Nag Panchami 2022, Myths About Snakes : यावर्षी नागपंचमीचा सण मंगळवार, २ ऑगस्ट रोजी साजरा होणार आहे. या दिवशी प्रामुख्याने नागदेवतेची पूजा केली जाते. नागदेवतेची पूजा केल्याने सापांच्या भीतीपासून मुक्ती मिळते, असे मानले जाते. आपल्या समाजात सापांबाबत अनेक समजुती आहेत जसे की – इच्छाधारी साप आहेत का, सापाकडे नागमणी असतो का, उडणारे साप असतात का? चित्रपटांमधून आजवर सापांविषयी अनेक गोष्टी दाखवल्या गेल्या आहेत. त्यामुळे या गोष्टी खऱ्या असतात असा आपला समज झाला आहे. तुम्हालाही कधी ना कधी हे प्रश्न पडलेच असतील. आज आपण नागपंचमीच्या निमित्ताने सापांशी संबंधित मान्यता आणि त्या मागील सत्यता जाणून घेऊया.

साप खरंच दूध पितात का?

साप पूर्णपणे मांसाहारी प्राणी आहेत. हे पक्षी आणि लहान प्राण्यांच्या अंड्यांची शिकार करते. साप दूध पितात हा समज पूर्णपणे चुकीचा आहे. नागपंचमीच्या दिवशी काही लोक सापांना दूध पाजण्याचा नावाखाली त्यांचा छळ करतात. त्यामुळे काही सापांचा अकाली मृत्यू होतो. म्हणूनच सापाला चुकूनही दूध पाजू नये.

uma badve s swalekhan App
‘स्वलेखन’ ॲपद्वारे दृष्टीहिनांना डिजिटल युगाचे दार खुले करणाऱ्या उमा बडवे
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Shardiya Navratri 2024
Shardiya Navratri 2024 : नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये ‘या’ गंभीर चुका टाळा अन् देवीचा आशीर्वाद मिळविण्यासाठी ‘या’ गोष्टी करा
bike taking petrol fire
पेट्रोल भरताना बाईकचालकाच्या कोणत्या चुकीमुळे आग लागते? अशा दुर्घटना टाळण्यासाठी ‘या’ महत्त्वाच्या टिप्स ठरतील फायदेशीर
girish kuber sitaram Yechury marathi news
अन्यथा: एकेक फोन गळावया…
Prajwal Revanna Rape Victime
Prajwal Revanna Chargesheet: ‘बलात्कार करताना पीडितेला हसायला सांगायचा’, प्रज्ज्वल रेवण्णाच्या विकृतीचा कळस
indian concept religion laws Constitution of India Rashtradharma granth
धर्मानुसार वर्तनाला कायद्याची परवानगी, पण म्हणून वाट्टेल ते खपवून घेतले जाणार नाही!
Dentists are challenged to perform cosmetic and hair transplant surgery Mumbai print news
दंतचिकित्सकांना सौंदर्य आणि केस प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्याला आव्हान

Nag Panchmi 2022: कालसर्प दोष असणाऱ्यांनी नागपंचमीच्या दिवशी करा ‘हे’ उपाय; लवकरच होईल त्रासातून मुक्तता

बीनच्या तालावर खरंच साप नाचतात का?

आपण बर्‍याच वेळा पाहतो की खेळ-तमाशा दाखवणारे लोक बीनच्या तालावर सापांना नाचवण्याचा दावा करतात, परंतु तसे होत नाही. सापांचे डोळे फक्त हलत्या वस्तू पाहण्यास अधिक सक्षम असतात, त्यामुळे वाजत असलेली बीन इकडे-तिकडे डोलताना पाहून साप त्यावर लक्ष ठेवतो आणि त्यानुसार आपल्या शरीराला हलवतो.

सापाकडे नागमणी असतो का?

मान्यतेनुसार जे साप खूप म्हातारे असतात त्यांच्याकडे नागमणी असतात. हा समजही पूर्णपणे चुकीचा आहे. साप पकडण्यात पारंगत असलेल्या तामिळनाडूतील इरुला जमातीचे लोकही नागमणी धारक सापाचे अस्तित्व नाकारतात.

Zodiac Compatibility: ‘या’ राशींच्या जोड्या ठरतात सर्वोत्कृष्ट! जाणून घ्या, तुमच्यासाठी कोणत्या राशीचा जोडीदार असेल योग्य

इच्छाधारी साप खरंच असतात का?

आपल्या समाजात साप इच्छाधारी असल्याचीही समजूत आहे. इच्छाधारी साप ही फक्त एक अंधश्रद्धा आहे आणि माणसांची निव्वळ कल्पना आहे. या विषयावर अनेक चित्रपटही बनले आहेत, त्यामुळे हा विश्वास दृढ होत चालला आहे. मात्र, हा समज पूर्णपणे चुकीचा आहे.

साप बदला घेतात का?

सापांशी संबंधित अशीही एक धारणा आहे की साप आपल्या साथीदाराच्या हत्येचा बदला घेतो. साप हे अल्पबुद्धी असलेला प्राणी आहेत. सापांचा मेंदू इतका विकसित नसतो की त्यांना कोणतीही घटना लक्षात राहते. अशा परिस्थितीत जोडीदाराचा बदला घेण्याचा समज पूर्णपणे चुकीचा आहे.

दोन तोंडी सापांचे सत्य काय आहे?

अशीही एक समजूत आहे की दोन तोंड असलेले साप असतात, म्हणजेच अशा सापांना दोन्ही टोकांना तोंड असते. कोणत्याही सापाला दोन्ही टोकांना तोंड नसते. विशिष्ट जातीच्या सापांची शेपटी तीक्ष्ण नसून जाड असते. काही लोक अशा सापांच्या शेपटीवर डोळ्यांसारखे दिसणारे चमकदार दगड ठेवतात आणि पाहणाऱ्याला असे वाटते की या सापाला दोन्ही टोकांना दोन तोंडे आहेत. मात्र हे खरे नाही.

काही दिवसांमध्ये होणारे गुरु संक्रमण ‘या’ राशींच्या लोकांसाठी घेऊन येणार ‘अच्छे दिन’

साप कोणालाही संमोहित करू शकतो का?

काही चित्रपटांमध्ये असे सांगितले गेले आहे की सापांमध्ये एक अद्भुत शक्ती असते, ज्याच्या मदतीने ते कोणालाही संमोहित करतात. यानंतर व्यक्ती पूर्णपणे त्याच्या नियंत्रणात येते. ही सुद्धा निव्वळ अंधश्रद्धा आहे.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)