Budh Gochar 2025: ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रहाला वाणी, व्यापार व बुद्धीचा कारक ग्रह मानला जातो. इतर ग्रहांप्रमाणे बुध ग्रहाचे राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तनही खूप खास मानले जाते. बुध ग्रहाला एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्यासाठी जवळपास ३० दिवसांचा कालावधी लागतो. बुध जानेवारीच्या सुरूवातीला मकर राशीत प्रवेश करणार असून त्याचा शुभ प्रभाव १२ पैकी काही राशीच्या व्यक्तींवर पाहायला मिळेल.
बुधाचे राशी परिवर्तन करणार कमाल
मेष
मेष राशींच्या व्यक्तींसाठी बुधाचे राशी परिवर्तन खूप फायदेशीर ठरेल. या काळात तुमची आर्थिक समस्येपासून सुटका होईल. आरोग्यसमस्यादेखील दूर होतील. घरात आनंदाचे वातावरण राहील. मनातील सर्व इच्छा सहज पूर्ण होतील. मेहनतीचे फळ मिळेल आणि विद्यार्थ्यांनाही हवे तसे यश मिळेल. त्याशिवाय शिक्षणात प्रगती होईल. या काळात भौतिक सुखात वाढ होण्याची शक्यता आहे. सर्व अडकलेली कामे पूर्ण होतील. या काळात आरोग्य उत्तम राहील.
धनु
धनु राशीच्या व्यक्तींसाठी बुधाचे राशी परिवर्तन अत्यंत अनुकूल सिद्ध होईल. व्यापारात वाढ होईल. सराकारी नोकरीच्या तयारीत असणाऱ्यांना यश मिळेल. या काळात नव्या नोकरीची ऑफर मिळेल किंवा नोकरीत पगारवाढ होईल. या काळात तुमच्यात साहस निर्माण होईल. कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल. मान-सन्मान वाढेल. कुटुंबातील व्यक्तींसोबत फिरायला जाल, आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. या काळात जमीन खरेदी करू शकता.
हेही वाचा: ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; सूर्य-शुक्राची युती नव्या वर्षात करणार मालामाल
मकर
मकर राशीच्या व्यक्तींनादेखील बुधाचे राशी परिवर्तन खूप फायदेशीर ठरेल. या काळात तुम्हाला अनेक आकस्मिक धनलाभ होतील. प्रत्येक कामात कुटुंबीयांची साथ मिळेल. तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. दूरचे प्रवासही घडतील. नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल. तसेच अडकलेले पैसे मिळतील. प्रेमसंबंध सुखमय होतील. नव्या गोष्टींशी जोडले जाल. मानसिक आरोग्य उत्तम असेल. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल.
(टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)