Nag Panchami 2024 Date Puja Muhurat Rituals and Significance: हिंदू धर्मात श्रावण महिन्याला खूप पवित्र मानले जाते. या महिन्यात अनेक जण व्रत-उपासनादेखील करतात. हा महिना महादेवाला समर्पित आहे. त्यामुळे या महिन्यात श्रावणी सोमवारी अनेक जण महादेवाची पूजा-आराधना करतात. तसेच या महिन्यात नागपंचमी, कृष्णाष्टमी, रक्षाबंधन हे सणही साजरे केले जातात. यंदा ९ ऑगस्ट २०२४ रोजी म्हणजेच श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला नागपंचमीचा सण साजरा केला जाईल. या दिवशी देशभरात नागदेवतेची पूजा केली जाते.

नागपंचमीची तिथी आणि शुभ मुहूर्त

नागपंचमीची तिथी शुक्रवार, ९ ऑगस्ट रोजी सकाळी १२:३६ वाजता सुरू होईल आणि १० ऑगस्ट रोजी पहाटे ३:१४ वाजता संपेल. तसेच या दिवशी शुभ मुहूर्त ९ ऑगस्ट रोजी दुपारी १२:१३ मिनिटांपासून सुरू होईल तो दुपारी १ वाजता समाप्त होईल.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
maharashtra vidhan sabha election 2024 uncle dharmarao baba atram vs nephew ambrishrao atram in aheri assembly constituency gadchiroli print politics news
अहेरीत आत्राम काका-पुतण्यात थेट लढत? अपक्षांमुळे प्रस्थापितांच्या मनात धाकधूक…
Savlyachi Janu Savli
Video : “तारा आणि भैरवीचे सत्य…”, जगन्नाथचा प्लॅन यशस्वी होणार? ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत ट्विस्ट
Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk 2024 Updates in Marathi
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रचार थांबला; आता चेंडू मतदारांच्या कोर्टात, २० नोव्हेंबरची प्रतिक्षा
Uddhav Thackeray on PM Narendra Modi
“आधी मणिपूर ‘सेफ’ करा आणि मग…”; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं मोदी सरकारवर टीकास्र!
farmer suicide sharad pawar
राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा विषय गंभीर – शरद पवार

नागाला देव स्वरूप का मानले जाते?

पौराणिक कथांनुसार, हिंदू धर्मात नागाला देव स्वरूप मानले जाते आणि त्याची पूजा केली जाते. कारण- महादेवाच्या गळ्यात वासुकी नावाच्या नागदेवतेला स्थान प्राप्त आहे; तर श्री विष्णूदेखील शेषनागावर विश्राम करतात. त्यामुळे आपल्याकडे नागांना पूर्वीपासूनच पूजनीय मानले जाते. नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा केल्याने त्याची कृपादृष्टी आपल्यावर राहते. तसेच नागपंचमीच्या दिवशी पूजा केल्याने कालसर्पदोषातून मुक्तीही मिळते, असे म्हटले जाते.

नागपंचमीचे महत्त्व

नागपंचमीच्या दिवशी अनंत, वासुकी, पद्म, महापद्म, तक्षक, कुलीर, कर्कट, शंख, कालिया, पिंगल या देवतांची पूजा केली जाते. जे लोक या दिवशी भगवान शंकराची, नागाची पूजा करतात त्यांच्यावर महादेवाची कृपा प्राप्त होते. तसेच या दिवशी हे नागस्तोत्रदेखील म्हटले जाते.

अनंतं वासुकिं शेषं पद्मनाभं च कंबलं ।
शंखपालं धृतराष्ट्रं तक्षकं कालियं तथा ।।
एतानि नव नामानि नागानां च महात्मनाम् ।
सायंकाले पठेन्नित्यं प्रातःकाले विशेषतः।।
तस्य विषभयं नास्ति सर्वत्र विजयी भवेत् ।।

नागपंचमी पूजाविधी

या दिवशी लाकडी पाटावर अथवा भिंतीवर नागाचे चित्र काढून किंवा मातीचे नाग आणून, त्यांची पूजा केली जाते. नागाला कच्चे दूध आणि लाह्यांचा नैवेद्य दाखवतात. दूर्वा, दही, गंध, अक्षता, फुले अर्पण करून त्याची पूजा करतात. हे व्रत केल्यामुळे घरात सापांचे भय राहत नाही, अशी परंपरागत श्रद्धा आहे.

हेही वाचा: Nag Panchami 2024: चांदीच चांदी! नागपंचमीला निर्माण होणार राजयोग; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींवर असणार नागदेवतेची कृपा

नागपंचमीची आख्यायिका

श्रावण शुद्ध पंचमीला कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित बाहेर आले, तो दिवस नागपंचमी म्हणून साजरा केला जातो. तसेच आणखी इतरही प्रसिद्ध आख्यायिका आहेत. सापाला शेतकऱ्याचा मित्र मानले जाते. त्याशिवाय नागपंचमीचे आध्यात्मिक, सांस्कृतिक महत्त्वही वेगळे आहे. नागपंचमीदिनी नवनागांचे स्मरण केले जाते.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)