Five Planets In Meen rashi: ज्योतिषशास्त्रानुसार मार्च महिन्याच्या शेवटी ग्रहांच्या स्थितीत बदल पाहायला मिळेल. महिन्याच्या शेवटी गुरू ग्रहाचे स्वामीत्व असलेल्या मीन राशीत एकाच वेळी पाच ग्रहांची युती निर्माण होणार आहे. २९ मार्च रोजी शनीच्या मीन राशीतील प्रवेशाने सूर्यग्रहणही लागेल. त्यामुळे मीन राशीमध्ये सहा ग्रहांच्या युतीचा महासंगम निर्माण होईल.

पंचांगानुसार, २८ मार्च रोजी चंद्र मीन राशीत प्रवेश करेल ज्यामुळे सूर्य, बुध, शुक्र आणि राहू यांची युती पंचग्रही योग निर्माण करेल. ही युती काही राशींच्या व्यक्तींसाठी अत्यंत लाभकारी सिद्ध होईल. त्या भाग्यशाली राशी नेमक्या कोणत्या? चला जाणून घेऊ…

पंचग्रही योग तीन राशींसाठी फायदेशीर

सिंह

पाच ग्रहांची युती सिंह राशीच्या व्यक्तींसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात नोकरीत हवे तसे यश मिळवाल. मनातील सर्व इच्छा-आकांक्षा पूर्ण होतील. या काळात आई-वडील आणि तुमच्या गुरूंचा आर्शीवाद तुमच्या पाठीशी असेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना कामाच्या ठिकाणी सहकार्यांकडून मदत मिळेल. अचानक धनलाभ होईल. शत्रूंवर विजय मिळवाल.तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळेल. पद-प्रतिष्ठेत वाढ होईल. जोडीदाराबरोबरचे नातेसंबंध अधिक गोड होतील.

कुंभ

कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी पाच ग्रहांची युती खूप फायदेशीर ठरेल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा सहज पूर्ण होतील. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नोकरी मिळण्याचे योग आहेत. व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो. काळात अचानक धनलाभ, भौतिक सुखाची प्राप्ती होईल. अनेक दिवसांपासून अडकलेले कामही पूर्ण होण्यास मदत मिळेल. नात्यांमध्ये गोडवा निर्माण होईल. भावंडांकडून मदतीचा हात मिळेल. नात्यांमध्ये गोडवा निर्माण होईल.

तूळ

तूळ राशीच्या व्यक्तींसाठीही पाच ग्रहांची युती अत्यंत सकारात्मक सिद्ध होईल. त्यामुळे अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील. आकस्मिक धनलाभ होईल. मनातील सर्व इच्छा-आकांक्षा पूर्ण होतील. या काळात आई-वडील आणि तुमच्या गुरूंचा आर्शीवाद तुमच्या पाठीशी असेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना कामाच्या ठिकाणी सहकार्यांकडून मदत मिळेल. अचानक धनलाभ होईल. वैवाहिक जीवन सुखमय होईल. आयुष्यात सुख-शांती निर्माण होईल.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)