू शकता. तसंच तुम्हाला भौतिक सुख मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला अनपेक्षित पैसे मिळू शकतात. तुम्हाला तुमच्या नोकरीत बढती मिळू शकते. बुधाच्या कृपेने तुमच्या संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर कोर्ट-कचेरी प्रकरणांमध्ये यश मिळू शकते. या काळात तुम्हाला वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ मिळू शकतो. कौटुंबिक जीवनात आनंद राहण्याची शक्यता आहे.
(हे ही वाचा : Surya And Guru Conjunction: एप्रिलमध्ये ‘या’ ३ राशी होणार श्रीमंत? १२ वर्षांनी देवगुरु-सूर्यदेवाची युती होताच मिळू शकतो बक्कळ पैसा )
सिंह राशी
सिंह राशीच्या लोकांसाठी महा विपरीत राजयोग शुभ सिध्द होऊ शकतो. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. तुम्ही कोणताही नवीन प्रकल्प सुरू करणार आहात, त्यात तुम्हाला यश मिळण्याची शक्यता आहे. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांना यावेळी चांगला नफा मिळू शकतो. तुम्हाला नोकरीशी संबंधित काही नवीन प्रस्ताव मिळू शकतात. वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता. तसंच कुटुंबात सुख-शांती नांदण्याची शक्यता आहे.
तूळ राशी
विपरीत राजयोगाच्या निर्मितीमुळे या काळात नशीब तूळ राशीच्या लोकांबरोबर असण्याची शक्यता आहे. अडकलेली कामं मार्गी लागू शकतात. गुंतवणुकीतून मोठा आर्थिक लाभ होऊ शकतो. व्यावसायिकांना धनलाभ होण्याची शक्यता आहे. करिअर-व्यवसायात यश मिळू शकते. मुलांकडून काही चांगली बातमी मिळू शकते. या लोकांची आर्थिक स्थिती मजबूत होण्याची शक्यता आहे. समाजात मान सन्मान वाढू शकतो. विवाहित लोकांच्या जीवनात गोडवा निर्माण होऊ शकतो.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)