सोनल चितळे
Gemini Yearly Horoscope 2024 Predictions in Marathi :मिथुन राशीचा स्वामी बुध आहे. बुध हा बुद्धीचा कारक ग्रह आहे. बोलणे, लिहिणे, व्यक्त करणे, सादर करणे हे सगळे बुधाच्या अमलाखाली येते. मिथुन राशीच्या व्यक्ती बोलण्यात तरबेज असतात. आपला मुद्दा इतरांसमोर खुबीने मांडू शकतात. एखाद्याचे बौद्धिक वा वैचारिक परिवर्तन करण्यात त्यांना यश मिळते. यांची स्मरणशक्ती चांगली असते. नवनवीन गोष्टी शिकणे आणि त्या अमलात आणणे हे त्यांना फार आवडते. इतरांच्या हुकूमानुसार वागणे त्यांना पसंत नसते. या व्यक्ती स्वयंनियंत्रित असतात. त्यांच्या खेळकर, विनोदी स्वभावाला शिस्तीची झालरही असते. काही वेळा मात्र चंचल स्वभाव, घाईघाई करणे आणि अस्थिर मनोवृत्तीमुळे योग्य निर्णय येताना त्यांचा गोंधळ उडतो. अन्यथा त्यांचे लहानात लहान गोष्टींसाठीचे व्यवस्थापन अतिशय वाखाणण्याजोगे असते. अशा या मिथुन राशीच्या व्यक्तींना २०२४ हे संपूर्ण वर्ष कसे असेल ते पाहू.
भाग्य स्वामी शनी पूर्ण वर्ष भाग्य स्थानातूनच भ्रमण करणार आहे. शनी हा कर्माचा कारक ग्रह असल्याने मेहनतीचे फळ नक्की मिळेल. एप्रिलपर्यंत गुरू लाभ स्थानात आहे. चांगले गुरुबल आहे. महत्त्वाची कामे तोपर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. १ मेला गुरू व्यय स्थानातील वृषभ राशीत प्रवेश करेल. तेव्हापासून आपले गुरुबल कमजोर होईल. लहानमोठ्या गोष्टींसाठी देखील अधिक मेहनत, अधिक वेळ खर्च होईल. १ जूनला हर्षल देखील वृषभेत प्रवेश करेल. अनपेक्षित घटना घडतील. धीराने सामोरे जावे. राहू पूर्ण वर्ष दशमस्थानातील मीन राशीत तर केतू चतुर्थ स्थानातील कन्या राशीत भ्रमण करेल. वर्षभर राहुसह नेपच्यूनही मीन राशीत असेल. मकर राशीत अष्टम स्थानात प्लुटो असेल. समोर दिसणाऱ्या गोष्टी जशा दिसतात तशाच आहेत किंवा नाही याची शहानिशा करणे आवश्यक ठरेल. या महत्वाच्या ग्रह बदलांसह इतर ग्रहांचा विचार आणि अभ्यास करता हे २०२४ वर्ष कसे ग्रहफल देईल ते आता पाहू.
मिथुन वार्षिक राशिभविष्य (Gemini Yearly Horoscope 2024)
जानेवारी (January Horoscope)
गुरू आणि शनी या मोठ्या ग्रहांचे पाठबळ खूप महत्त्वाचे ठरेल. योजलेली कामे पूर्ण कराल. नव्या वर्षाच्या सुरुवातीला नवे संकल्प अमलात आणाल. विद्यार्थी वर्गाने स्वतःला अभ्यासात झोकून द्यावे. आजूबाजूला खूप प्रलोभने आहेत परंतु ध्येय गाठण्यासाठी एकाग्रता फारच महत्वाची ठरेल. नोकरी व्यवसायातील कामाचा वेग वाढेल, नव्या संधी उपलब्ध होतील. खात्रीपूर्वक मार्गाने पुढे गेलात तर यश आपलेच आहे. विवाहोत्सुक मंडळींनी वधुवर संशोधन सुरू ठेवावे. मनाजोगता जोडीदार मिळेल. विवाहित मंडळींना वैवाहिक सौख्य चांगले मिळेल. गुंतवणूकदारांना दीर्घकालीन गुंतवणूक खूप लाभदायक ठरेल. श्वसनाचे विकार बळावतील. योग्य वेळी काळजी घेणे आवश्यक आहे
फेब्रुवारी (February Horoscope)
विचारपूर्वक केलेली कृती लाभदायक ठरेल. मनात आले आणि झटकन केले असे होणार नाही, असे करूही नका. त्यातून होणाऱ्या फायदा तोट्याचा विचार करणे निश्चितच गरजेचे आहे. विद्यार्थी वर्गाला स्वयंशिस्तीचे धडे उपयोगी ठरतील. धरसोड न करता वागण्यातील सातत्य कामी येईल. नोकरी व्यवसायातील अनेक खाचखळगे ओळखून पुढील पाऊल टाकावे. विवाहोत्सुक मंडळींनी शोधकार्य सुरू ठेवावे, यश मिळेल. विवाहित दाम्पत्यांनी संतती प्राप्तीसाठी जरूर प्रयत्न करावेत. गुरुबल चांगले असल्याने प्रयत्न यशस्वी ठरतील. गुंतवणूकदारांनी अभ्यासपूर्वक गुंतवणूक केल्यास परतावा चांगला मिळेल. हवामानातील बदलाचा तब्येतीवर परिणाम होईल.
