Rain Predictions Astrology: आपण संपूर्ण पावसाळ्याचे नक्षत्र निहाय असे परिणाम पाहत आहोत. यंदाचा पाउस अनियमित व पडेल त्या ठिकाणी जास्त पडणार आणि काही ठिकाणी हा पाऊस कमी राहील हेही आपण पाहिले आहे. आश्लेषा नक्षत्र पर्यंत ची नक्षत्रे आपण गेल्या वेळी लोकसत्तेच्या याच स्तंभातून पाहिली होती. आता यापुढील नक्षत्रांचा विचार करत आहोत.

ऑगस्टमध्ये कोणत्या तारखांना पडणार मोठा पाऊस? (August Rain Predictions)

दिनांक १७ ऑगस्ट 2023 ला रवी मघा नक्षत्रात प्रवेश करतो. यावेळी वृश्चिक लग्न उदित असूनया कुंडलीतील महत्त्वाचे म्हणजेच पर्जन्याच्या दृष्टीने असलेले ग्रहयोग आपण प्रथम बघणार आहोत. शुक्र-हर्षल केंद्र योगात, गोचर शुक्र वक्री आहे. बुध-हर्षल नवपंचम योगात दिनांक 24 ऑगस्टला बुध वक्री होतो व दिनांक 28 ला त्याचा अस्त होतो. कृतिका नक्षत्रातील हर्षल असतानाया सर्व घडामोडी होत असल्याने त्याला एक वेगळेच महत्त्व येते. राहु-प्लुटो केंद्रयोग ही सुरू असल्याने या नक्षत्रातील पाऊस कमीच राहणार आहे. नक्षत्राचे वाहन घोडा असून या नक्षत्राचा पाऊस आणखी विचित्र असा पडणार आहे, पडेल त्या ठिकाणी चांगलीच वृष्टि होईल महाराष्ट्राच्या दक्षिण भागातून हा पाऊस जास्त पडणार आहे. या नक्षत्रातील पावसाला सासूचा पाऊस म्हणतात आणि त्याची प्रचिती यावेळी येणार आहे. यातील संभाव्य तारखा पुढीलप्रमाणे 17, 18, 22, 23, 25, 26, 27, 29, 30 अशा आहेत.

13 December Daily Horoscope in Marathi
१३ डिसेंबर पंचांग: पंचांगानुसार शिवयोग १२ पैकी कोणत्या राशीची आर्थिक घडी सुधारणार? तुम्हाला लाभेल का भाग्याची साथ; वाचा शुक्रवारचे भविष्य
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Shani-Mercury kendra drishti
२७ डिसेंबरपासून ‘या’ तीन राशींचे चमकणार भाग्य; शनी-बुधाची केंद्र दृष्टी देणार भरपूर पैसा
Shukra Nakshatra parivartan 2024
उद्यापासून पडणार पैशांचा पाऊस; शुक्राच्या नक्षत्र परिवर्तनाने ‘या’ तीन राशींना होणार भौतिक सुखाची प्राप्ती
mumbai, Coldest December, minimum temperature
मुंबई : नऊ वर्षांतील थंड डिसेंबर
benefits of eating saunf before bed
रात्रभर झोप लागत नाही? झोपण्यापूर्वी ‘हे’ खा; शांत झोप लागेल अन् तणावही होईल दूर
shukra guru make navpancham yog
नवपंचम राजयोग देणार पैसाच पैसा; ‘या’ तीन राशींवर शुक्र-गुरूची होणार कृपा
8 December Aries To Pisces Horoscope Today
८ डिसेंबर पंचांग: कोणाला होईल अचानक धनलाभ ते कोणाचा वाढेल ताण; जन्मराशीनुसार आजचा रविवार १२ राशींसाठी कसा असणार?

