Nag Panchami 2023 Date, Time and Significance: श्रावणातील पहिला सण म्हणजे नागपंचमी. नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरा केला जातो. हिंदू धर्मात नागांच्या पूजेचा हा पवित्र सण खूप महत्त्वाचा आहे. या दिवशी नाग देवतेची पूजा केली जाते. नागदेवतेची पूजा केल्याने घरात सुख-शांती राहते, असे म्हटले जाते. अनेक जण नागपंचमीच्या दिवशी उपवासही करतात. या दिवशी गरजूंना दान करणे खूप शुभ मानले जाते. नागपंचमीच्या दिवशी महादेवाची पूजा केली जाते. यावेळी नागपंचमीचा सण २१ ऑगस्ट, सोमवारी साजरा केला जाणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपंचमी शुभ मुहूर्त

हिंदू दिनदर्शिकेनुसार, नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी पंचमी तिथी २१ ऑगस्ट रोजी दुपारी १२.२१ वाजता सुरू होईल आणि पंचमी तिथी २२ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता समाप्त होईल. नागपंचमीच्या पूजेची वेळ पहाटे ५.५३ ते ८.३० अशी असेल.

(हे ही वाचा : गजलक्ष्मी राजयोगामुळे कर्कसह ‘या’ राशींना २ ऑक्टोबरपर्यंत होणार बक्कळ धनलाभ? लक्ष्मीची पावलं उमटू शकतात दारी)

नागपंचमी पूजाविधी

नाग हा शेतकऱ्यांचा मित्र असल्यामुळे नागपंचमी हा सण व्रत आणि उत्सव अशा दोन्ही स्वरूपात साजरा केला जातो. या दिवशी लाकडी पाटावर अथवा भिंतीवर नागाचे चित्र काढून किंवा मातीचे नाग आणून त्यांची पूजा केली जाते. नागाला कच्चे दूध आणि लाह्यांचा नैवेद्य दाखवतात. दूर्वा, दही, गंध, अक्षता, फुले अर्पण करून त्याची पूजा करतात. ब्राह्मणाला भोजन घालून स्वतः एकभुक्त राहतात. हे व्रत केल्यामुळे घरात सापांचे भय राहात नाही, अशी परंपरागत श्रद्धा आहे.

नागपंचमीचे महत्त्व
नागपंचमीच्या दिवशी अनंत, वासुकी, पद्म, महापद्म, तक्षक, कुलीर, कर्कट, शंख, कालिया आणि पिंगल या देवतांची पूजा केली जाते. जे लोक या दिवशी भगवान शंकराची, नागाची पूजा करतात आणि रुद्राभिषेक करतात त्यांच्या जीवनातील सर्व संकटे संपतात, असे म्हटले जाते. तसेच जर कुंडलीत राहु आणि केतू पासून काही दोष असेल तर या दिवशी नागांची पूजा केल्याने राहु आणि केतू ग्रहांचे अशुभ परिणाम देखील दूर होतात, अशी देखील श्रद्धा आहे.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nag panchami 2023 date auspicious time and significance when is nag panchami know the importance tithi and the shubh muhurta pdb
Show comments