मार्च (March Horoscope)
या महिन्यातील ग्रहमानाचे फळ संमिश्र असेल. दशम स्थानातील राहू, बुध, नेपच्यून गूढ परिस्थिती निर्माण करेल. काय करावे, कसा निर्णय घ्यावा याबद्दल प्रश्न उभे राहतील. विद्यार्थी वर्गाची आता खरी कसोटी आहे, धीराने घ्यावे. नोकरी व्यवसायात वरिष्ठांच्या मार्गदर्शनाचा उत्तम लाभ होईल. डावपेच शिकायला मिळतील, आपले अनुभवही कामी येतील. विवाहित मंडळींनी जोडीदारासह मोकळेपणाने संवाद साधल्यास रुसवेफुगवे दूर होतील. नात्यातील गोडवा जपण्यासाठी तत्वज्ञान दूर ठेवावे. नात्याला अधिक प्राधान्य द्यावे. घरासंबंधीत कामे काही कारण नसताना रेंगाळतील. पित्त विकार बळावल्यास वैद्यकीय उपचार घ्यावे लागतील.
एप्रिल (April Horoscope)
या महिन्यात गुरुसह रवीचे देखील बळ मिळणार आहे. कष्टाचे चीज होईल. आपल्या मताला किंमत येईल. उच्चीचा शुक्र नव्या संकल्पना अमलात आणण्यात साहाय्य करेल. विद्यार्थी वर्गाने उच्च शिक्षणाची जोरदार तयारी करावी. नोकरीमध्ये थोडी तडजोड करण्याची तयारी ठेवल्यास आपल्याच हिताचे ठरेल. व्यावसायिकांना आर्थिकदृष्ट्या नवी गणिते मांडावी लागतील. विवाहोत्सुक मुलामुलींना मनाजोगता जोडीदार मिळेल. घर, मालमत्ता, प्रॉपर्टीसंबंधित कामात सरकारी अडचणी येतील. गुंतवणूकदारांना मर्यादित लाभ होईल. हाडे, सांधे, रक्तदाब याबद्दल विशेष काळजी घ्यावी लागेल. पथ्य पाळणे आपली जबाबदारी आहे, हे विसरून चालणार नाही.
मे (May Horoscope)
१ मेला गुरू मेष राशीतून व्ययस्थानातील वृषभ राशीत प्रवेश करेल, आपले गुरुबल कमजोर होईल. लाभ स्थानातील उच्चीचा रवी आपले धैर्य खचू देणार नाही. जिद्दीने पुढे जाण्यातच खरी हिंमत आहे. विद्यार्थी वर्गाला सचोटीने परीक्षेची तयारी करायला लागेल. स्पर्धा परीक्षा, उच्च शिक्षणातील परीक्षा यात आपला खरा कस लागणार आहे. नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी बुद्धिमत्तेच्या जोरावर चांगली बाजी माराल. विवाहोत्सुक मंडळींनी आता थोडे सबुरीने घ्यावे. विवाहित दाम्पत्यांनी आपल्यातील गैरसमज दूर करण्याचे प्रयत्न करावेत. १९ मेला शुक्र वृषभेत प्रवेश करेल. याचा गुंतवणूकदारांना लाभ होईल. उन्हाळी सर्दीने बेजार व्हाल. साथीच्या आजारांपासून सावधान!
