नवग्रहांमध्ये बुध ग्रहाला राजकुमाराचा दर्जा देण्यात आला आहे. व्यापार, बुद्धीचा कारक ग्रह म्हणून पाहिलं जातं. बुध ग्रहाचं एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करताच बऱ्याच घडामोडी घडतात. धन, व्यवसाय आणि बुद्धिमत्ता देणारा बुध पुढील १७ दिवस काही राशींसाठी फलदायी ठरु शकतो. बुध सध्या सिंह राशीत आहे आणि प्रतिगामी वाटचाल करत आहे आणि १५ सप्टेंबरपर्यंत प्रतिगामी स्थितीत राहतील. या प्रतिगामी काळात बुध तीन राशींच्या लोकांना भरपूर लाभ देऊ शकतात. करिअर आणि पैशाच्या बाबतीत त्यांना मोठा दिलासा मिळू शकतो. पुढील १७ दिवस बुधदेवाची कोणत्या राशींवर कृपा राहिल, जाणून घेऊया…
बुधदेवाची कोणत्या राशींवर राहिल कृपा?
वृषभ
बुधाची प्रतिगामी गती वृषभ राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरू शकते. तुमच्या पारगमन कुंडलीत बुध ग्रह संपत्तीचा कारक आहे, जो तुम्हाला या १७ दिवसात बरेच फायदे देऊ शकतो. या राशीच्या लोकांना नोकरीशी संबंधित उत्कृष्ट परिणाम आणि कामाच्या ठिकाणी संधी मिळू शकतात. तणावातून आराम मिळू शकतो.
(हे ही वाचा : दोन महिन्यानंतर शनीदेव मार्गी होताच ‘या’ राशींना देणार अपार धन? माता लक्ष्मीच्या कृपेने होऊ शकता कोट्याधीश )
कर्क
प्रतिगामी बुध कर्क राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरू शकते. या काळात अनेक उत्तम संधी उपलब्ध होऊ शकतात. व्यवसायात चांगला व्यवहार करू शकाल. नोकरदार लोकांना नोकरी इत्यादींमध्येही भरपूर यश मिळू शकतो. शेअर बाजारात पैसे गुंतवल्याने फायदा होऊ शकतो.
तूळ
बुधदेवाचे प्रतिगामी राहणे तूळ राशींच्या लोकांसाठी खूप शुभ आणि फलदायी ठरू शकते. बुध विशेषत: व्यावसायिकांना मोठा लाभ देऊ शकतो. तुम्हाला मोठी ऑर्डर मिळू शकते किंवा डील कन्फर्म होऊ शकते. मान-सन्मान मिळू शकतो. या काळात अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)