Budh Gochar in Aries: अंतराळात ग्रह-ताऱ्यांच्या अवस्था सतत बदलत असतात. त्यानुसार राशीभविष्यातही बदल होत असतो. आता लवकरच बुध या मोठ्या ग्रहाचा राशिबदल होत आहे. ज्योतिषशास्त्रातील बुध हा एक महत्त्वपूर्ण ग्रह आहे. बुध हा चंद्रानंतर सर्वात वेगाने राशी बदल करणारा ग्रह आहे. बुध ग्रहाला ग्रहांचा राजकुमार असेही म्हटले जाते. बुध हा बुद्धिमत्ता, पैसा, व्यवसाय, संवाद, वाणी आणि करिअरचा कारक मानला जातो. बुधदेव २६ मार्चला मेष राशीत प्रवेश करणार आहे. काही राशी अशा आहेत ज्यांना बुधदेवाच्या राशी परिवर्तनाने चांगले दिवस अनुभवायला मिळू शकतात. त्यांना आयुष्यात अपार सुख, समृध्दी आणि पैसा मिळण्याची शक्यता आहे. चला तर पाहूयात कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी…

‘या’ राशींचे नशिब पालटणार?

सिंह राशी

या राशीच्या नवव्या भावात बुधदेव गोचर करणार आहेत, त्यामुळे सिंह राशीच्या लोकांना मोठा फायदा होऊ शकतो. या काळात या राशीच्या लोकांचे कामाच्या ठिकाणी कौतुक होऊ शकते. मित्रांकडे अडकलेले पैसे परत मिळू शकतात. घर, संपत्ती विकत घेण्याचा योग जुळून येऊ शकतो. नवे आर्थिक स्रोत या काळात खुले होऊ शकतात. या काळात सिंह राशीच्या उत्पन्नात अचानक वाढ होण्याची शक्यता आहे. व्यवसायातून मोठी कमाई होऊ शकते.

Malavya Yoga and Kendra Trikon Rajyoga 2025
२०२५मध्ये ग्रहांचा अद्भुत संयोग! मीन राशीत निर्माण होईल केंद्र त्रिकोण-मालव्य राजयोग; नोकरीत होईल पदोन्नती, अचानक होईल आर्थिक लाभ
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Guru Asta 2025 Guru will set for 27 days in the new year
Guru Ast 2025: नवीन वर्षात २७ दिवसांनी अस्त होणार गुरू! ‘या’ राशींची होणार चांदी, झटपट वाढेल पगार
Budh Margi 2024
बुध चालणार सरळ चाल, ‘या’ तीन राशींचे उजळणार नशीब; मिळणार अपार पैसा अन् धन
Mangal Rashi Parivartan 2024
४२ दिवसानंतर नुसता पैसा; मंगळाच्या राशी परिवर्तनाने ‘या’ तीन राशीच्या व्यक्ती होणार भाग्यवान
Shani Budh Yuti 2025 astrology
Shani Budh Yuti 2025 : नवीन वर्षात सोन्याचा हंडा घेऊन लक्ष्मी ठोठावेल ‘या’ राशींच्या मंडळींचे दार? शनी-बुधाच्या संयोगाने होऊ शकाल लखपती
Shani Nakshatra transformation 2024
२०२५ सुरू होण्याआधीच शनी देणार बक्कळ पैसा; नक्षत्र परिवर्तनाने मिळणार पैसा आणि प्रतिष्ठा
Shukra Budh Labh Yog
चार दिवसानंतर अचानक पलटणार या ३ राशींचे नशीब, शुक्र-बुधच्या लाभ दृष्टीचा दुर्मिळ योग

(हे ही वाचा : येत्या दोन महिन्यात माता लक्ष्मी ‘या’ ५ राशींना देणार अपार धन? ‘गजलक्ष्मी राजयोग’ बनल्याने गडगंज श्रीमंती कोणाच्या नशिबात? )

धनु राशी

या राशीच्या पाचव्या भावात बुधदेवाचे गोचर करणार आहे. या काळात एखादे प्रलंबित सरकारी काम पूर्ण होऊ शकते. या काळात तुम्ही नवीन घर किंवा नवीन कार खरेदी करू शकता. मालमत्तेच्या वादाशी संबंधित प्रकरणांमध्ये यश मिळू शकते. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होण्याची शक्यता आहे. वडिलोपार्जित संपत्तीतूनही आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. बुधाच्या राशी बदलामुळे तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. 

मकर राशी

या राशीच्या चतुर्थ भावात बुधदेव गोचर करणार आहेत. त्यामुळे या राशीच्या लोकांना सुखाचे दिवस अनुभवता येऊ शकतात. तुमची आर्थिक स्थिती चांगली होण्याची शक्यता आहे. तुम्हाला कुठूनतरी पैसे मिळू शकतात. या काळात तुमचा मान-सन्मान वाढण्याची शक्यता आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ अत्यंत शुभ ठरु शकतो. तुमच्या कुटुंबियांकडून तुम्हाला वेळोवेळी मदत होऊ शकते.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे) 

 

Story img Loader