जून (June Horoscope)
१ जूनला मेष राशीतील हर्षल वृषभेत प्रवेश करेल. चटकन उलगडा होणार न होणाऱ्या प्रसंगांना तोंड द्यावे लागेल. १ जूनला लाभ स्थानात मंगळ प्रवेश करेल. त्यामुळे आत्मविश्वास वाढेल. १४ जूनला रवी आणि बुधाचा मिथुन राशीत प्रवेश झाल्याने महिन्याचा उत्तरार्ध समाधानकारक असेल. मेहनत घेण्याची आणि युक्तिवाद लढवण्याची उमेद वाढेल. विद्यार्थी वर्गाने नव्या शैक्षणिक वर्षात सुरुवातीपासूनच जोर लावणे आवश्यक आहे. नोकरी व्यवसायात कामाचे स्वरूप वा कामाचे ठिकाण बदलण्याचा संभव आहे. थोडीफार तडजोड करण्याची तयारी दाखल्यास आपल्याच हिताचे ठरेल. तरुणाईमध्ये प्रेमसंबंध बहरतील. स्वतःच्या जबाबदारीवर गुंतवणूकीची जोखीम पत्करावी लागेल. आरोग्य चांगले राहील.
जुलै (July Horoscope)
कुंभ राशीतील भाग्य स्थानातील स्वगृहीचा शनी आणि लाभ स्थानातील स्वगृहीचा मेषेचा मंगळ या ग्रहांचा मोठा आधार मिळेल. ध्येय गाठण्यासाठी मनात उभारी येईल. विद्यार्थी वर्गाला नेटाने अभ्यास करायचा आहे याचे स्मरण ठेवावे. आपली आकलन क्षमता तर उत्तम आहेच, फक्त एकाग्रतेची गरज आहे. नोकरी व्यवसायात कष्टाचे सार्थक होईल. अपेक्षित आर्थिक उन्नती झाली नसली तरी आपल्या कामाची दखल घेतली जाईल. विवाहित दाम्पत्यांना संतान प्राप्तीच्या प्रयत्नात अडचणी येतील. गुंतवणुकीतील परतावा अतिशय अनिश्चित स्वरूपाचा असेल. लाभ तर सोडाच पण नुकसान बेताने झाले तरी ठीक झाले असे समाधान मानावे लागेल. दूषित पाणी आणि पावसाची अनिश्चितता यामुळे पोटदुखी आणि डोकेदुखीचा त्रास सहन करावा लागेल.
ऑगस्ट (August Horoscope)
आपल्या कर्मानुसार आपल्याला भाग्य उपभोगता येते. यानुसार फारसे ग्रहबल नसतानाही आपल्या कलागुणांची कदर केली जाईल. आपले बोलणे, वागणे याची इतरांवर छाप पडेल. विद्यार्थी वर्गाला देखील तोंडी परिक्षेत याचा अनुभव येईल. नोकरी व्यवसायातील अयोग्य गोष्टी सहन होणार नाहीत. अन्यायाविरुद्ध आवाज उठवाल. घर, प्रॉपर्टी संबंधीत कामाच्या हालचाली सरकारी नियमांनुसार पुढे सरकतील. कागदपत्रांचे काळजीपूर्वक वाचन करावे. छुप्या अटी वा नियम दुर्लक्षित करू नका. वडिलोपार्जित पैसा, संपत्ती यावरून भावंडांसह वाद टाळावेत. ताण, तणावामुळे श्वसनाचे विकार
बळावतील. सणावाराच्या दिवसांमध्ये नातेवाईकांच्या भेटीगाठींमुळे आधार वाटेल.
सप्टेंबर (September Horoscope)
रवी, शनी आणि शुक्र यांच्या साथीने मनाजोगते काम करता येईल. बौद्धिकदृष्ट्या नवी आव्हाने स्वीकाराल. यातूनच आपल्याला समाधान मिळेल. विद्यार्थ्यांना सावधगिरीचा इशारा मिळेल. अभ्यासात कोठेही कमी पडू नका. नोकरीच्या ठिकाणी नव्या संकल्पना अमलात आणाल. व्यावसायिक मंडळींना काही प्रमाणात जोखीम पत्करून पुढचे पाऊल टाकावे लागेल. १८ सप्टेंबरला शुक्र पंचमातील तूळ राशीत प्रवेश करेल. प्रेमसंबंध जपाल. विवाहित दाम्पत्यांचे सहजीवन आनंदी असेल. सरकारी कामे, करार १६ सप्टेंबरच्या पूर्वी करावेत. आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करावी. कुटुंबातील वादाचे मुद्दे सध्या तरी दूर ठेवावेत. त्वचा आणि फुप्फुसे यांच्यावर हवेतील प्रदूषणाचा विपरीत परिणाम दिसून येईल.
