ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रहाचे शनिच्या कुंभ राशीत संक्रमण झाल्याने बुधादित्य राजयोग तयार होत आहे. तर दुसरीकडे इतर अनेक ग्रहही आपली राशी बदलणार आहेत. ज्यामुळे विविध राजयोग तयार होणार आहेत. हे राजयोग तयार झाल्याने काही राशींना त्याचा भरपूर फायदा होईल. चला तर मग जाणून घेऊया या भाग्यशाली राशींबद्दल ज्यांच्यासाठी हा काळ शुभ ठरेल..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मिथुन राशी

२७ फेब्रुवारीला बनणाऱ्या राजयोगामुळे मिथुन राशीचे चांगले दिवस सुरु होऊ शकतात. यावेळी तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची शक्यता दिसत आहे. ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. तसंच याकाळात तुम्हाला उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले होतील. तसंच नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला वेतनवाढ किंवा पदोन्नती होण्याची शक्यता दिसत आहे. तसंच कुटुंबियांसोबत देखील तुम्ही याकाळात चांगला वेळ घालवाल..

कन्या राशी

८ दिवसांनी कन्या राशींच्या लोकांचे चांगले दिवस सुरू होऊ शकतात. या काळात तुम्ही एखादे नवीन वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता. तसंच जर तुम्ही नोकरी करत असाल तर या काळात तुम्हाला पदोन्नती किंवा पगारवाढीची शक्‍यता दिसत आहे. तसंच बऱ्याच काळापासून रखडलेल्या गोष्टी या काळात पूर्ण होऊ शकतात. याकाळात तुम्हाला तुमच्या मित्राची साथ लाभेल, ज्यामुळे तुमची बरीच कामे मार्गी लागतील. तसेच येणाऱ्या काळात तुम्हाला उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले होतील.

( हे ही वाचा: ‘हे’ आहे जगातील सर्वात लहान नाव असलेले रेल्वे स्टेशन; वाचून तुम्हीही थक्क व्हाल)

धनु राशी

२७ फेब्रुवारी नंतर तयार होणाऱ्या राजयोगामुळे धनु राशीला चांगला फायदा होईल. याकाळात तुम्हाला अचानक धनालाभ होण्याची शक्यता दिसत आहे, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. तसेच तुम्हाला कुटुंबीयांची चांगली साथ मिळेल. तुम्ही याकाळात लांबचा प्रवास करू शकता. तसेच जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर तुम्हाला चांगला नफा होईल. याकाळात तुमचे जोडीदारासोबत असले नाते सुधारेल. आधीपासून चालू असलेले मतभेद दूर होतील.

( वरील बातमी माहिती आणि गृहीतके यांवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mercury transit february 27 in shani zodiac sign kumbh these zodiac sign can get more money of 4 rajyog gps