-सोनल चितळे

February 2023 Monthly Horoscope: फेब्रुवारीचा महिना सुरु झाला आहे. या महिन्याभरात आपल्याला काय काळजी घ्यायला हवी, कोणत्या प्रकारची कामे मार्गी लागतील, महत्वाचे निर्णय घेण्यासाठी महिन्यातील कोणता काळ योग्य असेल या सगळ्या बाबतची उत्सुकता आपल्या सर्वांनाच असते. अतिप्राचीन काळापासून अभ्यासल्या जाणाऱ्या ज्योतिषशास्त्राद्वारे यातील बऱ्याच गोष्टींचे मार्गदर्शन आपणास मिळू शकते. आजच्या अस्थिर आणि अनिश्चित जीवनात या आणि अशा प्रकारच्या मार्गदर्शनाचा चांगला लाभ होतो. अर्थात प्रयत्न न करता कोणतीही गोष्ट साध्य होत नसते हे आपण जाणताच. परंतु प्रयत्नांना भाग्याची, ग्रहबळाची जोड मिळाल्यास ,योग्य दिशेने वाटचाल केल्यास यश नक्कीच मिळू शकते. ज्योतिष शास्त्रातील पारंपरिक अभ्यास पद्धतीनुसार आपल्या जन्मवेळी आकाशातील चंद्र ज्या राशीत असतो ती आपली ‘चंद्ररास’ किंवा ‘रास’ असते. अशा १२ राशींना २०२३ चा दुसरा महिना म्हणजेच फेब्रुवारी नेमका कसा जाणार हे आपण पाहुयात..

मेष (Aries Zodiac)

व्यायाम आणि आहार याकडे विशेष लक्ष देण्याची गरज भासेल. विद्यार्थीवर्गाला अभ्यासक्रमातील कठीण भाग तज्ज्ञांकडून समजून घ्यावा लागेल. कंबर कसून अभ्यासाला लागावे. व्ययस्थानातील उच्चीचा शुक्र खर्चाचे प्रमाण वाढेल. रवी मंगळाचा शुभ योग नोकरी व्यवसायात आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत करेल. कामातील अडचणींवर मात करण्यासाठी वरिष्ठांची साथ मिळेल. सातत्यपूर्ण प्रयत्न महत्वाचे ! शिक्षण वा कामानिमित्त प्रवास योग येतील. मित्र मंडळी नातेवाईक यांची मदत कराल.

Malavya Yoga and Kendra Trikon Rajyoga 2025
२०२५मध्ये ग्रहांचा अद्भुत संयोग! मीन राशीत निर्माण होईल केंद्र त्रिकोण-मालव्य राजयोग; नोकरीत होईल पदोन्नती, अचानक होईल आर्थिक लाभ
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
surya gochar 2024 astrology horoscope in marathi
Surya Gochar 2025 : १५ डिसेंबरपासून करोडपती होऊ शकतात ‘या’ तीन राशींचे लोक; सूर्यदेवाच्या कृपेने जगू शकतात राजासारखे जीवन?
Mangal Rashi Parivartan 2024
४२ दिवसानंतर नुसता पैसा; मंगळाच्या राशी परिवर्तनाने ‘या’ तीन राशीच्या व्यक्ती होणार भाग्यवान
Shukra Nakshatra parivartan 2024
उद्यापासून पडणार पैशांचा पाऊस; शुक्राच्या नक्षत्र परिवर्तनाने ‘या’ तीन राशींना होणार भौतिक सुखाची प्राप्ती
Shani Budh Yuti 2025 astrology
Shani Budh Yuti 2025 : नवीन वर्षात सोन्याचा हंडा घेऊन लक्ष्मी ठोठावेल ‘या’ राशींच्या मंडळींचे दार? शनी-बुधाच्या संयोगाने होऊ शकाल लखपती
Shani Nakshatra transformation 2024
२०२५ सुरू होण्याआधीच शनी देणार बक्कळ पैसा; नक्षत्र परिवर्तनाने मिळणार पैसा आणि प्रतिष्ठा
Rahu Gochar 2025
Rahu Gochar 2025 : राहु बदलणार चाल, पडणार पैशांचा पाऊस! ‘या’ तीन राशींचे चमकणार भाग्य

वृषभ (Taurus Zodiac)

आपल्या राशीतील मंगळ आणि व्यय स्थानातील राहू, हर्षल आपणास विचार न करता निर्णय घेण्यास भाग पडतील. तसे झाल्यास नुकसान होण्याची शक्यता आहे. लाभतील गुरु शुक्राच्या मदतीने अविचाराने निर्णय घेणे टाळता येईल. मित्रांची चांगली साथ मिळेल. एकमेकांशी संवाद साधून कौटुंबिक वाद मिटवता येतील. मुलांच्या प्रश्नांना उत्तरे सापडतील. वरिष्ठांना सद्य स्थितीची योग्य कल्पना द्याल. पैशाचे व्यवहार जपून करावेत. घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या आरोग्याची चिंता वाटेल.

