ज्योतिष शास्त्रानुसार माणसाच्या आयुष्यात ग्रहांची स्थिती खूप महत्त्वाची असते. कारण यामुळे व्यक्तीला जीवनात यशाच्या मार्गावर पुढे जाताना सुख-समृद्धी प्राप्त होते. दुसरीकडे, जर ग्रह अनुकूल नसतील तर तुम्हाला पैसा, नातेसंबंध, व्यवसाय, आरोग्य इत्यादींशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते. अशा वेळी असे मानले जाते की मोराच्या पिसांचे हे काही उपाय जीवनातील अडचणी दूर करून सुख-समृद्धी वाढवण्यास मदत करतात.
१. पैसे कमावण्यासाठी
ज्योतिष शास्त्रानुसार संपत्ती मिळवण्यासाठी किंवा तुमची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी मंदिरात जा आणि राधा-कृष्णाच्या मुकुटात मोराचे पंख लावा आणि ४० दिवसांनी हे मोरपंख काढून तुमच्या तिजोरीत ठेवा.
आणखी वाचा : “हे वैयक्तिक मत आहे…”, अक्षयच्या माफीनाम्यानंतर अजय देवगणने केलेले वक्तव्य चर्चेत
२. विरोधकांवर विजय मिळवण्यासाठी
जर तुम्हाला तुमच्या विरोधकांवर विजय मिळवायचा असेल, तर हनुमानजींच्या कपाळावर सिंदूर लावून तुमच्या प्रतिस्पर्ध्याचे नाव मोराच्या पिसावर लिहून, दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर, तोंड न धुता कुठेतरी वाहत्या पाण्यात ते प्रवाहित करा. मंगळवार आणि शनिवारी हा उपाय करणे शुभ असते.
आणखी वाचा : सलमानच्या ‘या’ चित्रपटातून श्रेयस तळपदेचा पत्ता कट, मेहूणा आयुष शर्माची एण्ट्री
३. घरातील संकटांपासून मुक्ती मिळवण्यासाठी
ज्योतिष शास्त्रानुसार घरातील पुजेच्या ठिकाणी धार्मिक ग्रंथांच्या पुस्तकांमध्ये मोराची पिसे ठेवल्याने घरात सुख-समृद्धी येते आणि त्याचबरोबर घरातील कलहापासून मुक्ती मिळते.
आणखी वाचा : फोटोग्राफर्सकडून धक्का लागल्याने संतापली सारा अली खान, म्हणाली…
४. कार्यात यश मिळवण्यासाठी
असे मानले जाते की घरात असलेले वास्तू दोष तिथल्या लोकांच्या प्रगतीत अडथळा निर्माण करतो. अशा वेळी आपल्या घराच्या प्रवेशद्वारावर गणेशाची मूर्ती किंवा चित्रासह दोन मोराची पिसे लावल्यास घरातील वास्तुदोष दूर होऊ शकतो.