9th August 2024 Panchang And Rashibhavishya : आज (शुक्रवार, ९ ऑगस्ट २०२४) श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाची पंचमी तिथी असून आजच्या दिवशी संपूर्ण देशात नागपंचमी हा सण साजरा केला जाणार आहे. आज नागपंचमीची तिथी सकाळी १२ वाजून ३६ मिनिटांनी सुरू होईल आणि उद्या ( १० ऑगस्ट ) रोजी पहाटे ३ वाजून १४ मिनिटांपर्यंत असेल. पूजेसाठी आजचा शुभ मुहूर्त दुपारी १२ वाजून १३ मिनिटांपासून सुरू होईल ते दुपारी १ वाजेपर्यंत असेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पंचांगानुसार दुपारी १ वाजून ४५ मिनिटांपर्यंत सिद्धी योग असणार आहे आणि रात्री २ वाजून ४५ मिनिटांपर्यंत हस्त नक्षत्र जागृत असणार आहे. तसेच आजचा राहू काळ सकाळी १० वाजून ३० मिनिटांनी सुरु होईल ते दुपारी १२ वाजेपर्यंत असेल. तर पंचांगानुसार अभिजित सकाळी ११ वाजून ५४ मिनिटांपासून सुरु होईल ते दुपारी १२ वाजून ४६ मिनिटांपर्यंत असेल. तर नागपंचमीचा शुभदिवस तुमच्या राशीला कसा जाईल जाणून घेऊ या…

०९ ऑगस्ट पंचांग व राशिभविष्य :

मेष:- प्रेमाच्या व्यक्तींशी गाठ पडेल. नवीन व्यावसायिक हालचाली सुरू होतील. मेहनत फळाला येताना दिसेल. मित्रांचा सल्ला उपयोगी पडेल. आत्मविश्वास वाढीस लागेल.

वृषभ:- आहाराची पथ्ये पाळा. खर्चाचा अंदाज घेऊन कार्य करावे. दिवस मध्यम फलदायी. हातातील कलेला वाव द्यावा. कला क्षेत्रातील व्यक्तींना चांगला दिवस.

मिथुन:- कामाच्या ठिकाणी सन्मान वाढेल. दिवसाची सुरवात चांगली होईल. बुद्धी कौशल्याने कामे मार्गी लावावीत. मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील. प्रेमातील व्यक्तींनी सबुरी दाखवावी.

कर्क:- घरात वातावरण आनंदी राहील. प्रगतीच्या वाटा चोखाळाव्यात. ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला मोलाचा ठरेल. साहित्य क्षेत्रातील व्यक्तींसाठी दिलासादायक दिवस. खर्च वाढते राहतील.

सिंह:- कौटुंबिक जबाबदारी वाढेल. बोलण्यातून इतरांवर छाप पाडाल. घाई करू नये. व्यावसायिक निर्णय संयमाने घ्यावेत. येणी वसूल होतील.

कन्या:- हातातील कामे पूर्ण करावीत. कौतुकाची थाप पाठीवर पडेल. समस्येतून मार्ग निघेल. कामावर अधिक लक्ष केंद्रीत करा. स्त्री सहकार्‍यांची मदत मिळेल.

तूळ:- मनासारखी गोष्ट घडेल. हवी असलेली वस्तु सापडेल. काही सकारात्मक वार्ता मिळतील. अपेक्षित यशाकडे वाटचाल चालू राहील. स्थावर मालमत्तेतून लाभाची शक्यता.

वृश्चिक:- आळस झटकून कामाला लागावे. मोठ्या लोकांचा आशीर्वाद घ्यावा. प्रेमातील व्यक्तींना चांगला दिवस. विचार भरकटू देऊ नका. समोरील संधीचे सोने करावे.

धनू:- दिवस समाधानाचा जाईल. कटू शब्द टाळा. मुलांकडून आनंदवार्ता मिळेल. व्यापारातील लाभ शांतता प्रदान करतील. नवनवीन खर्च उद्भवतील.

मकर:- दिवस धावपळीत जाईल. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना चांगला दिवस. प्रलोभनांना बळी पडू नये. वडीलांची मदत घेऊन कामे होतील. मान, सन्मान वाढेल.

कुंभ:- विद्यार्थ्यांनी अभ्यासाला प्राधान्य द्यावे. एखादी आनंदी बातमी समजेल. मात्र खर्चात वाढ होईल. कार्यक्षेत्रात वाढ होईल. आपले कौशल्य कौतुकास पात्र होईल.

मीन:- दिवस मंगलदायी ठरेल. मोठ्या माणसांच्या गाठी पडतील. कुटुंबासाठी धावपळ करावी लागेल. चर्चा करताना संयम बाळगावा. जोडीदाराचे उत्तम सहकार्य मिळेल.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nag panchami vishesh panchang and rashibhavishya mesh to meen zodic signs bring love money business ideas read marathi horoscope asp
Show comments