16 January Horoscope : १६ जानेवारी २०२५ रोजी पौष महिन्याच्या कृष्ण पक्षातील तृतीया तिथी आहे. तृतीया तिथी पहाटे ४ वाजून ०७ मिनिटांपर्यंत राहील. आयुष्मान योग रात्री १ वाजून ६ मिनिटांपर्यंत जुळून येईल. तसेच आश्लेषा नक्षत्र रात्री ११ वाजून १७ मिनिटांपर्यंत जागृत असेल. राहू काळ १ वाजून ३० मिनिटांनी सुरु होईल ते ३ वाजेपर्यंत असणार आहे. तर स्वामींच्या कृपेने तुमचा गुरुवार कसा जाईल हे आपण जाणून घेऊया…

१६ जानेवारी पंचांग व राशिभविष्य (Aries To Pisces Horoscope) :

मेष:- आवडी-निवडी साठी खर्च कराल. धार्मिक ग्रंथ वाचनात वेळ घालवाल. वरिष्ठांशी जुळवून घ्यावे लागेल. रागावर नियंत्रण ठेवावे. कामावर लक्ष केन्द्रित करावे.

The effect of the Sun's Mahadasha lasts for 6 years on a person
Surya Mahadasha: सूर्याच्या महादशेमुळे कोणत्या राशींचे नशीब चमकते करिअर अन् व्यवसाय? मिळते अपार धन-संपत्ती, ६ वर्षांसाठी राहतो प्रभाव
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
shani surya budha will make tigrahi yog 2025
Tirgrahi Yog 2025 : ५० वर्षांनंतरच्या त्रिग्रही योगामुळे ‘या’ राशींचे चमकणार नशीब! बुध, सूर्य अन् शनीच्या संयोगाने होतील गडगंज श्रीमंत, वाढेल मानसन्मान
Shani rashi Parivartan 2025
येणारे ८० दिवस शनी करणार कल्याण; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना सुख-समृद्धी अन् आकस्मिक धनलाभ होणार
Shani and shukra made dhanadhya yoga
३० वर्षानंतर धनाढ्य योगामुळे ‘या’ राशींचे नशीब चमकणार! शनी आणि शुक्राची होईल असीम कृपा
Mangal Margi 2025 horoscope
२१ जानेवारीपासून ‘या’ राशींचे झटक्यात पालटणार नशीब; मंगळ मार्गीमुळे मिळणार बक्कळ पैसा, संपती, जबरदस्त यश
Kanya Rashi Bhavishya 2025 in Marathi
Virgo 2025 Horoscope : २०२५ मध्ये विद्यार्थी, नोकरदारांचे उजळणार नशीब; कन्या राशीसाठी कोणता महिना आर्थिकदृष्ट्या फायदेशीर? जाणून घ्या १२ महिन्यांचे भविष्य…
Singh Rashi Bhavishya 2025 in Marathi
Leo 2025 Rashi Bhavishya : २०२५ मध्ये सिंह राशींना ‘हे’ महिने अत्यंत फायद्याचे; शिक्षण, नोकरी ते विवाह, कसे असेल वर्ष? जाणून घ्या १२ महिन्यांचे राशीभविष्य

वृषभ:- आपले मानसिक आरोग्य जपावे. अति विचार करू नयेत. घरासाठी नवीन खरेदी केली जाईल. व्यापारात काही नवीन सुविधा कराल. जमिनीच्या कामातून लाभ संभवतो.

मिथुन:- आपणहून कोणत्याही गोष्टीत अडकू नका. आपल्या कामात हुशारी दाखवावी. दिवसाच्या सुरूवातीस काही लाभ होतील. काही चांगले बदल अनुभवास येतील. मन प्रसन्न राहील.

कर्क:- जुने आजार दुर्लक्षित करू नका. वरिष्ठांच्या आज्ञेचे तंतोतंत पालन करावे. दिवसभर आत्ममग्न राहाल. टीकेकडे फार लक्ष देऊ नये. घरातील ज्येष्ठांचा सल्ला घ्यावा.

सिंह:- स्वत:वरुन इतरांची परीक्षा करा. अपेक्षित उत्तराची वाट पहाल. संमिश्र घटनांचा दिवस. छुप्या शत्रूपासून सावध राहावे. अनोळखी लोकांशी व्यवहार करू नयेत.

कन्या:- आवश्यक तिथे आक्रमक पवित्रा घ्यावा. गुंतवणुकीच्या बाबतीत सावध रहा. जोडीदाराचे सहकार्य घ्याल. स्वत:साठी थोडा वेळ काढावा. कौटुंबिक खर्चात वाढ संभवते.

तूळ:- घरात सामंजस्याने वागावे लागेल. नोकरीच्या ठिकाणी प्रशंसा होईल. काही कामे उगाचच अडकून पडल्यासारखी वाटू शकतात. डोकेदुखीचा त्रास संभवतो. टाकलेले पाऊल मागे घेऊ नका.

वृश्चिक:- भागीदारीत नवीन संधी प्राप्त होतील. रखडलेल्या गोष्टी पुन्हा चालू होतील. काहीतरी नवीन करण्याचा विचार कराल. वैचारिक गुंतागुंत वाढवू नका. मनातील इच्छा पूर्ण होण्यास वेळ द्या.

धनू:- आहाराचे पथ्य न चुकता पाळा. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. नवीन काहीतरी शिकण्याची संधी मिळेल. परोपकाराचे महत्त्व लक्षात घ्याल. इतरांच्या आनंदात आनंद मानाल.

मकर:- नवीन कामे हाती घेण्याचा विचार कराल. भावंडांशी मतभेद संभावतात. सासरच्या मंडळींकडून मदत मिळेल. प्रलंबित कामे अडकून पडू देऊ नका. काही गोष्टीत समाधान मानावे लागेल.

कुंभ:- काही गोष्टींचे चिंतन करावे. जुन्या गोष्टी सोडून द्याव्यात. बोलतांना सारासार विचार करावा. गुंतवणूक करताना फसवणुकीपासून सावध राहावे. जुगारातून लाभ संभवतो.

मीन:- अति घाई करू नये. जोडीदाराच्या मताचा अवश्य विचार करावा. कामात गोंधळ उडवून घेऊ नका. घरातील वातावरण खेळकर राहील. प्रवासात किरकोळ अडचणी येऊ शकतात.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर

Story img Loader