Ganesh Chaturthi 2024: हिंदू धर्मात कोणत्याही शुभ कार्याच्या सुरुवातीला सर्वप्रथम श्रीगणेशाची पूजा केली जाते. बाप्पाच्या आशीर्वादाने केलेले शुभ कार्य नेहमीच निर्विघ्नपणे पार पडते, असे म्हटले जाते. तसेच बाप्पाची ज्या व्यक्तींवर कृपा असते, त्या व्यक्तींना आयुष्यभर सुख-समृद्धी आणि यश मिळते. ज्योतिषशास्त्रानुसार श्रीगणेशाला १२ राशींपैकी काही राशी अत्यंत प्रिय आहेत. श्रीगणेश सदैव आपल्या प्रिय राशीधारक व्यक्तींच्या सर्व इच्छा पूर्ण करतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ज्योतिषशास्त्रानुसार, गणेश चतुर्थीच्या दिवशी बाप्पाचे घरोघरी आगमन झाले; ज्याच्या शुभ प्रभावाने अनंत चतुदर्शीपर्यंत या राशीधारकांना बाप्पा भरपूर आशीर्वाद देईल. तसेच त्यांच्या आयुष्यातील संकटांचा नाश करेल. कोणत्या आहेत या प्रिय राशी ते चला जाणून घेऊया

या तीन राशींवर असणार बाप्पाचा आशीर्वाद

मेष

बाप्पाची मेष ही अत्यंत प्रिय रास असून या राशीच्या व्यक्तींना गणेशोत्सवाचा काळ खूप भाग्यदायी ठरेल. या काळात तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. यश तुमच्या बाजूने असेल. आयुष्यात पैशांची कमतरता भासणार नाही. भौतिक सुखाची प्राप्ती होईल. बाप्पाच्या तीर्थक्षेत्रांना भेट द्याल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वैवाहिक जीवनही सुखी-समाधानी असेल.

मिथुन

गणेशोत्सवाच्या काळात मिथुन राशीच्या व्यक्तींनाही त्यांच्या संपूर्ण आयुष्यात बाप्पाचा भरपूर आशीर्वाद मिळेल. बाप्पा नेहमी तुमच्या आयुष्यात पैसा, धन, ऐश्वर्य देईल. या काळात तुमचे मन खूप प्रसन्न असेल. व्यवसायात चांगली प्रगती होईल. वाणीवर चांगले नियंत्रण मिळवाल. मानसिक ताण-तणाव दूर होण्यास मदत मिळेल. आनंदी राहाल.

हेही वाचा: १० दिवसांनंतर मिळणार नुसता पैसा; ‘मालव्य राजयोग’ देणार ‘या’ तीन राशींच्या आयुष्यात पैसा आणि प्रतिष्ठा

मकर

बाप्पाचा मकर राशीच्या व्यक्तींवरहीनेहमी खूप आशीर्वाद असतो. गणेशोत्सवाच्या काळातही बाप्पाच्या कृपेने करिअर, व्यवसायात तुमची चांगली प्रगती होईल. आर्थिक परिस्थिती दूर होण्यास मदत होईल. आरोग्य व्यवस्थित राहील. सुख-समृद्धीत वाढ होईल. मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील. उच्च शिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्यांचे स्वप्न पूर्ण होईल.

(टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Money earn till anant chaturdashi with bappas blessings these three zodiac sign will have wealth sap