Mulank Number 2 in Marathi: अंक ज्योतिषानुसार मूलांकाच्या आधारावर कोणत्याही व्यक्तीचे भूत, भविष्य आणि वर्तमान काही अंशी जाणून घेता येईल. कोणत्याही महिन्यामध्ये लोकांच्या जन्माच्या तारखेचा आधार घेतला जातो. अंक ज्योतिषानुसार, “व्यक्तीच्या भविष्याबरोबर त्याच्या व्यक्तिमत्व आणि स्वभावाविषयी अगदी काही प्रमाणात मूलकांद्वारा जाणून घेणे शक्य आहे. सध्या अशाच एका मूलांकाबाबत जाणून घेणार आहोत. या मूलांक असलेल्या मुली आदर्श पत्नी ठरतात, लग्नानंतर नवऱ्याची आणि सासरच्या मंडळीची भाग्य उजळवतात.
या मूलांक असलेल्या मुली ठरतील आदर्श पत्नी
अंकशास्त्रानुसार ज्या मुलींचा मूलांक २ असतो त्यांचा स्वभाव खूप चांगला असतो. ते खूप भावनिक आहेत आणि प्रत्येक व्यक्तीचा आदर करतात. प्रत्येक नातं कसं जपायचं ते त्यांना माहीत असतं. यामुळे ते नातेसंबंधांबाबत खूप प्रामाणिक असतात. या मूलांक असलेल्या मुलींमध्ये सद्गुणी पत्नीचे गुण असतात. ते त्यांच्या घराची तसेच पती आणि सासरीच्या मंडळींची पूर्ण काळजी घेतात. अंकशास्त्रानुसार ज्या लोकांचा जन्म २, ११, २० किंवा २९ तारखेला झाला असेल तर त्यांचा मूलांक क्रमांक २ असतो.
हेही वाचा – ‘या’ तीन राशींवर दिसून येईल लक्ष्मीची कृपा, मिळेल छप्परफाड पैसे
नवऱ्यासाठी भाग्यशाली ठरतात या मुली
अंकशास्त्रानुसार, या मूलांक असलेल्या मुली परिपूर्ण सून, पत्नी म्हणून सिद्ध होऊ शकतात. चांगल्या आणि वाईट काळात त्या नेहमी कुटुंबाच्या पाठीशी उभे असते. त्यांच्या प्रत्येक सुखाची ते पूर्ण काळजी घेतात. इतकेच नाही तर या मूलांकाच्या मुली त्यांच्या पतीसाठी खूप भाग्यवान मानल्या जातात. असे म्हणतात की, ज्या घरात हा नंबर असलेल्या मुली जातात, त्या घरातील सदस्यांसाठी प्रगतीचा मार्ग खुला होतो. नशीब त्यांना पूर्ण साथ देऊ लागते, ज्यामुळे प्रत्येक क्षेत्रात यश आणि भरपूर पैसा मिळतो.
नेहमी दुसर्यांची मदत करतात.
हा मूलांक असलेल्या मुली मनाने निर्मळ असतात. त्या दुसर्याचं दुख पाहू शकत नाही. प्रत्येक व्यक्तीची मदत करणे त्यांना आवडते. या कारणामुळे आपल्या व्यक्तिमत्वानुसार प्रत्येकाला आकर्षित करतात. प्रत्येकाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतात.
त्यांना दुसर्यांचे मन सहज वाचता येते. त्या अत्यंत बुद्धिमान असतात आणि मोठ्या मनाच्या असतात.
जाणून घ्या तुमचा मूलांक? (How To Check Your Moolank)
कोणत्याही व्यक्तीचा मूलांक हा त्याच्या जन्मतारखेवर आधारित असतो. मूलांक संख्या १ते ९ पर्यंत असते. अशा परिस्थितीत, १ ते ९पर्यंत जन्मलेल्या लोकांची मूलांक संख्या जन्मतारखेनुसार निश्चित केली जाते. याशिवाय, जर एखाद्याच्या जन्मतारखेला दोन अंक असतील, तर त्यांचा मूलांक क्रमांक दोन्ही अंक जोडून काढला जातो. उदाहरणार्थ, जर एखाद्याचा जन्म २१ तारखेला झाला असेल तर दोन्ही संख्या जोडल्यास ३ होतील. अशा स्थितीत २१ तारखेला जन्मलेल्या लोकांची मूलांक संख्या ३ असेल.