Daily Horoscope In Marathi : १८ मार्च २०२५ रोजी फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाची चतुर्थी तिथी आहे. चतुर्थी तिथी मंगळवारी रात्री १० वाजून १० मिनिटांपर्यंत राहील. आज स्वाती नक्षत्र संध्याकाळी ५ वाजून ५२ मिनिटांपर्यंत जागृत असणार आहे. याशिवाय व्याघ्यात योग ४ वाजून ४२ मिनिटांनपर्यंत असेल. आज राहू काळ ३ ते ४ वाजून ३० मिनिटांपर्यत असणार आहे. बुधवारी पहाटेपर्यंत ५ वाजून ३९ मिनिटांपर्यंत हर्षल वृषभ राशीत प्रवेश करेल. तर तुमच्या राशीसाठी आजचा दिवस कसा जाईल हे आपण जाणून घेणार आहोत…
१८ मार्च पंचांग व राशिभविष्य:
मेष राशिभविष्य (Aries Horoscope Today)
आपल्या व्यक्तिमत्वाला अधिक उठाव येईल. तरुणांच्या संगतीत दिवस घालवाल. लहान मुलांच्यात खेळाल. चौकसपणा दाखवाल. तुमच्यातील भावनाशीलता दिसून येईल.
वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope Today)
अधिकार्यांचा सल्ला घ्यावा लागेल. सामाजिक कामात पुढाकार घ्याल. स्वत:चा मान राखून वागाल. मुलांचे मत विचारात घ्यावे.
मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope Today)
चैनीच्या वस्तु खरेदी कराल. व्यापारी वर्गाचा आर्थिक स्तर सुधारेल. सहकुटुंब मौज-मजेचा बेत आखाल. हातातील अधिकार वापरण्याची संधी मिळेल. महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी पाऊले उचलाल.
कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope Today)
सर्वासमोर आपली कला सादर करता येईल. घरासाठी सजावटीचे सामान खरेदी केले जाईल. टाप-टिपीकडे अधिक लक्ष द्याल. स्वत:चा मान वाढवण्यासाठी प्रयत्न कराल. कामाचा उत्तम मोबदला मिळेल.
सिंह राशिभविष्य (Leo Horoscope Today)
पोटाची तक्रार जाणवेल. वात-विकाराकडे दुर्लक्ष करू नका. योग्य संधीची वाट पाहावी. सहकुटुंब प्रवास कराल. पत्नीचा सुस्वभावीपणा दिसून येईल.
कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope Today)
अचानक धनलाभ संभवतो. जुनी येणी वसूल होतील. जोडीदाराचे कौतुक केले जाईल. नातेवाईकांचा गैरसमज दूर करावा. मुलांच्या खोडकरपणात वाढ होईल.
तूळ राशिभविष्य (Libra Horoscope Today)
प्रेमसंबंध अधिक घट्ट होतील. भागीदारीच्या व्यवसायाला अधिक गती येईल. संपर्कातील लोकांशी एकोपा वाढेल. कौटुंबिक खर्च वाढू शकतो. मौज-मजेकडे कल राहील.
वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope Today)
हाताखालील नोकरांचे सहकार्य मिळेल. कामे वेळेत पूर्ण करता येतील. कामानिमित्त दिवसभर बाहेर राहाल. उगाचच चीड-चीड करणे टाळावे. क्षुल्लक गोष्टी नजरेआड कराव्यात.
धनू राशिभविष्य (Sagittarius Horoscope Today)
आवडते पुस्तक वाचायला मिळेल. जवळच्या प्रवासाचा योग येईल. बुद्धी आणि ज्ञान ह्यांचा सुयोग साधाल. चौकसपणे माहिती गोळा कराल. भावंडांची उत्तम साथ मिळेल.
मकर राशिभविष्य (Capricorn Horoscope Today)
जुन्या गोष्टी उगाळत बसू नका. काम आणि वेळ ह्यांचा समन्वय साधावा. रागावर नियंत्रण ठेवावे. धार्मिक गोष्टींकडे ओढ वाढेल. तीर्थयात्रेसाठी नाव नोंदवाल.
कुंभ राशिभविष्य (Aquarius Horoscope Today)
अघळपघळ बोलणे टाळा. जबाबदारीची जाणीव ठेवून वागावे. हस्तकलेचा प्रसार करता येईल. गुरूजनांचा आशीर्वाद मिळेल. थोर व्यक्तींचे मार्गदर्शन घ्याल.
मीन राशिभविष्य (Pisces Horoscope Today)
मानसिक शांतता जपावी. कौटुंबिक सौख्यात वाढ होईल. मुलांच्या आनंदात रमून जाल. जवळचे नातेवाईक भेटतील. दिवसभर घेतलेल्या कष्टाचे चीज होईल.
ज्योतिषी विद्याधर करंदीकर
© IE Online Media Services (P) Ltd