दिनांक ३१ ऑगस्ट २०२३ ला रवी पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात प्रवेश करतो. यावेळी कन्या लग्न उदित असून या नक्षत्रातील पावसाला सुनेचा पाऊस असे म्हणतात. यातील प्रमुख ग्रहयोग पुढीलप्रमाणे आहेत . बुध-हर्षल नवपंचम योग, यात गोचर बुध ११ सप्टेंबरला उदय होत आहे. शनी-मंगळ षडाष्टकात गोचर शनि हा वक्री आहे. गुरु-शुक्र केंद्र योगात, शुक्र दिनांक 4 सप्टेंबरला मार्गी होतो. या नक्षत्राचे वाहन मोर असल्याने यातील पाऊस हा वादळी स्वरूपाचा पडेल. भारताच्या किनारपट्टी प्रदेशात मुंबई, कोकणसह काही राज्यंा ना सुद्धा या वादळी पावसाचा तडाखा बसणार आहे. बंगाल सह, ओरिसा, दक्षिण भारतातील किनारपट्टी यात आंध्र प्रदेशाला याचा धोका सर्वाधिक आहे. पावसाच्या संभाव्य तारखा पुढील प्रमाणे तारखा आहे 2, 4, 5, 6, 7, 8 अशा आहेत.

सप्टेंबरमध्ये कोणत्या तारखांना पडणार मोठा पाऊस? (September Rain Prediction)

दिनांक १३ सप्टेंबर २०२३ ला गोचर रवी उत्तराफाल्गुनी नक्षत्रात प्रवेश करतो. यावेळी कर्क लग्न उदित असून यातील प्रमुख ग्रहयोग पुढील प्रमाणे. गुरु-शुक्र केंद्र योग, रवि-हर्षल नवपंचम योग, राहू-प्लुटो केंद्रयोग. दिनांक २२ ला मंगळाचा अस्त आहे, तर दिनांक १६ ला गोचर बुध हा अग्नी राशीत मार्गी होत आहे, गुरू-शनी दोन्हीही वक्री अशी ग्रहस्थिती व या नक्षत्राचे वाहन हत्ती असल्याने, भारतातील बऱ्याच भागांना हा पाऊस चांगलाच झोडपून काढणार आहे. अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची समस्या संपूर्णपणे मिटणार असून, बऱ्याच ठिकाणी हा पाऊस भयंकर नुकसान करेल. या नक्षत्रातील पावसाच्या संभाव्य तारखा पुढीलप्रमाणे 13, 14, 15, 17, 18, 19, 20, 23, 25 अशा आहेत.

दिनांक २७ सप्टेंबर २०२३ ला गोचर रवी हा हस्त नक्षत्रात प्रवेश करतो. यावेळी मीन लग्न उदित असून यातील ग्रहयोग पुढीलप्रमाणे आहेत. शुक्र-हर्षल केंद्र योग, राहु-प्लुटो केंद्र योग, मंगळ-हर्षल षडाष्टक, गुरु-बुध नवपंचम योग, रवि-शनि षडाष्टक, रवी मंगळ एकाच राशीत आहेत. ह्या परस्पर विरुद्ध तत्त्वांचे ग्रहयोग होत असल्याने, या नक्षत्राचा पाऊस खंडित वृष्टी दाखवतो. हा पाऊस सर्वदूर असा होत राहणार आहे. नक्षत्राचे वाहन बेडूक आहे. पाऊस कोकण, मुंबई, विदर्भ, सांगली, कोल्हापूर या ठिकाणी जोरदार होईल, तर इतरत्र हा पाऊस थोड्याफार प्रमाणात पडेल. या पावसाच्या संभाव्य तारखा पुढीलप्रमाणे दिनांक 27, 28, 29, 2, 3, 5, 7 अशा आहेत.

हे ही वाचा<< शनीदेव येत्या ३ दिवसात ‘या’ राशींना देणार अमृतरूपी वरदान? श्रीमंतीचा ‘समसप्तक राजयोग’ तुमच्या राशीत आहे का?

यावर्षीच्या संपूर्ण पावसाळ्याची ठळक वैशिष्ट्य

हा पाऊस लहरी असाच पडणार आहे.
यावर्षी हा पाऊस शेतीला अपुरा असला, तरी पिण्याच्या पाण्याची समस्या मिटवणारा असणार.
यावर्षी वादळी पावसाने अनेक ठिकाणी नुकसान होणार आहे.
यावर्षी प्रमाणेच पुढील वर्षी सुद्धा अवकाळी पाऊस शेतीचे नुकसान करणारा आहे.
यावर्षी जर काटेकोरपणे पिण्याच्या पाण्याचे नियोजन केले नाही, तर पुढील वर्षी पिण्याच्या पाण्याची टंचाई चांगलीच जाणवणार आहे
या अपुऱ्या पावसामुळे महागाईत चांगलीच वाढ होणार असून, याचा फटका सर्वच राजकीय पक्षांना बसणार आहे

Story img Loader