Mercury Transit In Gemini 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह ठराविक कालावधीनंतर राशिबदल करीत असतो. अशात २६ ऑगस्टला मंगळ ग्रहाचा मिथुन राशीत प्रवेश होणार आहे. त्यामुळे २६ ऑगस्ट म्हणजे कृष्णन्माष्टमी उत्सवानंतरचा काळ काही राशींसाठी खूप शुभ असणार आहे. मंगळ मिथुन राशीत प्रवेश करीत असल्याने काही राशीधारकांना अचानक धनलाभ अन् सुखाचे दिवस अनुभवता येऊ शकतात.

ज्योतिषशास्त्रानुसार २६ ऑगस्टला मंगळ मिथुन राशीत गोचर करेल आणि ५५ दिवस या राशीत राहील. मंगळाला सर्व ग्रहांचा सेनापती, असे म्हटले जाते. मंगळाला ऊर्जा, भूमी, सामर्थ्य, धैर्य, पराक्रम, शौर्याचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे मंगळाच्या राशी परिवर्तनाने काही राशीधारकांच्या आयुष्याच सोन्याचे दिवस येण्याची शक्यता असते.

Read More Astrology Related News : नोव्हेंबरपर्यंत ‘या’ राशींवर शनिदेवांची विशेष कृपादृष्टी, मिळेल अमाप पैसा अन् मानसन्मानात होईल वाढ! प्रत्येक कामात यशाची शक्यता

मिथुन

मंगळाचे राशी परिवर्तन मिथुन राशीधारकांसाठी अधिक फलदायी ठरू शकते. या काळात मिथुन राशीच्या लोकांची आर्थिक बाजू अधिक मजबूत होण्याची शक्यता आहे. विविध आर्थिक गुंतवणुकीतून त्यांना फायदा होऊ शकतो. त्यांचे कौटुंबिक जीवन आनंदी आणि सुखाचे असेल. मंगळ देवाच्या कृपेने जीवन आनंदमय होईल. अवाजवी खर्च कमी होण्याची शक्यता आहे. तसेच व्यवहारासाठी हा काळ अतिशय शुभ राहील.

सिंह

मंगळाचा राशिबदल सिंह राशीच्या लोकांसाठी शुभ ठरू शकतो. या काळात ज्यांना मंगळाचा आशीर्वाद राहील, त्यांना नवीन घर किंवा प्रॉपर्टी खरेदी किंवा कोणत्याही नवीन शुभ कार्यासाठी हा काळ शुभ आहे. वैवाहिक जीवन आनंदी राहील. आर्थिक व्यवहारासाठीही हा काळ शुभ असेल; पण कोणतेही आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी काळजी घ्या. या काळात तुमची आर्थिक स्थिती चांगली होऊ शकते.

कन्या

मंगळाच्या कृपेने तुम्हाला तुमच्या कामात यश मिळू शकते. नवीन घर आणि वाहन खरेदी करण्यासाठी ही शुभ काळ आहे. व्यवसायासाठीदेखील हा अतिशय शुभ काळ आहे, आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. पण, या वर्षी तुम्हाला खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल.

धनू

मंगळाच्या राशी परिवर्तनाने धनू राशीच्या लोकांच्या आयुष्यात ‘अच्छे दिन’ सुरू होण्याची शक्यता आहे. या काळात त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल. गुंतवणुकीसाठी हा अधिक चांगला काळ आहे. नवीन वाहन खरेदी करू शकता. आर्थिक व्यवहारांसाठी हा काळ उत्तम आहे. त्याशिवाय मंगळाच्या आशीर्वादाने तुमचे उत्पन्नाचे स्रोत वाढण्याची शक्यता आहे.

(वरील बातमी ही माहितीवर आधारित आहे. त्यामुळे दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असल्याचा दावा आम्ही करत नाही.)

Story img Loader