मिथुन (Gemini Zodiac)

भाग्य स्थान आणि दशम स्थानातील शुक्राचे भ्रमण मनाप्रमाणे यश देण्यास साहाय्यकारी ठरेल. कामकाजात नवी झेप घ्याल. नोकरी व्यवसायासाठी विशेष गुंतवणूक कराल. विद्यार्थ्यांची अभ्यासात प्रगती होईल. परदेशासंबंधीत कामे मार्गी लागतील. एखादे वेळी प्रत्यक्ष परदेशगमन झाले नाही तरी परदेशासंबंधीत कामे, करार करण्याचे योग आहेत. संधीचे सोने कराल. जोडीदारासह वैचारीक चर्चा रंगतील. कौटुंबिक समस्या सोडवण्यासाठी ज्येष्ठ मंडळींचा आधार घ्याल. रक्तातील घटकांचे प्रमाण बिघडेल. आहारावर नियंत्रण आवश्यक !

कर्क (Cancer Zodiac)

दशमातील राहू आणि हर्षलमुळे आपल्या कर्तृत्वाचे झेंडे फडकतील. कामात कुचराई नको. शुक्राचे भ्रमण भाग्यकारक ठरेल. धनसंपत्ती वाढेल. प्रवास लाभकारक ठरतील. कौटुंबिक वातावरण आनंदी ठेवण्याचा प्रयत्न कराल. संतती प्राप्तीसाठी प्रयत्न यशस्वी होतील. नोकरीतील बदल हितकारक असेल. जोडीदाराच्या साथीने घेतलेले महत्वाचे निर्णय योग्य ठरतील. विद्यार्थी वर्गाने उत्साहाने अभ्यासाला लागावे. गुरुचे पाठबल चांगले आहे. पाय दुखणे , श्वासाचा त्रास होणे यावर औषधोपचार घ्यावेत.

सिंह (Leo Zodiac)

सप्तमातील शनीसह रवी आणि शुक्र देखील भ्रमण करत आहेत. जोडीदारासह कुरबूर चालू राहील. व्यवसायात नवे करार करताना छुप्या अटींकडे दुर्लक्ष करू नका. धनसंपत्तीचा लाभ होईल. कुटुंबातील ज्येष्ठांना वेळ द्यावा लागेल. विरोधक कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतील. पाठ, मणका यांचे आरोग्य सांभाळावे. विद्यार्थी वर्गाला बुधाच्या बुद्धिमत्तेची साथ मिळेल. विवाहोत्सुक मंडळींनी थोडे सबुरीने घ्यावे. परदेश गमनासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची जमवाजमव सुरू कराल.

कन्या (Virgo Zodiac)

विद्यार्थी वर्गाला मेहनतीचे उत्तम फळ मिळेल. षष्ठ स्थानातील शनी, रवी, शुक्राच्या भ्रमणामुळे आर्थिक बाजू सावराल. कामातील रस वाढेल. व्यवसाय वृद्धीचे नियोजन सुरू कराल. गुरुची साथ असल्याने कष्टाचे चीज होईल. थोडी हिंमत दाखवा. भाग्यातील मंगळ पुष्टी देईल. चला पुढे ! जोडीदाराच्या उन्नतीमुळे वातावरण आनंदी असेल. मुलांच्या प्रश्नांना सहज उत्तरे सापडणार नाहीत. धीराने घ्यावे लागेल. नोकरदार वर्गाला वरीष्ठ व्यक्तींचा पाठींबा मिळेल. रक्तातील घटकांचे प्रमाण बिघडेल. योग्य ती काळजी घेणे आवश्यक !

तूळ (Libra Zodiac)

पंचमातील रवी, शनी, शुक्र संमिश्र फळ देईल. तंत्रज्ञानाची, कलात्मक आणि कष्टप्रत कामे करावी लागतील. निर्णय पक्का करण्यापूर्वी सर्व बाजूंनी विचार करावा. आर्थिक नियोजन कामी येईल. गुंतवणूक लाभदायक ठरेल. विवाहीत दाम्पत्यांनी सबुरीने घ्यावे. विद्यार्थी वर्गाकडून बौद्धिक परिश्रम अपेक्षित आहेत. नोकरी व्यवसायात सध्या तरी बदल नको. आहे ते नेटाने करावे. पाय सुजणे, मरगळ वाटणे, मूत्रपिंडावर अतिरिक्त ताण पडणे हे त्रास संभावतात.

