Budh Gochar 2025: ज्योतिषशास्त्रानुसार, बुध ग्रह नवग्रहांमधील राजकुमार ग्रह म्हणून ओळखला जातो. ग्रहांचा राजकुमार बुध हा बुद्धिमत्ता आणि वाणीचा कारक मानला जातो. बुध ग्रहाने चाल बदलली तर याचा परिणाम प्रत्येक राशीच्या व्यक्तींच्या जीवनावर होतो. आता वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचा राजकुमार बुधदेव मे महिन्यात दोन वेळा आपली स्थिती बदलणार आहे. सर्वात आधी बुधदेव ७ मे ला मेष राशीत प्रवेश करणार आहे. तर २३ मे ला वृषभ राशीत गोचर करणार आहे. बुध ग्रहाच्या दोन वेळा राशी परिवर्तनामुळे काही राशींच्या नशिबाचं दार उघडण्याची शक्यता आहे. चला तर पाहूया, कोणत्या आहेत, या भाग्यशाली राशी…
बुधदेव ‘या’ राशीच्या लोकांना धनवान बनवणार?
मेष
मे महिन्यातील बुधाचं दोनदा गोचर मेष राशीच्या लोकांसाठी शुभ सिद्ध होऊ शकते. या ग्रहाच्या स्थिती बदलामुळे काही राशींच्या व्यक्तींना आयुष्यात मोठा लाभ होऊ शकतो. या राशीच्या लोकांना करिअरमध्ये नवी संधी मिळू शकते. अचानक पैसे मिळू शकतात. नातेवाईकांशी संबंध सुधारू शकतात.
मिथुन
बुधाचं दोनदा गोचर मिथुन राशीच्या लोकांसाठी लाभदायी ठरु शकते. तुमच्या प्रमोशनची चर्चा होऊ शकते. उत्पन्नात वाढ होण्याचीही शक्यता आहे. यावेळी तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळू शकते. आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते. वैवाहिक जीवन आनंदी राहील.
सिंह
बुध ग्रहाचं गोचर सिंह राशीच्या लोकांसाठी सकारात्मक ठरू शकणार आहे. व्यवसायात तुम्हाला मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे. प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. मान-सन्मानात वाढ होऊ शकते. या काळात या राशीच्या लोकांना मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे.
धनू
धनू राशीच्या लोकांना बुधदेवाच्या कृपेने अचानक धनलाभ होऊ शकतो. व्यवसायात विशेष प्रगती दिसून येऊ शकते. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळू शकते. परदेश प्रवासाची संधी मिळू शकते. बेरोजगारांना नवीन नोकरीच्या संधी मिळू शकतात. या काळात तुमच्या सुखसोयींमध्ये वाढ होऊ शकते.
मीन
मे महिन्यात बुध ग्रह दोनदा राशी परिवर्तन करणार असल्याने मीन राशीच्या लोकांना मोठा फायदा होऊ शकतो. प्रेमसंबंधात यश मिळू शकते. कामाच्या ठिकाणी चांगली बातमी मिळू शकते. वडिलोपार्जित मालमत्तेतून फायदा होण्याची शक्यता आहे. नियोजित योजना यशस्वी होऊ शकतात.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)