Budh Gochar May 2024: ग्रहांचा राजकुमार बुध (Mercury) हा बुद्धिमत्ता आणि वाणीचा कारक मानला जातो. बुध ग्रहाने चाल बदलली तर याचा परिणाम प्रत्येक राशीच्या व्यक्तींच्या जीवनावर होतो. बुध हा बुद्धिमता, संवाद आणि निर्णय क्षमतेचा कारक मानला जातो. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचा राजकुमार बुधदेव मे महिन्यात दोन वेळा आपली स्थिती बदलणार आहे. सर्वात आधी बुधदेव १० मे ला मेष राशीत प्रवेश करणार आहे. तर ३१ मे ला वृषभ राशीत गोचर करणार आहे. प्रत्येक ग्रह ठराविक वेळेनंतर आपली रास बदलतो. बुध ग्रह हा महिन्यातून एकदा संक्रमण करतो. पण मे महिन्यात बुध देव दोनदा आपली राशी परिवर्तन करणार आहे. बुध ग्रहाच्या दोन वेळा राशी परिवर्तनामुळे काही राशींच्या नशिबाचं दार उघडण्याची शक्यता आहे. चला तर पाहूया, कोणत्या आहेत, या भाग्यशाली राशी…

‘या’ राशींचे भाग्य चमकणार?

मेष राशी

मे महिन्यातील बुधाचं दोनदा गोचर मेष राशीच्या लोकांसाठी शुभ सिद्ध होऊ शकते. या काळात तुम्हाला अनपेक्षित पैसे मिळू शकतात. सध्याच्या नोकरीत तुमच्या इच्छेनुसार बढती आणि पगारवाढ मिळू शकतो. आर्थिक लाभासोबतच तुमच्या कामाच्या ठिकाणीही प्रगतीची शक्यता आहे. अनेक रखडलेल्या योजना पुन्हा सुरू होऊ शकतात. छोट्या व्यवसायातही जास्त नफा मिळण्याची शक्यता आहे. अविवाहित आहेत त्यांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात.

Guru Margi 2025
३ दिवसानंतर ‘या’ पाच राशींच्या नशिबाचे टाळे उघडणार, गुरूच्या कृपेने मिळेल अपार पैसा, धन- संपत्ती अन् यश
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Saturn and Sun Yuti 2025
शनी-सूर्याची युती बक्कळ पैसा देणार; ‘या’ तीन राशीच्या व्यक्ती कमावणार पद, पैसा अन् मान-सन्मान
saturn transit 2025
येणारे ५६ दिवस शनी देणार गडगंज श्रीमंती; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींचे प्रेम संबंध अन् आर्थिक स्थिती सुधारणार
Mars Gochar 2025
पुढील ५७ दिवस मंगळ देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींचे भाग्य चमकणार
february 2025 grah gochar budh surya mangal gochar
फेब्रुवारीमध्ये ‘या’ ४ राशींची होईल चांदीच चांदी! अचानक धन लाभ अन् भाग्योदय होण्याचा प्रबळ योग
Budh gochar in makar january
आता नुसती चांदी; बुधाचा शनीच्या राशीतील प्रवेश ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींचे भाग्य चमकवणार, भरपूर पैसा देणार
six-planet-planet-will-making-in-pataka-yog-effect-of-all-zodiac-sign
१०० वर्षांनी मंगळ, गुरु, शुक्र आणि शनी आकाशात निर्माण करत आहे ‘पताका योग’, १२ राशींवर कसा होईल परिणाम?

(हे ही वाचा:२४ तासांनी ‘या’ ६ राशींच्या नशिबाला मिळेल श्रीमंतीची कलाटणी? शुक्रदेवाच्या कृपेमुळे व्यापारात होऊ शकतो मोठा फायदा)

कर्क राशी

बुधाचं दोनदा गोचर कर्क राशीच्या लोकांसाठी लाभदायी ठरु शकते. व्यवसाय परदेशाशी संबंधित असलेल्या लोकांना यावेळी चांगला आर्थिक लाभ मिळू शकतो. यावेळी या राशीच्या व्यक्तींना सर्व भौतिक सुखं मिळू शकतात. व्यावसायिकांना यावेळी चांगला नफा मिळू शकतो. तुम्हाला प्रेमसंबंधांमध्ये यश मिळू शकते. कुटुंबातील वातावरण प्रसन्न राहण्याची शक्यता आहे. 

सिंह राशी

सिंह राशीच्या लोकांना बुधदेवाच्या कृपेने अचानक धनलाभ होऊ शकतो. बुध संक्रमणामुळे तुमच्या आयुष्यात काही महत्त्वाचे बदलही घडून येऊ शकतात. या काळात अडकलेली कामं मार्गी लागून आणि अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. या लोकांची आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते. स्पर्धा परीक्षा आणि सरकारी नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्यांना शुभ बातमी मिळण्याची शक्यता आहे. या काळात पैशाची बचत करण्यात तुम्ही यशस्वी होऊ शकाल. समाजात मान सन्मान वाढू शकतो.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

Story img Loader