वृश्चिक (Scorpio Zodiac)

आपल्या शब्दामुळे गरजवंताचे काम होईल. विद्यार्थी वर्गाला चांगले ग्रहबल आहे. परदेशात शिक्षण घेण्याची तयारी सुरू करावी. विवाहोत्सुक मंडळींच्या संशोधनाला यश मिळेल. प्रेमसंबंध जुळून येतील. नोकरी व्यवसायात अडचणींवर मात करत पुढे जाल. स्वतःला सिध्द करण्याची चांगली संधी उपलब्ध होईल. विरोधकांना चीत कराल. जोडीदाराच्या आवडीनिवडी जपाल. गुंतवणूकदारांनी मोठी झेप घेऊ नये. ओटीपोटाच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. युरिन इन्फेक्शन होण्याची शक्यता आहे.

धनु (Sagittarius Zodiac)

कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. शुभ वार्ता समजतील. प्रवास योग आहेत. परदेशाच्या प्रवासाचीही तयारी कराल. जोडीदाराच्या व्यवहारज्ञानामुळे काही गोष्टी खूप लाभदायक ठरतील. त्याच्या सल्ल्याने पुढे जा. विद्यार्थी वर्गाला अभ्यासासह कला, क्रीडा या क्षेत्रात नाव गाजवण्याची संधी मिळेल. नोकरी व्यवसायामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चांगला पाठिंबा मिळेल. नव्या ओळखी होतील. जबाबदारी वाढेल. त्वचेची काळजी घ्यावी. कोरडी होणे, फाटणे, रक्त येणे असे त्रास संभवतात.

हे ही वाचा<< २१ एप्रिलपासून मोदींच्या कुंडलीत कष्टी दिन! ज्योतिषतज्ज्ञ म्हणतात “२०२४ ला सत्ता टिकवण्यासाठी मुस्लिमच..”

मकर (Capricorn Zodiac)

आत्मविश्वास वाढेल. नव्या संकल्पना अमलात आणाल. कलात्मक आणि बौद्धिक क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटवाल. वरिष्ठांचे पाठबळ चांगले मिळेल. विद्यार्थी वर्गाची सर्वांगीण प्रगती होईल. उत्साह वाढेल. जोडीदारासह वैचारिक मतभेद होतील. शब्द जपून वापरावेत. आर्थिकदृष्टय़ा लाभकारक महिना आहे. मेहनतीस उत्तम फळ मिळेल. संतान प्राप्तीसाठी वैद्यकीय सल्ला जरूर घ्यावा. गुडघे, सांधे, स्नायूबंध यांचे आरोग्य विशेष जपावे लागेल. थंडीचा त्रास वाढेल.

कुंभ (Aquarius Zodiac)

शनीची मेहनत, शुक्राची सौंदर्यदृष्टी आणि रवीचे यश यांचा त्रिगुणी योग आहे. हाती घेतलेल्या कार्यात सफलता मिळेल. चिकाटी सोडू नका. नोकरीमध्ये मंगळाच्या साथीने वरिष्ठ वर्गापुढे आपली मते ठामपणे मांडाल. व्यवसायात समस्यांवर उपाय शोधाल. व्यावसायिक नाती जोपासाल. व्यक्तींच्या गुणांची कदर कराल. विद्यार्थी वर्गाला प्रचंड मेहनत घ्यावी लागेल. शनी आपल्या कष्टाचे चीज नक्की करेल. दाम्पत्य सुख चांगले मिळेल. रोग प्रतिकार शक्ती वाढवावी.

हे ही वाचा<< ‘भारत जोडो’ नंतरही राहुल गांधी का ठरतील अपयशी राजपुत्र? ज्योतिषतज्ज्ञांनी मांडली कुंडली..

मीन (Pisces Zodiac)

गुरू, शुक्राचे बळ खूप हितकारक ठरेल. महत्वाचे निर्णय घेताना तज्ज्ञांचा सल्ला उपयोगी पडेल.गुंतवणूकदारांना चांगला लाभ होईल. रवी, बुधाच्या साथीने मुद्याचे बोलाल. जे बोलाल ते प्रभावी ठरेल. नोकरीतील कामकाजात यश खेचून आणाल. व्यावसायिकांनी नव्या संकल्पना अमलात आणाव्यात. थोडीफार जोखीम पत्करावी लागेलच. जोडीदाराच्या बाबतीत अचूक निर्णय घ्याल. विवाहोत्सुक मंडळींनी शोध कार्य सुरू ठेवावे. यश मिळेल. सांधे, गुडघे आणि पाठीचे विकार त्रासदायक ठरतील.

Story img Loader