Mulank Numerology : अंकशास्त्रामध्ये अकांना विशेष महत्त्व आहे. अंकशास्त्र मूलांकवर आधारीत आहे. मूलांक हे ० ते ९ अकांच्या दरम्यान असते.अंकशास्त्रानुसार प्रत्येक मूलांकचे वेगवेगळे महत्त्व आहे. प्रत्येक मूलांकचा संबंध ग्रह आणि देवतांशी जुळलेला आहे. अंकशास्त्रानुसार काही मूलांक असे असतात ज्यांचावर धन आणि समृद्धीची देवी माता लक्ष्मीची विशेष कृपा दिसून येते. या लोकांना आयुष्यात धन, संपत्ती आणि वैभव भरभरून मिळते. जाणून घेऊ या या मूलांक विषयी. (Mulank Numerology mata lakshmi show grace on people of these mulank)
मूलांक १
हा मूलांकचा स्वामी ग्रह सूर्य असतो. सूर्य ग्रह आत्मविश्वास, नेतृत्व आणि यशाचे प्रतिक आहे. मूलांक १ असणाऱ्या लोक आत्मविश्वासू, कष्टाळू आणि महत्त्वाकांक्षी असतात. या लोकांमध्ये नेतृत्वगुण असतो. हे लोक खूप चांगल्या प्रकारे नेतृत्व सांभाळू शकतात. माती लक्ष्मी यांची मेहनत पाहून त्यांच्यावर कृपा करते. या लोकांना जीवनात धन, संपत्ती, यश आणि मान सन्मान मिळतो.
मूलांक ६
या मूलांकचा स्वामी ग्रह शुक्र असतो. शुक्र ग्रह हा प्रेम, सौंदर्य आणि भौतिक सुखांचा कारक असतो. ६ मूलांक असलेले लोक कलाप्रेमी, सौंदर्यप्रेमी आणि क्रिएटिव्ह असता. या लोकांना दुसऱ्यांना मदत करायला खूप आवडते. देवी लक्ष्मी या लोकांमध्ये असलेल्या दयाळूपणा आणि इतरांना मदत करणाऱ्या गुणांमुळे प्रभावित होऊन त्यांना जीवनात धन, संपत्ती आणि सुख समृद्धई प्रदान करते.
मूलांक ८
या मूलांकचा स्वामी ग्रह शनि असतो. शनि ग्रह कर्म अनुशासन आणि न्यायाचा प्रतिक मानला जातो. मूलांक ८ असलेले लोक मेहनती, दृढनिश्चयी आणि जबाबदार असतात आणि यांच्यामध्ये दूरदृष्टी असते. देवी लक्ष्मी यांच्या चांगल्या कर्मामुळे आणि दृढनिश्चयी स्वभावामुळे कृपा दाखवते. लक्ष्मीच्या यांना जीवनात धन, संपत्ती आणि मान सन्मान मिळतो.
मूलांक ९
मूलांक ९ चा मंगळ हा स्वामी ग्रह असतो. मंगळ ग्रह धाडसी, पराक्रमी आणि ऊर्जेचे कारक असतात. मंगळ ग्रहाचे लोक धाडसी, ऊर्जावान आणि महत्त्वकांक्षी असतात. या लोकांमध्ये नेतृत्व गुण दिसून येतो. लक्ष्मी यांच्या धाडसी स्वभावामुळे यांच्यावर प्रभावित होते आणि जीवनात धन, संपत्ती आणि यश प्रदान करते.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)