Moon Astrology: चंद्राचा मनाशी थेट संबंध आहे, त्यामुळे तो केवळ तुमच्या विचारांवर परिणाम करत नाही तर तुमच्या विचारांवरही नियंत्रण ठेवतो. जेव्हा चंद्र वेगवेगळ्या ग्रहांसह युती करतोतेव्हा व्यक्तीच्या विचारसरणी, भाव आणि वर्तन यासारख्या गोष्टींवर व्यापक प्रभाव पडतो. चंद्र कर्क राशीचा स्वामी आहे. कर्क राशी हे जल राशी आहे. ज्याप्रमाणे पाण्यामध्ये इतर पदार्थ मिसळले की पाणी स्वतःचे स्वरूप धारण करते, त्याचप्रमाणे चंद्रावरही ग्रहांच्या सहवासाचा परिणाम होतो. या लेखाद्वारे आपण चंद्राच्या इतर ग्रहांबरोबर युतीचा व्यक्तीच्या स्वभाववर कसा परिणाम होतो.

चंद्रमा- सूर्य : सूर्य आत्म्या तर चंद्रमा मनाचा कारक आहे.सूर्य आणि चंद्र वगळता इतर ग्रह प्रत्येकी दोन राशींचे स्वामी मानले गेले आहेत. सूर्य हा सिंह तर चंद्र कर्क राशीचा स्वामी आहे. जेव्हा दोन्ही ग्रहांची युती झाल्यास व्यक्तीचे मन विचलित होऊ लागते आणि त्याचा स्वभाव थोडा कठोर होतो, व्यक्ती कोणाशीही साधेपणाने आणि नम्रतेने बोलत नाही.

हेही वाचा – शुक्रवारी ‘या’ राशींवर माता लक्ष्मीची असेल विशेष कृपा, वाचा कोणाला होईल फायदा, कोणाचे होईल नुकसान

चंद्रमा- मंगल : चंद्र जल आहे आणि मंगळ अग्नि आहे. ज्या लोकांच्या कुंडलीत या ग्रहांची युती होते तेव्हा ती व्यक्ती आपल्या ध्येयाच्या दिशेने संपूर्णत: समर्पित असतात. ते अर्जुनाप्रमाणे आपल्या ध्येय साध्य करण्यासाठी अडून राहतात तर त्यांच्या स्वभावामध्ये काहीसा कठोर होतो त्यामुळे लोक त्यांच्यावर सारखे नाराज होतात.

चंद्र-बुध: अशी व्यक्ती स्वतःच्या हिताचा विचार करू लागते आणि जे काही मनात असेल ते बिनदिक्कतपणे सर्वांसमोर सांगतो. या लोकांकडे केवळ चांगली मार्केटिंग कौशल्ये नसतात तर ते प्रत्येक परिस्थितीत सहजपणे हाताळू शकतात.

चंद्र-गुरू: चंद्र आणि गुरू एकत्र आल्यावर गजकेसरी योग तयार होतो. गुरु हा ज्ञानाचा कारक आहे, अशा स्थितीत माणूस आपल्या ज्ञानाच्या जोरावर धन आणि कीर्ती मिळवण्यात यशस्वी होतो. लोकांना सहजपणे स्वतःकडे आकर्षित करण्यात यशस्वी होतात.

हेही वाचा- २०२५ पर्यंत ‘या’ राशींवर असेल शनीची विशेष कृपा, मिळेल अपार पैसा अन् यश

चंद्र-शुक्र: जेव्हा जन्मपत्रिकेत चंद्र आणि शुक्र एकत्र असतात तेव्हा व्यक्ती खूप सर्जनशील असते. स्वच्छता करायला आवडते. ते कलाप्रेमी आणि सौंदर्यप्रेमी देखील असतात. त्यांची प्रतिभा दर्शवण्याच नेहमी पुढे असतात.

चंद्र-शनि: ज्या लोकांच्या कुंडलीत चंद्र आणि शनि एकत्र असतात, ते सहसा गोरे असतात. कोणताही पक्षपात न करता कोणताही निर्णय घेते. ते सत्य बोलण्यात अजिबात संकोच करत नाहीत आणि न्यायासाठी आपल्याच लोकांच्या विरोधात जायलाही तयार असतात.