ऑक्टोबर (October Horoscope)
महिन्याभराच्या कामकाजाचे नियोजन केल्यास कामांना गती येईल. कामावरील एकाग्रता आणि कामातील सातत्य यामुळे कामाची पत सुधारेल. विद्यार्थ्यांनी कौटुंबिक बाबीत अधिक लक्ष न घालता अभ्यासाचा विचार करावा. नोकरी व्यवसायातील राजकारण डोईजड होण्याची शक्यता आहे. आपल्या कामाशी मतलब ठेवणे इष्ट ! तरी देखील आपल्या मूळ स्वभावानुसार जो कोणी आपणास त्रास देईल त्याला आपण शाब्दिक फटके नक्कीच द्याल. गुरुबल कमजोर असल्याने विवाहोत्सुक मंडळींनी धीर धरावा. विवाहितांच्या वैवाहिक जीवनातील अडचणी, समस्या चर्चेने सोप्या होतील. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन हितकारक ठरेल. गुंतवणूकदारांनी सावधगिरी बाळागल्यास मोठे नुकसान टळेल.
नोव्हेंबर (November Horoscope)
बुद्धीचातुर्याचा उपयोग करून काही गोष्टी पदरात पाडून घेता येतील. योग्य दिशेने वाटचाल केलीत तर यश आपलेच आहे. विद्यार्थ्यांना परीक्षण आणि निरीक्षण खूपच लाभदायक ठरेल. त्यांच्या बोलण्याचा प्रभाव पडेल. नोकरी व्यवसायात देखील आपले सादरीकरण उठावदार आणि व्यावहारिक असेल. वरिष्ठांकडून आपल्या कामाची दखल घेतली जाईल. लहान मोठ्या यशाने हुरळून जाऊ नका. अजून बराच पल्ला गाठायचा आहे याचे भान असू द्यावे. नवे करार करताना सावधगिरी बाळगावी. संतान प्राप्तीसाठी वैद्यकीय उपचार घेणे योग्य ठरेल. उत्सर्जन संस्थेच्या कार्यात बिघाड होईल. विशेष काळजी घ्यावी. कुटुंबातील सदस्यांवर आपली मते लादू नका. त्यांना आपले विचार समजावून सांगा.
डिसेंबर (December Horoscope)
वर्षाच्या अखेरीस आधी ठरवलेल्यापैकी निम्याहून अधिक कामे पूर्ण झालेली असतील. जे करता आले नाही त्याचा प्रकर्षाने विचार करण्यापेक्षा जे झाले आहे, केले आहे त्यावर लक्ष केंद्रित केल्यास आनंद उपभोगता येईल. विद्यार्थी वर्गाने मात्र जे हातून निसटत आहे त्याची कारणमिमांसा पहावी आणि आपल्या वेळापत्रकात योग्य तो बदल करावा. ध्येयापासून विचलित होऊ नका. नोकरी व्यवसायात कष्टाचे चीज होईल. सबुरी कामी येईल. तडजोड करणे हितावह ठरेल. आर्थिक बाजारातील चढ उताराचा आपल्या आर्थिक स्थितीवर परिणाम होणार नाही याची दक्षता घ्यावी. स्नायू दुखावणे, मार लागणे, सुजणे अशा शारीरिक तक्रारी उदभवतील. वैद्यकीय सल्ल्यानुसार तपासणी करावी लागेल.
एकंदरीत २०२४ या वर्षात एप्रिल अखेरीपर्यंत गुरुबल चांगले असेल. या कालावधीत विवाह ठरणे, विवाह होणे, संतान प्राप्ती होणे असे महत्वाचे टप्पे सर होऊ शकतात. देशातील किंवा परदेशातील प्रवासयोग देखील संभवतो. घर, प्रॉपर्टीचे कामकाज एप्रिलपर्यंत गतिमान असेल. मे पासून गुरुबल कमजोर झाल्याने अनेक अडचणीतून मार्ग काढून पुढे जावे लागेल. त्यातूनही ध्येय गाठण्याची दुर्दम्य इच्छा असल्यास नक्कीच यशस्वी व्हाल! सातत्य आणि महत्वाकांक्षा टिकवून ठेवलीत तर हे वर्ष आपणासाठी आनंदमय आणि उत्साहाने भरलेले असेल !