Budh Gochar 2023 in Dhanu: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, बुध ग्रह हा बुद्धिमत्ता, संवाद आणि निर्णय क्षमतेचा कारक आहे. बुध देवाला सर्व ग्रहांचा राजा म्हटले जाते. कुंडलीमध्ये बुधची स्थिति उत्तम असली तर व्यक्तिची क्षमता वाढते तर बुधची स्थिती उत्तम नसेल तर व्यक्तीच्या जीवनात अनेक चढ-उतार येत असतात. बुधदेव सध्या वृश्चिक राशीत विराजमान झाले आहेत. २७ नोव्हेंबरपर्यंत बुध वृश्चिक राशीत असतील. त्यानंतर बुध धनु राशीत उदय स्थितीत येणार आहेत. विशेष म्हणजे, नवीन वर्षाच्या आधी होणारे बुध उदय काही राशींच्या लोकांसाठी खूप शुभ ठरु शकते. चला तर जाणून घेऊया बुध उदयाचा कोणत्या राशींना लाभ होऊ शकतो.
‘या’ राशी होतील मालामाल?
कन्या राशी
बुध उदय स्थितीत आल्यानंतर कन्या राशीच्या लोकांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. या काळात रखडलेली कामे मार्गी लागू शकतात. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. कामात मोठे यश मिळू शकते. नोकरीत पद वाढू शकते. व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो. या राशीतील लोकांना मनासारखा जोडीदार लवकरच मिळण्याची शक्यता आहे.
(हे ही वाचा : ५ वर्षांनी मंगळ-केतुची युती बनल्याने धनुसह ‘या’ ३ राशी होऊ शकतात कोट्यधीशांच्या मालक, लाभू शकते अपार धन)
धनु राशी
बुध उदय धनु राशीच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरु शकते. या लोकांच्या जीवनात आनंद येऊ शकतो. समाजात मान-सन्मान वाढण्याची शक्यता आहे. नोकरीत बढती मिळण्याची आणि पगारात वाढ होण्याची दाट शक्यता आहे. या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकतो. यावेळी राजकारणाशी संबंधित असलेल्या लोकांच्या आयुष्यात यशाचा काळ सुरू होऊ शकतो.
कुंभ राशी
बुध उदय कुंभ राशीच्या लोकांसाठी अच्छे दिन घेऊन येणार ठरु शकतो. तुम्हाला जीवनात अनेक शुभ आणि चांगल्या संधी मिळू शकतात. जे लोकं व्यवसाय करतात त्यांना मोठा आणि चांगला नफा मिळू शकतो. उत्पन्नाचे नवीन आयाम उघडून संपत्तीत अचानक वाढ होऊ शक्यता आहे. अडकलेला पैसा परत येऊ शकतो. स्पर्धा परीक्षांसाठी बसलेल्या विद्यार्थ्यांना अपेक्षित निकाल मिळू शकतो.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)