Maharashtra Rain Today: महाराष्ट्रात आज पावसाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. मागील २४ तासात मुंबईसह पुण्यात जोरदार पाऊस झाला असून हवामान विभागाने येत्या काही तासात पुणे शहर, भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसरात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पुणे व आसपासच्या भागात अतीमुसळधार पावसाचा रेड अलर्ट (Pune Rain Red Aert) बुधवारपासूनच देण्यात आला आहे. रायगड आणि ठाणे जिल्ह्यातून वाहणाऱ्या उल्हास नदीच्या पाणी पातळीत गुरुवारी मोठी वाढ झाली. मुळा मुठा नदीच्या पात्रात पाण्याचा विसर्ग वाढला असून पुण्याला पुराने विळखा घातला आहे. पुणे शहर आणि परिसरात संततधारेमुळे ३८ ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या तर डेक्कन भागात तिघांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. काही दिवसांपूर्वी पावसाच्या या स्थितीविषयी ज्योतिषतज्ज्ञ उदयराज साने यांनी सविस्तर माहिती दिली होती, महाराष्ट्रात यंदा २६ जुलै २००५ सारखी परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे का याविषयी उदयराज साने यांनी वर्तवलेला अंदाज पाहूया..

पावसाचा फायदाही मोठा

ज्योतिषशास्रानुसार रवी हा आर्द्रा ते चित्रा अशा पावसाच्या नक्षत्रात भ्रमण करताना प्रत्येक नक्षत्रात १३ दिवस वास्तव्य करतो. जेव्हा १९ जुलैला रवी पुष्य नक्षत्रात प्रवेश करेल तेव्हा त्याचे वाहन असेल बेडूक. बेडूक हा मुळात पावसाळ्यातच जास्त दिसणारा प्राणी आहे, त्यामुळे पावसासाठी हे वाहन सुद्धा महत्त्वाचे मानले जाते. रवीचा नक्षत्र बदल होताच अनेक ठिकाणी वादळ सदृश्य पाऊस होऊ शकतो. महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस होईल व पाण्याची टंचाई दूर होईल, असे साने यांनी म्हटले होते. यानुसार बुधवारी २४ जुलैपासूनच खडकवासला धरणसाखळीत विक्रमी पाऊस झाला असून पुणे शहराची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे असे समजतेय.

Maharashtra rain updates
Maharashtra Rain News: दक्षिण महाराष्ट्राला बिगर मोसमी पावसाचा फटका, आणखी दोन दिवस पावसाचा जोर
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
nashik temperature declined to 13 degree Celsius
नाशिकमध्ये पारा तेरा अंशांवर, जाणून घ्या, उत्तर महाराष्ट्रात थंडी का वाढली
Mumbai temperature increase
मुंबईचे तापमान वाढण्याची शक्यता
reserve bank of india latest marathi news
विश्लेषण: १४ महिन्यांतील उच्चांकी चलनवाढीमागे कारणे कोणती? व्याजदर कपात आणखी लांबणीवर? जीडीपी वाढही मंदावणार?
Cloudy over South Madhya Maharashtra and South Konkan Mumbai print news
राज्यात गुरुवारपासून हलक्या सरी; जाणून घ्या, दिल्लीत दाट धुके का पडले
Air quality deteriorated in Colaba Deonar Kandivali Mumbai news
कुलाबा, देवनार, कांदिवलीमधील हवा ‘वाईट’
The minimum temperature in Mumbai is decreasing and the winter season is beginning Mumbai print news
मुंबईत थंडीची चाहुल

हे ही वाचा<< Mumbai Pune Rain Live Updates : पुण्यात पाण्याची पातळी वाढली; २०० अग्निशमन दलाचे जवान तैनात, १६० जणांची सुटका!

या कालावधीत होणाऱ्या पावसामुळे मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांची पाणी टंचाईची समस्या दूर होऊ शकते असाही अंदाज साने यांनी वर्तवला होता. याशिवाय विदर्भ, मराठवाडा, सातारा, नाशिक, मुंबईसह कोकणात सुद्धा यंदा दणकून पाऊस होणार आहे. गंमत म्हणजे वायुराशीत (मिथुन, तूळ, कुंभ) यांमध्ये ग्रहाधिक्य असल्याने काही वेळा पाऊस हुलकावणी सुद्धा देऊन जाईल. शेतीसाठी पाऊस अनुकूल असेल त्यामुळे शेतकरी राजा या महिन्याभरात सुखावणार आहे.

Pune Rain Today
पुण्यात पावसाचा जोर वाढला (फोटो: ~Arul Horizon)

२६ जुलै २००५, पुन्हा एकदा?

२६ जुलै २००५ ला सुद्धा मुंबईसह राज्यभरात पावसाचा हाहाकार पाहायला मिळाला होता. अनेक ठिकाणी पाणी साचून प्रचंड नुकसान झाले होते. यंदाचा पावसाचा वेग पाहता शहरी भागांमध्ये हवामानामुळे दैनंदिन जीवनाला फटका बसू शकतो. साने यांनी म्हटले की, मागील काही दिवसांपूर्वी रायगडावर जसा ढगफुटी सदृश्य पाऊस झाला होता. येत्या काळात महाराष्ट्रात किनारपट्टीलगत भागात असा ढगफुटीसारखा पाऊस होऊ शकतो. वादळी वाऱ्यासह पाऊस मात्र सर्वदूर होईल. गावाकडील भागात पावसाचा फायदा होऊ शकतो पण शहरात वाहतूकीची कोंडी, पावसामुळे उद्भवणारे आजार, पाणी साचण्यासारख्या समस्या वाढू शकतात. प्रवासाचे नियोजन व जीवनशैलीतील काही बदल आपल्याला या पावसात सुरक्षित ठेवतील.