7th August 2024 Marathi Panchang & Rashi Bhavishya: आज ७ ऑगस्ट २०२४ रोजी श्रावण महिन्यातील शुल्क पक्षातील तृतीया तिथी आहे. बुधवारी पूर्वा फाल्गुनी नक्षत्र रात्री ८ वाजून ८ मिनिटांपर्यंत जागृत असणार आहे. राहू काळ दुपारी १२ वाजून २० मिनिटांपासून सुरु होईल आणि १ वाजून ५९ मिनिटांपर्यंत असेल. तर अभिजित मुहूर्त सकाळी ११ वाजवून ५४ मिनिटांपासून सुरु होईल ते १२ वाजून ४६ मिनिटांपर्यंत असेल. तर मेष ते मीन राशींचा आठवड्याचा तिसरा दिवस कसा जाईल ? कोणावर बरसणार सुख तर कोणाला घ्यावी लागेल आरोग्याची काळजी हे ज्योतिषी विद्याधर करंदीकर यांच्याकडून जाणून घेऊ या…

०७ ऑगस्ट पंचांग व राशीभविष्य :

In 17 days, these three zodiac signs will live a life of luxury and comfort
१७ दिवसांनी ‘या’ तीन राशी जगतील ऐशो-आरामाचे आयुष्य! शुक्र करणार मीन राशीत प्रवेश, नवीन नोकरीमुळे प्रगतीचा योग
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
४ फेब्रुवारीपासून ‘या’ तीन राशींचे नशीब चमकणार! गुरु ग्रह होणार मार्गी, मिळेल पद-प्रतिष्ठा
Shani rashi Parivartan 2025
येणारे ८० दिवस शनी करणार कल्याण; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना सुख-समृद्धी अन् आकस्मिक धनलाभ होणार
Rahu Mangal Gochar 2025
Rahu Mangal Gochar 2025 : १०० वर्षानंतर राहु आणि मंगळ बदलणार चाल, ‘या’ तीन राशी होणार मालामाल, मिळणार पैसाच पैसा!
Rahu Nakshatra Parivartan 2025
Rahu Nakshatra Parivartan 2025: राहु करणार शनिच्या नक्षत्रामध्ये प्रवेश, या चार राशींना येणार सोन्याचे दिवस, वाढणार बँक बॅलेन्स
Venus Transit in Purva Bhadrapada
१७ जानेवारीपासून ‘या’ तीन राशींचे भाग्य चमकणार; शुक्राच्या नक्षत्र परिवर्तनाने मिळणार प्रेम, पैसा अन् भौतिक सुख
Singh Rashi Bhavishya 2025 in Marathi
Leo 2025 Rashi Bhavishya : २०२५ मध्ये सिंह राशींना ‘हे’ महिने अत्यंत फायद्याचे; शिक्षण, नोकरी ते विवाह, कसे असेल वर्ष? जाणून घ्या १२ महिन्यांचे राशीभविष्य

मेष:- आपल्या तेजस्वी व्यक्तिमत्वाची छाप पाडाल. जोडीदाराशी सुसंवाद घडेल. मुलांबद्दल चांगली बातमी मिळेल. कार्यक्षेत्रात काही बदल घडून येतील. आत्मसन्मान बाळगून वागा.

वृषभ:- बोलण्यात माधुर्य ठेवा. घरातील कामांना वेग येईल. व्यावसायिक गैरसमज टाळा. सामाजिक भान राखून वागावे. मानसिक शांतता लाभेल.

मिथुन:- आपल्या बोलण्याने लोक प्रभावित होतील. हरवलेली वस्तु सापडेल. जोडीदाराच्या कलेचे कौतुक कराल. दिनक्रम अतिशय व्यस्त राहील. भगवंताचे नामस्मरण करावे.

कर्क:- उत्तम कौटुंबिक सौख्य राहील. मानसिक गोंधळ टाळावा. जोडीदाराच्या मतांचा आदर करावा. समस्येतून प्रयत्नाने मार्ग काढावा. निराश होऊ नका.

सिंह:- गोष्टी मनासारख्या घडतील. मुलांशी सुसंवाद साधता येईल. गोड बोलून कार्यभाग साधावा. वाणीत माधुर्य ठेवावे. समस्यांचे निराकरण करण्याचा मार्ग सापडेल.

कन्या:- उगाच नसत्या भानगडीत स्वत:ला गुंतवू नका. प्रेमातील गोष्टी लांबणीवर पडू शकतात. नोकरीत प्रशंसा होईल. मन विचलीत होऊ देऊ नका. वडीलधार्‍यांचा सल्ला मोलाचा ठरेल.

तूळ:- घरातील जुन्या कामात अडकून राहाल. अटीतटिचे वाद वाढवू नका. वाचनात वेळ घालवावा. प्रलंबित कामात मित्रांची मदत घ्याल. बचतीच्या योजना आखाल.

वृश्चिक:- घरातील जुन्या वस्तूंचा शोध घ्याल. व्यावसायिक कामात बदल जाणवेल. अभ्यासाचा कंटाळा करू नका. कामकाजात सुधारणा करण्याकडे लक्ष द्यावे. प्रलंबित कामांना प्राधान्य द्यावे.

धनू:- धार्मिक गोष्टींच्या सानिध्यात राहाल. जोडीदाराकडून अनपेक्षित लाभ मिळेल. धनवृद्धीचे संकेत मिळतील. स्वत:च्या हिंमतीवर मार्ग काढाल. भावंडांकडून शुभ वार्ता मिळेल.

मकर:- अचानक धनलाभाची शक्यता. गरम वस्तूंपासून दूर राहावे. प्रवासात योग्यती खबरदारी घ्यावी. निष्काळजीपणा नुकसान करू शकतो. भागीदारीत सतर्क राहावे.

कुंभ:- जुन्या गोष्टी मार्गी लागतील. ग्रहयोग वृद्धीकारक ठरेल. विरोधकांच्या कारवाया निष्प्रभ ठरतील. शिक्षण क्षेत्रात यश मिळेल. स्पर्धेत भाग घेण्याची संधी मिळेल.

मीन:- घरासाठी मोठ्या वस्तूंची खरेदी कराल. मनातील इच्छा पूर्ण होईल. लहान आजारांकडे दुर्लक्ष करू नका. प्रयत्नांची कास सोडू नका. व्यापारी वर्गासाठी सामान्य दिवस.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर

Story img Loader