Mesh To Meen Horoscope : ३ एप्रिल २०२५ रोजी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील षष्ठी तिथी आहे. षष्ठी तिथी रात्री ९ वाजून ४२ मिनिटांपर्यंत राहील. रात्री १२ वाजून २ मिनिटांपर्यंत शुभ योग जुळून येणार आहे. याशिवाय शुक्रवारी पहाटे ५ वाजून ५१ मिनिटांपर्यंत मृगाशिरा नक्षत्र जागृत असणार आहे. राहू काळ १ वाजून ३० मिनिटांनी सुरु होईल ते ३ वाजेपर्यंत असणार आहे. तसेच आज चैत्र नवरात्रीचा सहावा दिवस आहे. तर आजचा दिवस तुमच्या राशीसाठी कसा जाणार हे आपण जाणून घेऊया…

या बातमीसह सर्व प्रिमियम कंटेंट मोफत वाचा

3 एप्रिल पंचांग व राशिभविष्य (Aries To Pisces Horoscope) :

मेष राशिभविष्य (Aries Horoscope Today)

घरगुती गोष्टींवर लक्ष घाला. धार्मिक कामात मदत कराल. मानसिक तान वाढू शकतो. त्यागाचे महत्त्व पट‍वून द्याल. चांगली कल्पनाशक्ती लाभेल.

वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope Today)

काही कामे सहजगत्या पार पडतील. कामातील बदल नीट लक्षात घ्यावेत. सर्वांशी गोडी गुलाबीने वागाल. लोक तुमच्यावर खुश होतील. अधिकार्‍यांचा सल्ला विचारात घ्या.

मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope Today)

जोडीदाराच्या सहवासाचे सौख्य वाढेल. वेळेवर कामे पूर्ण करावीत. साथीच्या रोगांपासून काळजी घ्यावी. क्षुल्लक कारणामुळे निराश होऊ नका. अपचनाचा त्रास जाणवेल.

कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope Today)

जोडीदाराचे वागणे मनाविरुद्ध वाटू शकते. काही कामात अनपेक्षीतता येईल. भागीदाराशी मतभेद संभवतात. कचेरीच्या कामात वेळ जाईल. वरिष्ठांना खुश करावे लागेल.

सिंह राशिभविष्य (Leo Horoscope Today)

छुप्या शत्रूंचा त्रास कमी होईल. कष्टाने कामे पार पडतील. गैरसमजुतीतून त्रास संभवतो. चुगल्या करणार्‍या व्यक्तींपासून त्रास संभवतो. उष्णतेचे त्रास संभवतात.

कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope Today)

जुगारातून नुकसान संभवते. मुलांचे वागणे मनाविरुद्ध वाटू शकते. वेळ चुकवून चालणार नाही. प्रेमप्रकरणात कटकट वाढेल. उधळेपणा करू नका.

तूळ राशिभविष्य (Libra Horoscope Today)

कौटुंबिक खर्च वाढू शकतो. घरातील ज्येष्ठ मंडळींची काळजी घ्यावी. वाहन चालवताना काळजी घ्या. घरासंबंधीचे प्रश्न सोडवावेत. क्रोधावर नियंत्रण ठेवा.

वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope Today)

तुमच्यातील हिम्मत वाढीस लागेल. किरकोळ दुखापतींकडे दुर्लक्ष करू नका. कामाचा व्याप वाढेल. हाती आलेली संधी सोडू नका. नातेवाईकांच्या कुरबुरी वाढू शकतात.

धनू राशिभविष्य (Sagittarius Horoscope Today)

आवश्यकता असेल तरच खरेदी करा. मानसिक व्यग्रता जाणवेल. औद्योगिक वाढीकडे लक्ष द्यावे. कोर्ट-कचेरीची कामे निघतील. मागचा पुढचा नीट विचार करावा.

मकर राशिभविष्य (Capricorn Horoscope Today)

कामातील अडचणी दूर करव्यात डोकेदुखीचा त्रास जाणवेल. प्रतिकूलतेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न करावा. स्वभावात हट्टीपणा येईल. उत्साहाने कामे करावीत.

कुंभ राशिभविष्य (Aquarius Horoscope Today)

जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी. जुनी प्रकरणे सामोरी येऊ शकतात. आर्थिक बाबीची चिंता सतावेल. वादविवादात लक्ष घालू नका. डोळ्यांची वेळेवर तपासणी करावी.

मीन राशिभविष्य (Pisces Horoscope Today)

मौल्यवान वस्तु खरेदी कराल. कष्टाला पर्याय नाही. बौद्धिक डावपेच खेळाल. चातुर्याने कामे मिळवाल. कामाचा थकवा जाणवेल.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mesh to meen horoscope 3 april 2025 which zodiac sign will benefit the most on the sixth day of chaitra navratri read horoscope in marathi asp