Maharashtra Rain Today: महाराष्ट्रात आज पावसाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. मागील २४ तासात मुंबईसह पुण्यात जोरदार पाऊस झाला असून हवामान विभागाने येत्या काही तासात पुणे शहर, भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसरात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पुणे व आसपासच्या भागात अतीमुसळधार पावसाचा रेड अलर्ट (Pune Rain Red Aert) बुधवारपासूनच देण्यात आला आहे. रायगड आणि ठाणे जिल्ह्यातून वाहणाऱ्या उल्हास नदीच्या पाणी पातळीत गुरुवारी मोठी वाढ झाली. मुळा मुठा नदीच्या पात्रात पाण्याचा विसर्ग वाढला असून पुण्याला पुराने विळखा घातला आहे. पुणे शहर आणि परिसरात संततधारेमुळे ३८ ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या तर डेक्कन भागात तिघांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. काही दिवसांपूर्वी पावसाच्या या स्थितीविषयी ज्योतिषतज्ज्ञ उदयराज साने यांनी सविस्तर माहिती दिली होती, महाराष्ट्रात यंदा २६ जुलै २००५ सारखी परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे का याविषयी उदयराज साने यांनी वर्तवलेला अंदाज पाहूया..
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा