Most Favorite Zodiac Signs of Venus: ज्योतिषशास्त्रात शुक्र ग्रहाला सुख-समृद्ध देणारा ग्रह मानले जाते. असे म्हणतात की, ज्यांच्या कुंडलीमध्ये हा ग्रह प्रबळ असतो त्यांना आयुष्यात कधीही पैशाची कमतरता नसते. ज्योतिषशास्त्रानुसार, गुरूनंतर दुसरा सर्वात शुभ ग्रह शुक्र मानला जातो. शुक्र ग्रहाला एका राशीमधून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करण्यासाठी २३ दिवस लागतात. बुध आणि शनी शुक्राचे मित्र ग्रह म्हणतात. ज्या जातकांच्या कुंडलीमध्ये शुक्र ग्रह उच्च स्थानी असतो, त्यांच्यावर लक्ष्मीदेवीची नेहमी कृपा असते असे मानतात. कोणत्या राशी आहेत ज्यांच्या जातकांना आजीवन शुक्रदेवाचा आशीर्वाद मिळतो, हे जाणून घेऊ या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वृषभ :

ज्योतिषशास्त्रानुसार, शुक्र या राशीचा स्वामी ग्रह आहे. वृषभ राशीचे लोक बुद्धिमान आणि मेहनती असतात आणि या राशीला सौंदयाचे प्रतीक मानले जाते. असे म्हणतात की, या राशीचे लोक सहसा दिसायला आकर्षक असतात. कोणीही त्यांच्याकडे सहज आकर्षित होतो. ते जिथे जातील तिथे ते स्वतःची वेगळी ओळख निर्माण करतात. त्यांना चांगले कपडे घालण्याची खूप आवड असते. ते नेहमी त्यांच्या वास्तविक वयापेक्षा लहान दिसतात. त्यांच्यावर लक्ष्मीमातेची सदैव कृपा असते, असेही मानले जाते.

हेही वाचा : Lucky Zodiac Sign : ‘या’ राशींवर असते भगवान विष्णूंची विशेष कृपा? मिळू शकतो मानसन्मान आणि समृद्धी

तूळ

ज्योतिषशास्त्रानुसार, शुक्र हा या राशीचा स्वामी आहे. शुक्रदेवाच्या कृपेने त्यांच्या आयुष्यात सर्व सुखसुविधा मिळतात असे मानले जाते. असे म्हणतात की, हे लोक समजूतदार असतात आणि आपल्या कामात निपुण असतात. त्यांच्याकडे निर्णय घेण्याची चांगली क्षमता असते आणि प्रत्येक काम परफेक्ट पद्धतीने करण्यात ते तरबेज असतात, असे मानले जाते.

हेही वाचा – शुक्रदेव ३७ दिवस कर्क राशीत विराजमान, ‘या’ तीन राशींच्या लोकांचे नशीब बदलणार? बख्खळ पैसा मिळण्याची शक्यता!

मीन

ज्योतिषशास्त्रानुसार, मीन शुक्रदेवाची प्रिय राशी आहे. त्यामुळे मीन राशीच्या लोकांवर शुक्रदेवाची विशेष कृपा असते. असे म्हणतात की, हे लोक खूप क्रिएटिव्ह असतात आणि ज्या क्षेत्रात काम करतात तिथे खूप नाव कमावतात. एकदा काम करायचे ठरविले तर त्यामध्ये ते यश मिळवल्यानंतरच शांत होतात. या व्यक्ती मनाने अत्यंत प्रामाणिक असतात असे मानले जाते.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Most favorite zodiac signs of venus snk
Show comments