Mercury Transit: ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रह ठराविक वेळेनंतर राशीपरिवर्तन करतो. मे महिन्यात अनेक ग्रहांचे राशीपरिवर्तन होणार आहे. त्यानुसार येत्या १० मे रोजी संध्याकाळी ७ वाजून ३ मिनिटांनी बुध ग्रह मीन राशीतून मेष राशीत प्रवेश करील. या राशीत बुध २१ दिवस असेल. ज्योतिषशास्त्रात बुध ग्रहाला बुद्धी, वाणी, संवाद, तर्क, मित्रता यांचा कारक ग्रह मानले जाते. कुंडलीत बुध शुभ स्थितीत असल्यास व्यक्तीचे भाग्य उजळते व त्याला करिअरमध्येही भरपूर यश मिळते. १० मे रोजी होणाऱ्या बुधाच्या मेष राशीतील संक्रमणाने हा २१ दिवसांचा काळ काही राशींसाठी खास असणार आहे.

मिथुन

Budh-Rahu Yuti 2025
‘या’ तीन राशी कमावणार नुसता पैसा; बुध-राहूची युती मिळवून देणार यश, कीर्ती अन् श्रीमंतीचे सुख
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
Shani Gochar 2025
पुढील ४७ दिवस शनी देणार नुसता पैसा; ‘या’ राशींच्या व्यक्तींचे भाग्य चमकणार अन् नवी नोकरी मिळणार
Guru Margi 2025
Guru Margi 2025 : पुढचे ७० दिवस गुरूच्या कृपेने ‘या’ चार राशी होतील मालामाल, मिळेल मनाप्रमाणे , पगार, धनसंपत्ती, अन् प्रेम
Surya gochar 2025
६ दिवसानंतर सूर्याचा शनीच्या राशीतील प्रवेश देणार भरपूर पैसा; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार सुख-समृद्धी आणि मान-सन्मान
Mangal Margi 2025
१८ दिवसानंतर बदलणार ‘या’ तीन राशींचे नशीब, मंगळच्या सरळ चालीमुळे धनाने भरेल झोळी; तुमची रास आहे का नशीबवान?
budh uday 2025 today horoscope
Budh Uday 2025 : बुधाच्या उदयाने ‘या’ राशींच्या लोकांच्या नशिबाला मिळणार कलाटणी; व्हाल कोट्याधीश अन् जगाल आनंदी जीवन
Saturn and Sun Yuti 2025
शनी-सूर्याची युती बक्कळ पैसा देणार; ‘या’ तीन राशीच्या व्यक्ती कमावणार पद, पैसा अन् मान-सन्मान

बुध ग्रहाच्या मेष राशीतील संक्रमणाने मिथुन राशीच्या व्यक्तींनादेखील त्याचे शुभ परिणाम पाहायला मिळतील. या काळात मिथुन राशीच्या व्यक्तींना सुख-समृद्धी, पद-प्रतिष्ठा प्राप्त होईल. आकस्मिक धनलाभ होतील, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थितीदेखील मजबूत होईल. वैवाहिक जीवनदेखील सुखमय असेल, आपल्या पार्टनरसोबत सुखाचे क्षण व्यतीत कराल. प्रत्येक कामात यश मिळेल, नोकरीमध्येदेखील हवे तसे यश मिळवता येईल. स्पर्धापरीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल आहे.

सिंह

सिंह राशीच्या व्यक्तींसाठीदेखील बुध ग्रहाचे मेष राशीतील संक्रमण खूप लाभकारी सिद्ध होईल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल, फक्त खर्च विचार करून करा. वायफळ खर्च करण्यावर नियंत्रण ठेवा. कुटुंबातील सदस्यांसोबत जिव्हाळ्याचे संबंध निर्माण होतील, जुनी भांडणं विसरून जाल. तुमच्या वाणीमध्ये आणि वागण्यात नम्रता येईल. वैवाहिक आयुष्यातदेखील प्रेम अधिक निर्माण होईल, मुलांकडून आनंदवार्ता येतील.

कन्या

बुध ग्रहाच्या मेष राशीतील संक्रमणाने कन्या राशीच्या व्यक्तींनादेखील त्याचे चांगले परिणाम पाहायला मिळतील. आयुष्यात आनंदाचे नवीन क्षण येतील. कार्यक्षेत्रात यश मिळवाल. नवी नोकरी शोधणाऱ्यांना हवी तशी नोकरी मिळेल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. खर्चावर नियंत्रण ठेवाल. भाग्याची पूर्ण साथ मिळेल. मित्रांसोबत पिकनिकचा प्लान कराल.

हेही वाचा: कर्जात घट अन् पगारात वाढ! वृषभ राशीतील चार ग्रहांच्या युतीने ‘या’ राशींना लागणार जॅकपॉट

धनु

धनु राशीच्या व्यक्तींनादेखील बुधाचे मेष राशीतील संक्रमण फायदेशीर ठरेल. बुधाच्या शुभ प्रभावाने तुम्हाला उत्पन्नाचे नवे मार्ग सापडतील. सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. नव्या वस्तू खरेदी कराल. नोकरीत प्रमोशन मिळेल. कुटुंबीयांसोबत प्रवास कराल. स्पर्धापरीक्षेत यश मिळेल, केवळ कष्टाची तयारी कायम ठेवा.

Story img Loader