Mercury Transit In Leo: ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रहाचे ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन पाहायला मिळते. बुध ग्रहाला बुद्धी आणि वाणीचा कारक ग्रह मानला जातो. १९ जुलै रोजी बुध ग्रहाने सिंह राशीत प्रवेश केला असून बुध २१ ऑगस्टपर्यंत या राशीत राहील. या राशीत बुध ३१ दिवस उपस्थित राहील. त्यानंतर बुध वक्री होऊन कर्क राशीत प्रवेश करेल. बुधाचे हे राशी परिवर्तन काही राशींच्या व्यक्तींसाठी लाभदायी सिद्ध होईल.
बुध ग्रहाचा सिंह राशीत प्रवेश (Mercury Transit In Leo)
मिथुन
मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी बुध ग्रहाचे सिंह राशीतील राशी परिवर्तन खूप लाभदायी सिद्ध होईल. या काळात तुमचा भाग्योदय होईल. मेहनत केलेल्या कामात हवे तसे यश मिळविता येईल. आर्थिक परिस्थिती उत्तम होईल. करिअर व व्यवसायात मनासारखे यश प्रस्थापित कराल. अडकलेले पैसे परत मिळतील. कुटुंबीयांसोबतचे संबंध अधिक दृढ होतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील.
सिंह
सिंह राशीच्या व्यक्तींसाठीदेखील बुध ग्रहाचे राशी परिवर्तन खूप शुभ परिणाम देणारे ठरेल. या काळात समस्यांपासून सुटका होईल. ताणतणाव दूर होण्यास मदत होईल. मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील. सिंह राशीच्या व्यक्तींची आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. समाजात मान-सन्मान प्राप्त होईल. कर्ज फेडण्यास मदत होईल. वाहन, मालमत्ता खरेदी करण्याची इच्छा पूर्ण कराल. धार्मिक कार्यात मन रमेल. आयुष्यात काही अडचणी येतील; पण तुम्ही त्या दूर करण्यास सक्षम असाल.
हेही वाचा: पुढचे २५१ दिवस शनीची कृपा! ‘या’ तीन राशीधारकांना मिळणार पैसा, मान-सन्मान आणि प्रसिद्धी
कुंभ
बुधाचे राशी परिवर्तन कुंभ राशीच्या व्यक्तींसाठीदेखील खूप शुभ फळ देणारे ठरेल. हा काळ या राशीच्या व्यक्तींसाठी खूप उत्तम ठरेल. या काळात कुंभ राशीच्या व्यक्तींची आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. आयुष्यात अनेक मोठे बदल पाहायला मिळतील. कर्ज फेडण्यास मदत होईल. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. वरिष्ठांची मदत मिळेल. विद्यार्थ्यांसाठीही हा उत्तम काळ आहे. या काळात करिअरमध्ये यश मिळेल, तसेच पदोन्नतीही मिळेल.
(टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)